मराठी बातम्या /बातम्या /explainer /

electric Vehicle | इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरलेल्या बॅटऱ्यांचं करायचं काय? जगासमोर आव्हान! हे आहेत पर्याय

electric Vehicle | इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरलेल्या बॅटऱ्यांचं करायचं काय? जगासमोर आव्हान! हे आहेत पर्याय

Where EV Batteries Go When They Die: जागतिक स्तरावर हवामान बदलाशी लढण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहेत. पण, त्याचवेळी यात मोठी अडचण आहे. हे हरित भविष्याच्या कल्पनेला आव्हान देत आहे. या वाहनांच्या संपलेल्या बॅटरींचं काय करायचं हा मोठा प्रश्न जगासमोर उपस्थित झाला आहे.

Where EV Batteries Go When They Die: जागतिक स्तरावर हवामान बदलाशी लढण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहेत. पण, त्याचवेळी यात मोठी अडचण आहे. हे हरित भविष्याच्या कल्पनेला आव्हान देत आहे. या वाहनांच्या संपलेल्या बॅटरींचं काय करायचं हा मोठा प्रश्न जगासमोर उपस्थित झाला आहे.

Where EV Batteries Go When They Die: जागतिक स्तरावर हवामान बदलाशी लढण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहेत. पण, त्याचवेळी यात मोठी अडचण आहे. हे हरित भविष्याच्या कल्पनेला आव्हान देत आहे. या वाहनांच्या संपलेल्या बॅटरींचं काय करायचं हा मोठा प्रश्न जगासमोर उपस्थित झाला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 26 नोव्हेंबर: मोबाईल, लॅपटॉप-टॅब्लेट अशा इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरीच सध्या सर्व वाहनांमध्ये वापरल्या जात आहेत. या बॅटरींना लिथियम आयन बॅटरी (lithium ion cell) म्हणतात. चारचाकी वाहनांमध्ये बसवलेल्या या बॅटरी 200-250 किमी प्रवास केल्यानंतर चार्ज कराव्या लागतात. इलेक्ट्रिक वाहनांना (electric Vehicle) उत्तम दर्जाच्या बॅटरीची आवश्यकता असते. बॅटरी कमकुवत झाली तर वाहन तुम्हाला मध्येच धोका देऊ शकतं. परिणामी तुम्ही बॅटरी बदलणं आवश्यक होतं. मात्र, या बदललेल्या बॅटरींचं काय होतं? कारण, सध्या बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भविष्यात जुन्या बॅटऱ्यांचं काय करायचं हा मोठा प्रश्न उपस्थित होणार आहे.

अशा परिस्थितीत, जर वाहनांची बॅटरी उच्च कार्यक्षमतेच्या पातळीपासून 70-80 टक्क्यांपर्यंत आउटपुट देऊ लागली, तर ती बदलणे आवश्यक आहे. साधारणपणे, आठ ते दहा वर्षे चालल्यानंतर, वाहनांमधील बॅटरीची कार्यक्षमता कमी होते आणि त्यांना बदलण्याची आवश्यकता असते.

पारंपरिक बॅटरी रिसायकल केल्या जात होत्या

तज्ज्ञांच्या मते, पारंपरिक लीड-अ‍ॅसिड बॅटरीज रिसायकल करण्यात येत होत्या. मात्र, आतापर्यंत लिथियम-आयन बॅटरीचे पुनर्वापर करण्यासाठी पुरेसा योग्य मार्ग मिळालेला नाही. एवढेच नाही तर इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरीची विल्हेवाट लावणे हे खूपच किचकट काम आहे. ते खूप मोठ्या आणि जड असतात. या बॅटरी शेकडो लिथियम आयन सेल्सनी बनलेल्या असून त्यात अनेक घातक पदार्थ असतात. जर तुम्ही त्यांना काळजीपूर्वक तोडल्या नाही तर स्फोट होऊ शकतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की इलेक्ट्रिक वाहनांची बहुतेक उपकरणे पुन्हा वापरली जातात. मात्र, अद्याप बॅटरीचा पुनर्वापर करण्याचा कोणताही मार्ग नाही.

Maharashtra: Electric Vehicle पॉलिसीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारचा खास प्लॅन, पाहा कसा होईल फायदा

वाहनांमधून काढलेल्या बॅटरीचे काय करावे?

वाहनांमधून काढलेल्या बॅटरीची विल्हेवाट लावण्याचे सध्या तीन मार्ग आहेत. एकतर ते मोकळ्या जागेत फेकून द्या किंवा त्यातून उपयुक्त वस्तू काढण्यासाठी तोडून टाका किंवा पुन्हा वापरण्यायोग्य बनवा. मात्र, या बॅटऱ्या उघड्यावर फेकणे योग्य नाही. कारण, यामुळे माती प्रदूषित होऊ शकते. या बॅटऱ्यांची योग्य विल्हेवाट लावण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे वाहनांमधून काढलेल्या बॅटरी खूप शक्तिशाली असतात. त्या घरात ठेवलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये वापरल्या जाऊ शकतात.

रिसायकल करणे हा सर्वोत्तम मार्ग

या बॅटरीज रिसायकल करणे हा चांगला मार्ग आहे. मात्र, सध्या देशात अशा सुविधांचा अभाव आहे. तज्ज्ञांच्या मते, देशातील लिथियम-आयन बॅटरीपैकी केवळ 5 टक्के बॅटरी रिसायकल केल्या जात आहेत. यातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे रिसायकलिंग प्लांट उभारण्यासाठी होणारा प्रचंड खर्च.

राज्यात Electric Vehicle पॉलिसचे मिळणार मोठे फायदे, वाहन खरेदीनंतर मिळेल बंपर इन्सेटिव्ह

पुनर्वापर उद्योग Recycling industry

देशात आणि जगात इलेक्ट्रिक वाहनांमधून काढलेल्या बॅटरीचा पुनर्वापर करण्याचा उद्योग अजूनही खूपच लहान आहे. मात्र, इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता आगामी काळात त्याची गरज वाढणार आहे. 2010 ते 2020 दरम्यान जगात सध्या 10 दशलक्ष इलेक्ट्रिक वाहने आहेत, जी या दशकाच्या अखेरीस 250 दशलक्षपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. असे इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी (IEA) म्हणते. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक वाहनांची संख्या जितकी वाढेल, तितक्या जास्त वाया जाणार्‍या बॅटरी बाहेर येतील.

योल डेव्हलपमेंट (Yole Developpement) या फ्रेंच रिसर्च एजन्सीच्या मते, 2025 पर्यंत 7 लाख टनांपेक्षा जास्त कचरा लिथियम बॅटरींचा असेल. 2040 पर्यंत ते 9 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. सध्या, या बॅटरीपैकी फक्त काही टक्के पुनर्वापर केल्या जातात. 2019 मध्ये, फक्त 93,000 टन बॅटरी रिसायकल करण्यात आल्या.

राज्यात लवकरच नवी Electric Vehicle पॉलिसी; मुंबईसह या शहरांवर होणार परिणाम

वापरलेल्या बॅटरीमध्ये दडलाय खजिना

Yole Developmentpement नुसार, 2025 पर्यंत जगामध्ये 4.5 लाख टन बॅटरी रिसायकल करण्याची क्षमता असेल. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, या बॅटऱ्यांमध्ये सध्या $92 दशलक्ष कच्चा माल आहे, तर 2040 पर्यंत वापरलेल्या बॅटरींमधून $25 अब्ज कच्चा माल काढला जाऊ शकतो.

भारतासाठी रिसायकलिंग किती फायदेशीर आहे?

गेल्या वर्षी, भारत सरकारने देशात लिथियम आयन बॅटरीच्या उत्पादनासाठी 18 हजार कोटींचे परफॉर्मेंस लिंक प्रोत्साहन जाहीर केले होते. त्यावेळी तज्ज्ञांनी सांगितले होते की, भारत सरकार या बॅटऱ्यांची संपूर्ण मागणी आयातीद्वारे पूर्ण करत आहे. या बॅटरीसाठीचा बहुतांश कच्चा माल चीनमधून आयात केला जातो. अशाप्रकारे, भविष्यात बॅटरी वाहनांची मागणी लक्षात घेता भारत पुनर्वापरात आघाडी मिळवू शकतो. चीन लिथियम-आयन बॅटरीच्या पुनर्वापरात आधीच खूप पुढे गेला आहे.

First published:

Tags: Car, Electric vehicles, Vehicles