RT-PCR टेस्टमधील CT Value म्हणजे काय? कोरोना रिपोर्टवर याचा काय परिणाम होतो?

RT-PCR टेस्टमधील CT Value म्हणजे काय? कोरोना रिपोर्टवर याचा काय परिणाम होतो?

RT-PCR Test मधील सीटी व्हॅल्यूची (CT Value) मर्यादा कमी करावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने ICMR कडे केली होती. मात्र ती नाकारण्यात आली.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 एप्रिल : देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा (Corona)संसर्ग वाढत असून स्थिती चिंताजनक बनत आहे. काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ कमी व्हायचं नाव घेत नाही आहे. त्यामुळे आरटीपीसीआर टेस्ट (RT-PCR Test) करणाऱ्या यंत्रणांवर दबाव वाढताना दिसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आरटीपीसीआर टेस्टमधील सायकल थ्रेशोल्ड (Cycle Threshold) म्हणजेच सीटी व्हॅल्यू (CT Value) सध्याची मर्यादा कमी करावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने इंडियन काऊन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चकडे (ICMR) केली होती. मात्र ही विनंती आयसीएमआरने फेटाळून लावली.

सीटी व्हॅल्यू मर्यादा कमी केली तर पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होईल, असा तर्क राज्य सरकारचा होता. मात्र ही व्हॅल्यू कमी केली तर गोंधळाची स्थिती निर्माण होईल आणि अनेक रुग्ण यातून वगळले जातील, असं आयसीएमआरने सांगितलं. आता ही सीटी व्हॅल्यू म्हणजे नेमकं काय? ती किती महत्त्वाची आहे? ती कमी जास्त केल्याने त्याचा कोरोना रिपोर्टवर काय परिणाम होतो? असे बरेच प्रश्न तुम्हाला पडले असतील.

सीटी व्हॅल्यू म्हणजे काय?

आरटीपीसीआर टेस्टमधील सीटी व्हॅल्यू रुग्णातील विषाणू लोड (Virus Load)म्हणजेच व्हायरस लोड दर्शवते. अमेरिकन असोसिएशन फॉर क्लिनिकल केमिस्ट्रीच्या (AACC)मते सीटीचा अर्थ असा की विषाणूच्या आरएनएची तपासणी करण्याच्या पातळीवर पोहोचण्यासाठी आवश्यक असलेली चक्रसंख्या होय. कमी सीटी व्हॅल्यूचा अर्थ असा होतो की रुग्णाच्या नमुन्यात व्हायरल आरएनएची संख्या जास्त आहे.

हे वाचा - कोरोना लशीचा तुटवडा दूर होणार; मोदी सरकारने घेतले 2 मोठे निर्णय

सीटी व्हॅल्यूच्या संख्येवर रुग्ण कोरोना बाधित आहे की नाही हे ठरवलं जातं. जर एखाद्या रुग्णाची सीटी व्हॅल्यू 35 दर्शवली गेली तर त्यास कोरोनाबाधित मानलं जात नाही. मात्र ही व्हॅल्यू  35 पेक्षा कमी असेल तर रुग्ण कोरोनाबाधित ठरतो. जेव्हा सीटी व्हॅल्यू कमी दर्शवली जाते, तेव्हा रुग्णाची स्थिती अधिक गंभीर आहे असं समजलं जातं.

आताच्या गाईडलाईन्सनुसार 35 किंवा त्यापेक्षा कमी सीटी व्हॅल्यू असेल तर तो रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह मानला जातो. 23 ते 35 दरम्यान व्हॅल्यू असेल तर रुग्णाची स्थिती धोक्याबाहेर मानली जाते. 22 पेक्षा कमी व्हॅल्यू असेल तर रुग्णाला काळजी घ्यावी लागते. ही व्हॅल्यू 15 पेक्षा कमी असेल तर रुग्णाला आक्सिजन बेडची आणि 10 पेक्षा कमी असेल तर आयसीयू बेडची गरज भासू शकते.

सीटी व्हॅल्यूची उपयुक्तता काय?

सीटी व्हॅल्यूमुळे रुग्णातील कोरोना संसर्गाच्या जोखीमस्तराचा अंदाज लावता येतो. ही व्हॅल्यू कॉन्टॅक्ट ट्रेसिंगलाही (Contact Tracing) प्राधान्य देण्यास मदत करते. अनेक पॅथोलॉजी लॅबमध्ये याची तपासणी होत नसल्याने रिपोर्टमध्ये ही व्हॅल्यू दर्शवली जात नाही. तसंच क्लिनिक संशोधकांना सीटी व्हॅल्यूच्या आधारे कोविड-19 संक्रमित प्रकरणांचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार देखील नाही.

सीटी व्हॅल्यूला काही मर्यादा आहेत का?

सीटी व्हॅल्यूच्या आधारे रुग्ण किती अत्यावस्थ आहे याचे अनुमान लावता येत नाही. रुग्णाकडून नमुना घेण्याची पद्धत, स्त्रोत, प्रवास आणि संक्रमण किंवा नमुना घेण्याची वेळ यावर या व्हॅल्यूचे विश्लेषण अवलंबून असतं. सीटी व्हॅल्यूला ठोस पुरावा मानला जाऊ शकत नाही.

हे वाचा -

रुग्णाची सद्यःस्थिती म्हणजेच जुने आजार आणि सद्यःस्थितीतील लक्षणे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. कमी व्हॅल्यू आलेल्या रुग्णाची प्रकृती गंभीर झालेली नसते किंवा जास्त व्हॅल्यू असलेल्या रुग्णाची प्रकृती चिंताजनक झाल्याचंही दिसून आलं आहे. त्यामुळे CT value वर सगळं अवलंबून नसतं.

First published: April 27, 2021, 1:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading