Home /News /explainer /

Bulli bai app: बारावीत शिकणारी 18 वर्षांची मुलगी खरंच mastermind आहे का? काय आहे प्रकरण?

Bulli bai app: बारावीत शिकणारी 18 वर्षांची मुलगी खरंच mastermind आहे का? काय आहे प्रकरण?

बुल्ली बाई अॅप (Bulli Bai App) प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी श्वेता सिंग हिच्याकडून (Shweta Singh) मिळालेल्या माहितीनुसार, जियाउ नावाचा एक नेपाळी नागरिक तिला अॅपवर केल्या जाणार्‍या गोष्टींबद्दल सूचना देत होता.

    मुंबई, 5 जानेवारी : सोशल मीडियावर खळबळ उडवून देणाऱ्या बुल्ली बाई संदर्भात रोज धक्कादायक गोष्टी समोर येताना दिसत आहे. 'बुल्ली बाई' अॅप प्रकरणी (Bulli Bai App Case) मुंबई पोलिसांनी 18 वर्षीय श्वेता सिंगला उत्तराखंडमधून अटक केली आहे. यापूर्वी या प्रकरणात आणखी एक आरोपी विशाल कुमार झा यालाही अटक करण्यात आली होती. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनी बुधवारी सांगितले की, ‘बुल्ली बाई’ अॅप प्रकरणी त्यांनी तिघांना अटक केली आहे. यापैकी विशाल कुमार हा अ‍ॅप्लिकेशनचा फोलोअर असल्याचे समोर आलं आहे. या प्रकरणात श्वेता मुख्य आरोपी असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाविषयी सविस्तर जाणून घेऊया. कोण आहे आरोपी श्वेता सिंग? श्वेता उत्तराखंडची रहिवासी असून ती या प्रकरणातील सूत्रधार असल्याचे सांगण्यात येत आहे. श्वेताने बुल्लीबाई अॅपवर (Bulli Bai App) महिलांचे फोटो अपलोड केले होते. श्वेताचे वय अवघे 18 वर्षे आहे. तिला उत्तराखंडमधील उधम सिंह नगर जिल्ह्यातून अटक करण्यात आली. श्वेताचे (Shweta Singh) आई-वडील आता या जगात नाहीत. गेल्या वर्षी तिने तिचे वडील कोविड-19 मध्ये गमावले होते, तर यापूर्वी तिच्या आईचा कर्करोगाने मृत्यू झाला होता. तिला एक मोठी बहीण आहे जी वाणिज्य पदवीधर आहे, तर तिला एक लहान बहीण आणि भाऊ आहे जे सध्या शाळेत शिकत आहेत. श्वेता स्वतः इंजिनीअरिंगच्या प्रवेश परीक्षेची तयारी करत होती. नेपाळशी काय संबंध? श्वेता नेपाळमधील एका सोशल मीडिया मित्राच्या सूचनेनुसार काम करत होती. तपास पथकातील सूत्रांनी सांगितले की, बुल्ली बाई अॅप (Bulli Bai App) प्रकरणात अडकलेल्या श्वेता सिंगकडून (Shweta Singh) मिळालेल्या माहितीनुसार, जियाउ नावाचा एक नेपाळी नागरिक तिला अॅपवर केल्या जाणार्‍या गोष्टींबद्दल सूचना देत होता. सध्या पोलीस कथित नेपाळी नागरिक आणि श्वेताशी संबंधित इतरांच्या भूमिकेची चौकशी करत आहेत. श्वेताला कोणी आणि कशासाठी मदत केली याचाही तपास सुरू आहे. तिला आज मुंबईत आणण्यात येणार असून वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात रिमांडसाठी हजर केले जाऊ शकते. श्वेताचे नाव विशाल कुमार (Vishal Kumar) याने उघड केले, ज्याला याआधी बंगळुरू येथून अटक करण्यात आली आहे, तो इंजिनीअरिंगच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. विशाल-श्वेता एकमेकांच्या संपर्कात विशालने सांगितले की तो श्वेताच्या संपर्कात होता आणि श्वेता बुल्लीबाई अॅपशी संबंधित सर्व उपक्रमांवर काम करणाऱ्या लोकांच्या संपर्कात होती. ते नेपाळमध्ये बसलेल्या कोणाकडून तरी सूचना घेत होते. त्याच वेळी, मुंबई पोलिस 2021 मध्ये बुल्ली बाई अॅपच्या (Bulli Bai App) आधी उघडकीस आलेल्या सुल्ली डील्स (Sulli Deals) घटनेतील विशालच्या भूमिकेची देखील चौकशी करत आहेत. विशालवर एका विशिष्ट समुदायातील महिलांची छायाचित्रे एडिट करून अॅपवर अपलोड केल्याचा आरोप आहे. काय आहे Bulli Bai App, मुस्लिम महिलांशी कसा संबंध? हा गुन्हा किती गंभीर? बनावट ट्विटर हँडलचा वापर श्वेता सिंग JattKhalsa07 या नावाचे बनावट ट्विटर हँडल वापरत होती. या हँडलवरून घृणास्पद पोस्ट आणि आक्षेपार्ह फोटो टाकले जात होते. बुल्ली बाई अॅपने ट्विटर आणि फेसबुकवर 100 महिलांना लक्ष्य केलं आहे. या अॅपमध्ये काय आहे? बुल्ली बाई (Bulli Bai) नावाच्या अॅपवर मुस्लिम महिलांना टार्गेट केले जात आहे. अॅपवर त्यांच्याविरोधात घृणास्पद आणि घाणेरड्या गोष्टी लिहिल्या जात आहेत. वास्तविक, बुल्लीबाई त्याच धर्तीवर काम करत होते, ज्याप्रमाणे काही दिवसांपूर्वी सुल्ली डील अॅप आले होते. Sulli Deal App  गिटहबवर लॉन्च करण्यात आलं होतं, आता बुल्ली बाई देखील Github लॉन्च झालं करण्यात आलं होतं. Sulli Deals ते Bulli Bai व्हाया GitHub काय आहे प्रकरण? गीतकार जावेद अख्तर भडकले आपल्या परखड विधानांमुळे चर्चेत राहणारे गीतकार जावेद अख्तर यांनी देखील बुल्लीबाई अॅप संदर्भात रोखठोक भूमिका मांडली आहे. जावेद अख्तर यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारला आहे. शेकडो महिलांचा ऑनलाइन लिलाव केला जात आहे, तथाकथित धर्म संसद लष्कर आणि पोलिसांना सुमारे 20 कोटी भारतीयांची हत्या करण्याचा सल्ला देत आहे. सर्वांचं, विशेषतः पंतप्रधानांचं मौन पाहून मला धक्का बसला आहे. हाच सबका साथ सबका विकास आहे का? बुल्ली बाई काय आहे? What Is Bullibai बुल्ली बाई (Bullibai) गिटहब (GitHub) नावाच्या ओपन सोर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. सोशल मीडियावरील लोकांच्या माहितीनुसार, हे अॅप उघडताच एका मुस्लिम महिलेचा चेहरा समोर येतो. याला बुल्ली बाई असे नाव देण्यात आलं आहे. किंमत टॅगसह मुस्लिम महिलांचे आक्षेपार्ह फोटो शेअर केले आहेत. यासोबतच बुल्लीबाई या ट्विटर हँडलवरूनही त्याचा प्रचार केला जात आहे. या अॅपद्वारे मुस्लिम महिलांना बुक करता येईल, असे ट्विटर हँडलवर लिहिले आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Mumbai Poilce, Social media

    पुढील बातम्या