मुंबई, 16 डिसेंबर : भारत-पाकिस्तान (Indo Pak) यांच्यात 1971 (1971 War) साली झालेल्या घनघोर युद्धात विमाने आणि मोठमोठ्या शस्त्रास्त्रांसोबतच भारतीय लष्कराने (Indian Army) सायकलींचाही वापर केला होता. अर्थात ऐकायला आणि वाचायला विचित्र वाटत असले तरी हेच सत्य आहे. लष्कराने आपल्या सोबत सायकली नेल्या होत्या. या सायकलच्या साहाय्याने बांग्लादेशात (Bangladesh) दूरवर असलेल्या सहकाऱ्यांना खास संदेश पाठवण्यात आला होता.
त्यामुळेच या युद्धात सैन्याने शस्त्रांसोबत सायकलचाही वापर करून ही लढाई जिंकली. मुक्ती वाहिनीला मदत करण्यासाठी लष्कर बांग्लादेशात आतपर्यंत घुसले होते. युद्धाच्या अखेरीस पाकिस्तच्या 93 हजार सैनिकांना आत्मसमर्पण करण्यास भारतीय लष्कराने भाग पाडले होते.
कॅप्टन निर्भय खास निरोप घेऊन सायकलवरून निघाले
1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाचे आणखी एक नायक कर्नल निवृत्त एसएम कुंजरू म्हणतात, “आम्हाला अचानक बांग्लादेशात जाण्याचा आणि तेथे आधीच लढत असलेल्या भारतीय सैन्याला मदत करण्याचा आदेश आला. 11 डिसेंबरच्या दुपारी, 2 पॅरा ग्रुप बटालियनच्या पॅरा कमांडोनी विमानातून उडी मारली आणि बांग्लादेशात ढाकापूर्वी थोड्या अंतरावर उतरले.
अशा प्रकारे शत्रूच्या प्रदेशात उतरण्यापूर्वी बरीच तयारी करावी लागते आणि बरेच सामान सोबत घ्यावे लागते. कारण आपण शत्रूच्या प्रदेशात जात आहोत, जिथे आपल्याला कोणीही मदत करणार नाही किंवा तिथे आपण कोणाला आधीच ओळखत नाही.
त्यामुळे पॅरा कमांडोज शस्त्रास्त्रांसोबत अशी छोटी सायकलही घेऊन जातात, जी वाहून नेताना खोलून नेता येते आणि शत्रूच्या हद्दीत पोहोचताच जोडून तयार होऊ शकते. जेव्हा आम्ही शत्रूच्या प्रदेशात पोहोचलो तेव्हा अशी वेळ आली की आम्हाला वायरलेस देखील वापरता येत नव्हते.
अशा परिस्थितीत फॉरवर्ड लाईनवर सहकाऱ्यांपर्यंत संदेश पोहोचणे खूप महत्त्वाचे होते. त्यानंतर सायकलच्या मदतीने कॅप्टन निर्भय शर्मा निरोप घेऊन निघाले. हे ते निर्भय शर्मा होते जे पाकिस्तानी लष्कराचे लेफ्टनंट जनरल एएके नियाझी यांच्या नावाने आत्मसमर्पणाचे पत्र घेऊन गेले होते.
'बोगराच्या लढाईत' जेव्हा पाक ब्रिगेडियरला लोकांनी रस्त्यावर पळूपळू मारलं..
पुढे कॅप्टन शर्मा लेफ्टनंट जनरल पदापर्यंत पोहोचले. निवृत्त झाल्यानंतर ते अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) आणि नंतर मिझोरामचे राज्यपालही होते. ते केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (UPSC) सदस्यही होते. मुख्य म्हणजे जनरल शर्मा यांनी काश्मीर (Kashmir) आणि ईशान्येत दहशतवादाविरुद्ध (Terrorism) खूप काम केले. त्यांच्या या शौर्याबद्दल त्यांना वेळोवेळी PVSM, UYSM, AVSM आणि VSM पुरस्कारही देण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bangladesh, Indian army, Pakistan army