Home /News /explainer /

Green Hydrogen | भविष्यात पेट्रोल-डिझेलची जागा घेणारा ग्रीन हायड्रोजन काय आहे? चीन का मागे लागलाय त्याच्या?

Green Hydrogen | भविष्यात पेट्रोल-डिझेलची जागा घेणारा ग्रीन हायड्रोजन काय आहे? चीन का मागे लागलाय त्याच्या?

चीन (China) हा जगातील सर्वात मोठा हरितगृह वायू उत्सर्जित करणारा देश आहे. सध्या त्याची ऊर्जा सुरक्षितता संतुलित करण्यासाठी तसेच हवामान बदलाची (Climate change) उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी धडपडत आहे. अशा परिस्थितीत ग्रीन हायड्रोजनचे (Green Hydrogen) उत्पादन वाढविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. येत्या काही वर्षांत हायड्रोजन ऊर्जेच्या वाढत्या मागणीमुळे ते आपले उद्दिष्ट साध्य करू शकेल, अशी अपेक्षा आहे.

पुढे वाचा ...
    बिजींग, 24 मार्च : गेल्या काही वर्षात चीनने औद्योगिक क्षेत्रात केलेली प्रगती वाखणण्याजोगी आहे. आता उर्जा क्षेत्रातही चीनने पाऊल ठेवलं आहे. चीनच्या (China) मुख्य आर्थिक योजनाकाराने जाहीर केले आहे की ते 2025 पर्यंत वार्षिक दोन लाख टन ग्रीन हायड्रोजनचे (Green Hydrogen) उत्पादन करणार आहेत. चीनच्या हवामान बदलासाठी (Climate Change) निश्चित केलेल्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने हे मोठे पाऊल मानले जात आहे. सोबतच त्याचा उद्योगांवरही मोठा परिणाम होणार आहे. चीन ग्रीन हायड्रोजनच्या मागे का आहे आणि भविष्यात कार्बन फूटप्रिंट कमी करण्यास ते खरोखर मदत करेल का, ज्यामुळे चीन एवढ्या उर्जेवर इतके लक्ष देत आहे? ग्रीन हायड्रोजन काय आहे? What is Green Hydrogen ग्रीन हायड्रोजन हा हायड्रोजन वायू आहे जो जीवाश्म इंधनाव्यतिरिक्त पर्यावरणास अनुकूल प्रक्रियांमधून तयार होतो. हे शून्य कार्बन इंधन आहे जे अक्षय ऊर्जा स्त्रोतांपासून बनवले जाते. ते तयार करण्यासाठी, इलेक्ट्रोलिसिस प्रक्रियेद्वारे पाण्याचे रेणू हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये विभागले जातात. या प्रक्रियेत वापरण्यात येणारी उर्जा अक्षय उर्जेतून घेतली जाते, ज्यामुळे ती हरित इंधनाच्या श्रेणीत ठेवली जाते. हायड्रोजन कधी ग्रीन नसतो हायड्रोजनच्या वापरामुळे प्रदूषण होत नाही, म्हणून त्याला शून्य कार्बन इंधन म्हणतात. परंतु, त्याच्या उत्पादनात खर्च होणाऱ्या ऊर्जेमध्ये कोणतेही प्रदूषण झाले नसेल तरच त्याला ग्रीन हायड्रोजन म्हणतात. नैसर्गिक वायू आणि कोळसा देखील हायड्रोजनच्या निर्मितीसाठी वापरला जातो. पण, मग तो ग्रीन हायड्रोजन राहत नाही. सर्वात मोठा हरितगृह उत्सर्जक चीनच्या राष्ट्रीय विकास आणि सुधारणा आयोगाने (NDRC) आपल्या निवेदनात म्हटले आहे की, चीनचे लक्ष्य दरवर्षी एक ते दोन लाख टन ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन करण्याचे आहे. सन 2025 पर्यंत त्यांनी आपल्या देशात 50 हजार हायड्रोजन इंधनावर चालणारी वाहने चालवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. चीन सध्या जगातील सर्वात मोठा हरितगृह उत्सर्जन करणारा देश आहे. त्याचे हवामान बदलाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धडपडत आहे. काय सांगता! आता फक्त गाडीचा धूर तुमची गाडी चालवेल चीनला काय फायदा होणार? हायड्रोजन उर्जेवर लक्ष केंद्रित करताना, चीनने आपल्या देशाच्या वाहतूक आणि उद्योग क्षेत्रातून कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एनडीएआरसीच्या उच्च तंत्रज्ञान विभागाचे उपसंचालक वांग जियांग म्हणतात की हायड्रोजनचा विकास हा ऊर्जा क्रांतीसाठी एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. आणि ते चीनचे सर्वोच्च कार्बन आणि कार्बन न्यूट्रॅलिटी उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करेल. हायड्रोजन उत्पादन चिनी सरकारच्या म्हणण्यानुसार, ते सध्या वार्षिक 3.3 अब्ज टन हायड्रोजनचे उत्पादन करते, त्यापैकी 80 टक्के कोळसा आणि नैसर्गिक वायूपासून येतात आणि उर्वरित प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रांचे उप-उत्पादन म्हणून येते. त्याचवेळी, चायना हायड्रोजन अलायन्स या औद्योगिक संघटनेच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की चीनने पाण्याच्या इलेक्ट्रोलिसिसद्वारे 2019 मध्ये 5 लाख टन हायड्रोजनचे उत्पादन केले. ED Raid | कशी टाकतात रेड? वेगवेगळ्या एजन्सीच्या प्रक्रियेत काय फरक आहे? ग्रीन हायड्रोजनवर अवलंबून वांग म्हणतात की जरी चीन बहुतेक हायड्रोजन जीवाश्म इंधनापासून तयार करत होता, तरीही चीनमध्ये ग्रीन हायड्रोजनची क्षमता प्रचंड आहे. कारण चीन हा जगातील सर्वात मोठी अक्षय ऊर्जा क्षमता असलेला देश आहे. NDRC निवेदनात म्हटले आहे की चीनने आपला वाहतूक उद्योग, ऊर्जा संचयन आणि औद्योगिक क्षेत्रे पूर्णपणे हायड्रोजनवर अवलंबून बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, जेणेकरून 2035 पर्यंत, ऊर्जा वापरामध्ये चीनचा ग्रीन हायड्रोजनचा वाटा मोठ्या प्रमाणात सुधारला जाईल. हायड्रोजनचा वापर इंधन सेल्स आणि अंतर्गत ज्वलन इंजिनमध्ये केला जाऊ शकतो. त्याच्या उत्पादन खर्चाचे मोठे आव्हान आहे. या कारणास्तव त्याचा वापर वेगाने वाढत नाही. पेट्रोल आणि डिझेलशी स्पर्धा करण्यासाठी हायड्रोजनची किंमत निम्म्यावर आणावी लागेल, असा विश्लेषकांचा अंदाज आहे. उद्योगांनाही हायड्रोजनशी जुळवून घ्यावे लागेल.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: China, Petrol and diesel price

    पुढील बातम्या