Home /News /explainer /

..अन् 'त्या' घटनेनंतर विनोबा भावे यांनी सुरू केली भूदान चळवळ! काय होती घटना?

..अन् 'त्या' घटनेनंतर विनोबा भावे यांनी सुरू केली भूदान चळवळ! काय होती घटना?

आचार्य विनोबा भावे Acharya Vinoba Bhave) हे अहिंसावादी, स्वातंत्र्य कार्यकर्ते, समाजसुधारक आणि आध्यात्मिक शिक्षक होते. महात्मा गांधींचे (Mahatma Gandhi) अनुयायी असलेले विनोबांनी त्यांच्या अहिंसा आणि समतेच्या तत्त्वांचे समर्थन केले. त्यांनी आपले आयुष्य गरीब आणि दीनदुबळ्यांच्या सेवेसाठी समर्पित केले आणि त्यांच्या हक्कांसाठी उभे राहिले.

पुढे वाचा ...
    मुंबई, 25 जानेवारी : आचार्य विनोबा भावे (Acharya Vinoba Bhave) यांची गणना देशातील महान स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसेवकांमध्ये केली जाते. ते महात्मा गांधींचे अनुयायी होते आणि त्यांच्याप्रमाणे आयुष्यभर सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबून गरीब आणि निराधारांसाठी लढले. विनोबा एकदा म्हणाले होते की, सर्व क्रांतीचे उगमस्थान आध्यात्मिक असते. माझ्या सर्व कार्याचे एकमेव उद्दिष्ट मनांचे मिलन आहे. विनोबा 1958 मध्ये कम्युनिटी लीडरशिपसाठी आंतरराष्ट्रीय रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त करणारे पहिले होते. आजच्याच दिवशी 1983 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आला. आचार्य विनोबा भावे यांचे मूळ नाव विनायक नरहरी भावे. त्यांचा जन्म 11 सप्टेंबर 1895 रोजी गागोडे, बॉम्बे प्रेसिडेन्सी (आता महाराष्ट्र) येथे एका संपन्न ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नरहरी शंभूराव आणि आईचे नाव रुक्मिणी देवी होते. चार भावंडांमध्ये ते सर्वात मोठे होते. अध्यात्माकडे ओढा विनोबा भावे (Vinoba Bhave) यांच्या आई धार्मिक स्त्री होत्या आणि त्यांच्या आईचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. विनोबा भावे हे अतिशय हुशार विद्यार्थी होते आणि त्यांचा आवडता विषय गणित होता. पण गुजरातमधील बडोदा येथे पदवीचे शिक्षण घेत असताना त्यांची आवड अध्यात्माकडे जाऊ लागली. असं म्हणतात की 1916 मध्ये बिनोबा भावे अहमदाबादमध्ये असलेल्या महात्मा गांधींच्या कोचरब आश्रमात गेले होते. यानंतर त्यांनी शाळा-कॉलेज सोडले, पण शिक्षण सुरू ठेवले आणि गीता, रामायण, कुराण, बायबल यासारख्या अनेक धार्मिक ग्रंथांचा तसेच राजकारण, अर्थशास्त्र अशा अनेक आधुनिक सिद्धांतांचा अभ्यास केला. तेव्हा त्यांचे वय अवघे 21 वर्षे होते. स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला विनोबा भावे महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित झाले आणि त्यांनी गांधींना त्यांचे राजकीय आणि आध्यात्मिक गुरू बनवले. काळाच्या ओघात गुरू-शिष्य जोडी अधिक घट्ट होत गेली आणि त्यांनी मिळून अनेक चळवळी केल्या. 1920 मध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या असहकार चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि देशवासियांना विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकून स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहन केले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या एकुलत्या एक मुलीची प्रेमकहाणी माहिती आहे का? गांधींकडून वर्धा आश्रम सांभाळण्याची जबाबदारी गांधीजींवर विनोबा भावे यांचा खूप प्रभाव होता. त्यांनी 1921 मध्ये भावे यांना वर्धा आश्रम सांभाळण्याची जबाबदारी दिली. येथून त्यांनी ‘महाराष्ट्र धर्म’ हे मासिकही मराठीत काढले. या मासिकाच्या माध्यमातून ते वेद आणि उपनिषदांचे संदेश लोकांपर्यंत पोहोचवत असत. भावे यांचा स्वातंत्र्यलढ्यातील वाढती उंची पाहून इंग्रज सरकार खवळले. त्यांनी ब्रिटींशांना विरोध केल्याबद्दल त्यांना अटक केली. त्यांना सहा महिन्यांची शिक्षा झाली. विनोबा भावे यांना नंतरच्या काळात अनेकदा तुरुंगात जावे लागले. धुलिया तुरुंगात शिक्षा भोगत असताना ते इतर कैद्यांना 'गीता' शिकवत असे. त्यानंतर, 1940 मध्ये महात्मा गांधींनी त्यांना ब्रिटीशांच्या विरोधात आवाज उठवणारे पहिले वैयक्तिक सत्याग्रही घोषित केले. यादरम्यान त्यांना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षाही झाली होती. विनोबा भावे हे अतिशय शांत आणि शिस्तप्रिय व्यक्ती होते. महात्मा गांधींच्या हत्येनंतर त्यांनी त्यांचा सर्वोदय हा शब्द स्वीकारला, ज्याचा अर्थ - "सर्वांसाठी प्रगती" असा होतो. भूदान चळवळ सन 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत एका मोठ्या उलथापालथीतून जात होता. संपूर्ण देशात अशांततेचे वातावरण होते. दरम्यान, तेलंगणात (तेव्हाचे आंध्र प्रदेश) डाव्यांच्या नेतृत्वाखाली हिंसक संघर्ष सुरू होता. ते भूमिहीन शेतकऱ्यांचे आंदोलन होते. तसेच भारतात लोकशाही व्यवस्था कधीच यशस्वी होऊ शकत नाही, हे दाखवण्याचाही काही लोकांचा हेतू होता. यानंतर विनोबा भावे (Vinoba Bhave) 18 एप्रिल 1951 रोजी नलगोंडा येथील पोचमपल्ली गावात शेतकऱ्यांना भेटण्यासाठी पोहोचले. आंदोलक हरिजन शेतकऱ्यांनी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी 80 एकर जमिनीची मागणी केली. आपल्या समाजातील 40 कुटुंबांना 80 एकर जमीन मिळाल्यास ते सहज जगू शकतात, असे शेतकऱ्यांनी भावे यांना सांगितले. डॉ. आंबेडकर आणि नेहरुंच्या एका निर्णयाने आलं क्रांतीकारी विधेयक! मागणी ऐकून घेतल्यानंतर त्यांनी जमीनदारांशी संवाद साधला. त्यांच्या बोलण्याने रामचंद्र रेड्डी नावाच्या जमीनदारावर इतका परिणाम झाला की त्याने आपली शंभर एकर जमीन दान करण्याचा निर्णय घेतला. विनोबा भावे यांच्यावर याचा खूप प्रभाव पडला आणि त्यांना या घटनेला चळवळीचे स्वरूप देण्याची कल्पना आली. लाखो एकर जमीन मिळवून शेतकऱ्यांना मदत भावे यांच्या नेतृत्वाखाली भूदान चळवळ 13 वर्षे सुरू राहिली. यादरम्यान त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन सुमारे 58,741 किलोमीटरचे अंतर कापले. सुमारे 13 लाख गरीब शेतकऱ्यांची 44 लाख एकर जमीन त्यांनी संपादित केली. ऐच्छिक सामाजिक न्यायाच्या दृष्टीने त्यांच्या चळवळीचे जगभर कौतुक झाले. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही सरकारने भूदान कायदा केला, जेणेकरून जमिनीचे वितरण सुव्यवस्थितपणे करता येईल. मोठ्या शेतकऱ्यांना देणगी देण्यास प्रवृत्त करण्यासाठी ते अनेकदा म्हणायचे, “जमीन ही हवा आणि पाण्यासारखी आहे. त्यावर प्रत्येकाचा हक्क आहे. मला तुमचा मुलगा समजा आणि मला तुमच्या जमिनीचा एक षष्ठांश द्या. ज्यावर भूमिहीन स्थायिक होऊन शेती करून आपला उदरनिर्वाह करू शकतात.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Maharashtra

    पुढील बातम्या