मराठी बातम्या /बातम्या /explainer /

शहराला झाशी नाव कोणी दिलं? आता रेल्वे स्टेशनचं नाव मागणी नसतानाही का बदलले?

शहराला झाशी नाव कोणी दिलं? आता रेल्वे स्टेशनचं नाव मागणी नसतानाही का बदलले?

jhansi railway station is now virangna laxmibai : झाशी हा उत्तर प्रदेशातील जुन्या जिल्ह्यांपैकी एक आहे. चंदेला राजांच्या काळात याला झाशी हे नाव पडले आणि त्यानंतर गेली अनेकशे वर्षे तेच नाव आहे. येथे मराठा राजवट झाली. ज्याची शेवटची राज्य प्रमुख राणी लक्ष्मीबाई होती. जेव्हा इंग्रजांना झाशी राज्य पूर्व भारतात विलीन करायचे होते तेव्हा लक्ष्मीबाईंनी त्यांच्याशी युद्ध केले.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

लखनऊ, 31 डिसेंबर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सत्तेत आल्यापासून राज्यातील अनेक शहर, प्रदेशांची नावं बदलण्याचा सपाटा लावला आहे. यात आता आणखी एकाची भर पडली आहे. उत्तर प्रदेशातील जुन्या जिल्ह्यांमधील आणखी एक प्रसिद्ध शहर झाशीच्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून वीरांगना लक्ष्मीबाई असे करण्यात आलं आहे. खरंतर झाशी नाव आपल्या सर्वांनाच खूप प्रचलित आहे. विचित्र गोष्टी म्हणजे हे या रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्याची मागणीही कोणी केली नव्हती. तरीही नाव का बदललं असा प्रश्ना लोकांच्या मनात उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे राणी लक्ष्मीबाईचे राज्य असतानाही या ठिकाणाचे नाव झाशीच होते. नंतर येथे रेल्वे स्थानक बांधण्यात आले.

राणी लक्ष्मीबाईंच्या मृत्यूनंतर 1880 च्या दशकाच्या उत्तरार्धात ब्रिटिशांनी हे रेल्वे स्थानक बांधले. झाशीचे रेल्वे स्थानक हे देशातील सर्वात महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. त्याचे प्लॅटफॉर्म सामान्य रेल्वे प्लॅटफॉर्मपेक्षा लांब आहेत, ज्यावर दोन गाड्या एकाच वेळी हाताळल्या जाऊ शकतात.

हे नाव ना मुघलांनी ठेवले होते ना इंग्रजांनी

झाशीचे नाव ना मुघलांनी ठेवले होते ना इंग्रजांनी. हे नैसर्गिकरित्या शेकडो वर्षांपासून लोकांच्या जिभेवर आहे. झाशीच्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्याचा विचारही कोणी केला नाही. ही राज्य सरकारची योजना आहे. तसा प्रस्ताव त्यांनी तीन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारकडे पाठवला होता, तो मान्य करण्यात आला आहे.

अनेक शहरांची नावं बदलली

यापूर्वी योगी सरकारने आपल्या कार्यकाळात फैजाबादला अयोध्या, अलाहाबादला प्रयागराज, मुगलसरायला दीनदयाल उपाध्याय नगर बनवले आहे. फरक एवढाच की जिल्ह्याचे नाव बदलण्यात आलेले नाही. तर, केवळ रेल्वे स्थानकाचे नाव बदलले आहे.

रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यामागील राज्य सरकारचा तर्क असा आहे की राणी लक्ष्मीबाई या नायिका होत्या. हे क्षेत्र त्यांच्यामुळेच ओळखले जाते, ज्याला सांस्कृतिक महत्त्व आहे. मात्र, ज्यांना सत्य माहीत आहे त्यांना त्यामागचे राजकीय फायदे-तोटे दिसत आहेत.

78 वर्षांपूर्वी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअरवर पहिल्यांदा तिरंगा फडकवला होता! यामागची गोष्ट माहित आहे का?

या ऐतिहासिक शहराला झाशी हे नाव कसे पडले?

या शहराला झाशी नाव कसे पडले आणि नंतर ते राणी लक्ष्मीबाईमुळे पूर्णपणे लोकप्रिय कसे झाले? ते जाणून घेऊया. झाशी हे एक प्रसिद्ध ऐतिहासिक शहर आहे. 'भारतीय इतिहासात' याला महत्त्वाचे स्थान आहे. हे शहर 1857 नंतर राणी लक्ष्मीबाईच्या पराक्रमाशी जोडले गेले आहे.

हे शहर 9व्या शतकात वसले. झांशीचा किल्ला ओरछा शासक वीरसिंह बुंदेला याने 1613 मध्ये बांधला होता. सांगितले जाते, की राजा वीरसिंग बुंदेला यांनी दुरूनच टेकडीवर सावली पाहिली, ज्याला बुंदेली भाषेत 'झाई सी' असे म्हणतात. या शब्दाच्या बिघडलेल्या स्वरूपामुळे या शहराचे नाव झाशी पडले. 1734 मध्ये छत्रसालच्या मृत्यूनंतर बुंदेला प्रदेशाचा एक तृतीयांश भाग मराठ्यांना देण्यात आला. नंतर ते मराठा राज्य झाले.

राणी लक्ष्मीबाई इंग्रजांशी का लढल्या?

राणी लक्ष्मीबाई यांच्या पतीचे नाव राजा गंगाधर राव होते. 1857 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. ईस्ट इंडिया कंपनीने हे संपूर्ण राज्य कंपनी राज्य म्हणून विलीन करण्याची घोषणा केली. विधवा राणी लक्ष्मीबाईंनी याला विरोध केला. 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी निषेध म्हणून भाग घेतला. जून 1858 मध्ये राणीच्या मृत्यूनंतर, ब्रिटिशांनी तिच्या राज्यावर कब्जा केला. 1886 मध्ये झाशीचा संयुक्त प्रांतात समावेश करण्यात आला, जो देशाच्या स्वातंत्र्यानंतर 1956 मध्ये उत्तर प्रदेश बनला.

भारतातील 'लाल सोनं', ज्यासाठी झाला होता रक्तपात! का होते इतकी तस्करी?

रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याची प्रक्रिया

रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याची प्रक्रिया राज्य सरकारकडून सुरू होते.

राज्य सरकारची विनंती रेल्वे बोर्डाकडे जाते.

रेल्वे बोर्ड ते गृह मंत्रालयाकडे ना हरकतीसाठी पाठवते.

गृह मंत्रालयाच्या मंजुरीनंतर रेल्वे बोर्ड नाव बदलते.

नाव बदलल्याने स्टेशनचा कोडही बदलतो.

रेल्वेच्या सर्व कागदपत्रांमध्ये कोडला स्थान दिले आहे.

कोड बदलण्यासाठी कागदपत्रे आणि दस्तऐवजांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल आवश्यक आहेत.

First published:

Tags: Uttar pardesh, Yogi Aadityanath