मराठी बातम्या /बातम्या /explainer /

पश्चिम भारतात का आलीय उष्णतेची लाट? महाराष्ट्रातही उन्हाच्या झळा! जाणून घ्या यामागचं कारण?

पश्चिम भारतात का आलीय उष्णतेची लाट? महाराष्ट्रातही उन्हाच्या झळा! जाणून घ्या यामागचं कारण?

Weather Update Heat Wave News: शनिवारी हरियाणामध्ये कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस, उत्तर प्रदेशात 37 अंश सेल्सिअस आणि दिल्लीत 35.7 अंश सेल्सिअस होते. दुसरीकडे, जैसलमेर, चुरू, बिकानेर, बारमेर आणि पिलानीसह पश्चिम राजस्थानच्या बहुतेक भागांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पातळीपर्यंत पोहोचल्याने देशाच्या पश्चिम भागात उबदार हवामानाचा परिणाम झाला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

नवी दिल्ली, 19 मार्च : उत्तर-पश्चिम मैदानी प्रदेशातील बहुतांश भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहिल्याने दिल्ली आणि लगतचा भाग उन्हाच्या झळांपासून वाचला आहे. मात्र, पश्चिम राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागांमध्ये उष्ण वाऱ्यांनी वाहण्यास सुरुवात केली आहे. नॅशनल वेदर फोरकास्टिंग सेंटर (NWFC) चे डॉ राजेंद्र कुमार म्हणाले की, सध्या दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा नाही. मात्र, इतर प्रदेशात सुरू झालेला कडक उन्हाळ्यामागील नेमकं कारण काय?

ते म्हणाले, “दिल्लीमध्ये कमाल तापमान 36.7 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेले नाही आणि पुढील काही दिवस किमान तापमान असेच राहण्याची शक्यता आहे. पूर्वेकडील वाऱ्यांमुळे आर्द्रता वाढल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्याचवेळी, गेल्या 24 तासांत रात्रीच्या तापमानात किंचित घट झाली होती. शनिवारी, हरियाणामध्ये कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस, उत्तर प्रदेशात 37 अंश सेल्सिअस आणि दिल्लीत 35.7 अंश सेल्सिअस होते.

राजस्थानच्या बहुतांश भागात पारा 40 अंशांच्या पुढे

दिल्लीच्या विपरीत, जैसलमेर, चुरू, बिकानेर, बारमेर आणि पिलानीसह पश्चिम राजस्थानच्या बहुतेक भागांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पातळीपर्यंत पोहोचल्याने देशाच्या पश्चिम भागात उष्ण हवामानाचा परिणाम झाला आहे. दुसरीकडे कोरड्या हवामानामुळे उत्तर-गुजरात, सौराष्ट्र-कच्छ, विदर्भ, पश्चिम मध्य प्रदेश आणि दक्षिणेकडील आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागांमध्ये तीव्र उष्णतेची लाट कायम आहे.

पर्वतीय भागातही उष्णतेचा प्रभाव

जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या डोंगराळ राज्यांमध्येही तापमानात वाढ जाणवत असून, काही ठिकाणी कमाल तापमान 34 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. आणखी एका आयएमडी शास्त्रज्ञाने सांगितले की, “धर्मशाळा, मंडी, चंबाचा काही भाग आणि अगदी सोलनमध्ये उष्णता जाणवत असून तापमान वाढले आहे. परंतु, एकूणच हवामान आनंददायी आहे. मैदानी भागात तापमान 40 अंश सेल्सिअसला गेल्यावर उष्णतेच्या लाटा म्हणून घोषित करावे लागते, तर हिल स्टेशनमध्ये ते 30 अंश सेल्सिअस ओलांडल्यानंतर घोषित केले जाऊ शकते.

आजार पसरवणारे डास जगातून नाहीसे झाले तर? शास्त्रज्ञ म्हणतात अशाने अनर्थ होईल

तापमान वाढण्याचे कारण काय?

भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे की मार्च-एप्रिल-मेच्या हंगामी अंदाजानुसार, मार्चमध्ये किमान-सामान्य तापमानाचा अंदाज वर्तवला होता. विशेषत: वायव्य भारतातील अनेक भागांमध्ये, पश्चिम आणि मध्य भारतातील काही भागांमध्ये, पूर्व किनारपट्टी प्रदेश आणि हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या काही भागात.

आयएमडी पुणे येथील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी स्पष्ट केले, “आम्हाला मार्चनंतर तापमान वाढण्याची अपेक्षा होती. 500mb (वरचा वारा चार्ट) स्पष्टपणे भारताच्या मध्य भागात अँटी-चक्रीवादळाचा विकास दर्शवतो. ही एक प्रणाली आहे जी सामान्यतः मार्चच्या सुरुवातीला वरच्या वातावरणात तयार होते आणि वाऱ्याचे स्वरूप बदलते. यामुळे बरीच हवा खाली जाते, ज्यामुळे जमिनीजवळचे तापमान गरम होते."

रशिया युक्रेन युद्धामुळे पर्यावरणाला मोठा धोका! शास्त्रज्ञ म्हणाले..

उष्णतेच्या लाटेने किनारी भागातील लोक हैराण

मैदानी भागात उच्च तापमानाचा अनुभव घेणे सामान्य असले तरी किनारी भागात उष्णतेच्या लाटेने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. उदाहरणार्थ, गेल्या काही दिवसांत मुंबईतील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या जवळपास नोंदवले गेले. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे मुख्यत्वे पूर्वेकडील वाऱ्यांचे वर्चस्व आणि मॅडन ज्युलियन ऑसिलेशन (MJO) नावाच्या प्रणालीमुळे आहे, जे तिसऱ्या टप्प्यात देखील कठोर दबाव आणत आहे.

डॉ. के. एस. होसाळीकर म्हणाले, “एमजेओ एक प्रकारचा रिज (पर्वतश्रेणी) तयार करत आहे, परिणामी समुद्राच्या वाऱ्याला किनाऱ्यापर्यंत पोहोचण्यात अडथळा होतोय. त्यामुळे त्याला विलंब होत आहे. मुंबई-कोकण भागात समुद्राच्या वाऱ्याला उशीर झाला की तापमान वाढते. मुंबईत समुद्राच्या वाऱ्याची वेळ साधारणपणे सकाळी साडेअकरा ते दुपारी 12 वाजेपर्यंत असते. पण, असे दिवस असतात जेव्हा समुद्राची वारे दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत उशिरा येतात आणि तापमान 37 ते 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. त्यात दिवसा समुद्राचे वारे पूर्णपणे स्थिर असतात. ते नसेल तर तापमान देखील 40 अंश सेल्सिअस पर्यंत येते. त्या काळात, ईशान्येकडील वारे प्रबळ होतात आणि ते किनारपट्टीच्या प्रदेशाचे तापमानही वाढवतात.”

First published:

Tags: Summer season, Weather