Home /News /explainer /

Who Is Nambi Narayanan: पाकला तंत्रज्ञान विकल्याच्या आरोपात तुरुंगवास, नंतर पद्मभूषण; कोण आहे नंबी नारायणन?

Who Is Nambi Narayanan: पाकला तंत्रज्ञान विकल्याच्या आरोपात तुरुंगवास, नंतर पद्मभूषण; कोण आहे नंबी नारायणन?

Nambi Narayanan आर माधवन दिग्दर्शित डेब्यू चित्रपट रॉकेट्री द नंबी इफेक्टची सध्या मीडियामध्ये खूप चर्चा आहे. जो लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का की हा इस्रोचा शास्त्रज्ञ कोण आहे? ज्यावर माधवनने चित्रपट बनवला आहे?

पुढे वाचा ...
  मुंबई, 3 जुलै : सध्या सोशल मीडियावर अभिनेता आर माधवन आणि शाहरुख खान यांचा एक सीन व्हायरल होत आहे. 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' (Rocketry The Nambi Effect) या चित्रपटातील हे दृष्य असून यात आर माधवन याने इस्रोचे शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांची भूमिका साकारली आहे. 'रॉकेट्री' हा इस्रोचे शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित एक चरित्रात्मक चित्रपट (Nambi Narayanan biopic) आहे. पण, शास्त्रज्ञ नंबी नारायणन कोण आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? माधवन कोणाच्या जीवनातून इतका प्रेरित झाला की त्याने त्यावर चित्रपट निर्मितीचा निर्णय घेतला. नंबी नारायणन यांच्या प्रेरणादायी आणि नाट्यमय प्रवासाबद्दल अधिक जाणून घेऊ. नंबी नारायणन हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे माजी शास्त्रज्ञ आणि एरोस्पेस अभियंता होते ज्यांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मात्र, नंतर त्यांच्यावरील सर्व आरोप खोटे ठरले आणि सरकारला त्यांना नुकसान भरपाई द्यावी लागली. नासा (NASA) फेलोशिप जिंकली एस. नंबी नारायणन यांचा जन्म 12 डिसेंबर 1941 रोजी एका तामिळ कुटुंबात झाला. नागरकोल येथील डीव्हीडी स्कूलमधून त्यांनी सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर, नंबी या गुणवंत विद्यार्थ्याने केरळमधील तिरुवनंतपुरम येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून एमटेक पदवी घेतली. 1969 मध्ये, नारायणन यांनी प्रतिष्ठित NASA फेलोशिप जिंकली, त्यानंतर ते अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठात अभ्यासासाठी गेले. जिथे त्यांना रॉकेटची तांत्रिक माहिती समजून घेण्यासाठी तसेच त्यांचे लक्ष्य समजून घेण्यात मदत मिळाली. 'मग मी काय करू?' मॅडीच्या वक्तव्यावर अक्षय कुमार झाला रिऍक्ट! देशासाठी योगदान भारतात परतल्यानंतर नंबी नारायणन इस्रोमध्ये काम करू लागले. त्यांनी भारतात द्रव इंधन रॉकेट तंत्रज्ञान आणले होते. पूर्वी देशातील रॉकेट तंत्रज्ञान सॉलिड प्रोपेल्लेंट्स अवलंबून होते. परंतु, 1970 मध्ये नंबी यांनी द्रव इंधन रॉकेट तंत्रज्ञान भारतात आणले आणि या इंधनासह रॉकेट तंत्रज्ञान देशात आणले गेले. ज्याचा वापर ISRO ने ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV) आणि जिओसिंक्रोनस उपग्रह प्रक्षेपण वाहन (GSLV) सह अनेक रॉकेटसाठी केला होता. नंबी नारायणन यांनी त्यांच्या कारकिर्दीत विक्रम साराभाई, सतीश धवन आणि एपीजे अब्दुल कलाम यांच्यासोबत काम केले.
  View this post on Instagram

  A post shared by R. Madhavan (@actormaddy)

  देशासाठी समर्पित शास्त्रज्ञ हेरगिरी प्रकरणात अडकले 1994 मध्ये, इस्रोमध्ये काम करत असताना, नारायणन यांच्यावर भारतीय अंतराळ कार्यक्रमाशी संबंधित गोपनीय माहिती लीक केल्याचा खोटा आरोप लावण्यात आला होता. त्यांनी अंतर्गत कार्यक्रमाची माहिती मालदीवच्या दोन नागरिकांसोबत शेअर केल्याचा आरोप होता, ज्यांनी इस्रोच्या रॉकेट इंजिनची ही माहिती पाकिस्तानला विकली होती. या आरोपांनंतर केरळ सरकारने त्यांना अटक केली. 50 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर आणि पोलिस अत्याचार सहन केल्यानंतर नंबी यांची सुटका झाली. सीबीआयने हे आरोप खोटे असल्याचे म्हटले नंबी नारायणन यांनी आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी दीर्घ कायदेशीर लढा दिला. नंबींवरील आरोप 1996 मध्ये सीबीआयने फेटाळले होते, त्यानंतर 1998 मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना निर्दोष घोषित केले आणि केरळ सरकारला छळाची भरपाई देण्यास सांगितले. हा खटला जिंकल्यानंतर केरळ सरकारमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. एप्रिल 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने नंबी नारायणन यांच्यावर रचलेल्या या कटाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेशही दिले. जिंकल्यानंतर सन्मान हेरगिरीचा खटला जिंकल्यानंतर केरळ सरकारने नंबी यांना नुकसानभरपाई म्हणून 1.3 कोटी रुपये दिले. सन 2019 मध्ये, नारायणन यांना भारतातील तिसरा सर्वात प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कार देऊनही सरकारने सन्मानित केले होते.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Shah Rukh Khan

  पुढील बातम्या