मराठी बातम्या /बातम्या /explainer /

उपराष्ट्रपतींची निवडीची प्रक्रिया कशी असते? कोण करतं मतदान? 10 पॉईंटमध्ये समजून घ्या

उपराष्ट्रपतींची निवडीची प्रक्रिया कशी असते? कोण करतं मतदान? 10 पॉईंटमध्ये समजून घ्या

Vice President Election 2022, Jagdeep Dhankhar: उपराष्ट्रपतीसाठी जगदीप धनखर यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालच्या राज्यपालांचे ट्विट करून अभिनंदन केले. देशाच्या पुढील उपराष्ट्रपतीसाठी पुढील महिन्यात 6 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपला विजय मिळू शकतो कारण आकड्यांवर नजर टाकली तर भाजपची स्थिती भक्कम आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

नवी दिल्ली, 16 जुलै : देशात पुढील उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची (Vice President Election 2022) चर्चा सुरू झाली आहे. शनिवारी भाजपने पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) यांना एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत उपाध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून जगदीप धनखर यांच्या नावाची निवड करण्यात आली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते.

या निर्णयाची माहिती देताना राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या निवडीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत अनेक नावांवर चर्चा झाली. बरेच विचारमंथन केल्यानंतर, आम्ही या निष्कर्षावर पोहोचलो की आम्ही आमच्या शेतकरी मुलाचं नाव जगदीप धनखर जी यांचे नाव पुढे केलं आहे. जर ते जिंकले तर ते देशातील पहिले ओबीसी उपराष्ट्रपती असतील. नंतर पीएम मोदींनी त्यांच्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की जगदीप धनखर हे आमचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील ही अभिमानाची बाब आहे. पीएम मोदी म्हणाले की जगदीप धनखर यांनी नेहमीच शेतकरी, तरुण, महिला आणि उपेक्षित घटकांसाठी काम केले आहे.

उपराष्ट्रपतीसाठी जगदीप धनखर यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालच्या राज्यपालांचे ट्विट करून अभिनंदन केले. देशाच्या पुढील उपराष्ट्रपतीसाठी पुढील महिन्यात 6 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपला विजय मिळू शकतो. कारण आकड्यांवर नजर टाकली तर भाजप इतर पक्षांच्या तुलनेत जास्त ताकदवान आहे. भारतातील घटनेनुसार उपराष्ट्रपतीची निवड कशी केली जाते ते जाणून घेऊया.

उपराष्ट्रपतीपदासाठी जगदीप धनखड यांना उमेदवारी देऊन भाजपकडून एका दगडात तीन पक्षी

  • निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, यावेळी उपराष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया 5 जुलैपासून सुरू होणार आहे.
  • निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 जुलै आहे. दुसऱ्या दिवशी 20 जुलै रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. 22 जुलैपर्यंत उमेदवारांना त्यांची नावे मागे घेता येतील.
  • उपराष्ट्रपतींची निवड निवडणूक मतदार म्हणजेच इलेक्टोरल कॉलेजद्वारे केली जाते.
  • उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेचे खासदारच मतदान करतात. म्हणजे निवडणुकीत एकूण 788 मते पडू शकतात. परंतु, त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे एक जागा रिक्त आहे आणि नामनिर्देशित
  • सदस्यांच्या सात जागाही रिक्त आहेत. त्यामुळे आता इलेक्टोरल कॉलेजमध्ये एकूण सदस्यांची संख्या केवळ 776 आहे.
  • उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीतही नामनिर्देशित सदस्य सहभागी होतात. याउलट, नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करू शकत नाहीत.
  • सध्या लोकसभेतील खासदारांची संख्या 543 आहे, तर राज्यसभेतील खासदारांची संख्या 245 आहे.
  • उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला 388 मतांची आवश्यकता असते.
  • लोकसभेत भाजपच्या खासदारांची संख्या 303 तर राज्यसभेत भाजपच्या खासदारांची संख्या 92 आहे.

First published:

Tags: BJP