Home /News /explainer /

गोरखपूरमधून निवडणूक लढवणारे योगी दुसरे मुख्यमंत्री; इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? जाणून घ्या मनोरंज गोष्टी

गोरखपूरमधून निवडणूक लढवणारे योगी दुसरे मुख्यमंत्री; इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? जाणून घ्या मनोरंज गोष्टी

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

मुख्यमंत्री म्हणून विधानसभा निवडणूक लढवणारे योगी आदित्यनाथ हे गोरखपूर जिल्ह्यातील दुसरे नेते असतील. त्यांच्या अगोदर 1971 मध्ये त्रिभुवन नारायण सिंह यांनी मुख्यमंत्री असताना गोरखपूर जिल्ह्यातील मणिराम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्रं, त्यांचा पराभव झाला होता.

पुढे वाचा ...
    गोरखपूर, 20 जानेवारी : उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका (up election 2022) जाहीर झाल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) कुठून निवडणूक लढणार याबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता होती. अगोदर अयोध्येतून मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, आता  गोरखपूरमधून (Gorakhpur) निवडणूक लढणार असल्याचे जाहीर झाले आहे. मुख्यमंत्री म्हणून विधानसभा निवडणूक लढवणारे योगी आदित्यनाथ हे गोरखपूर जिल्ह्यातील दुसरे नेते असतील. त्यांच्या अगोदर 1971 मध्ये त्रिभुवन नारायण सिंह यांनी मुख्यमंत्री असताना गोरखपूर जिल्ह्यातील मणिराम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्रिभुवन नारायण सिंह हे मुख्यमंत्रीपदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्याचा दाखला देत विरोधी पक्ष सीएम योगी यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. मात्र, गोरखपूरमधील सर्वसामान्य रहिवाशांना आशा आहे की, योगी तिथून निवडून आले तर प्रदेशाचा विकास होईल. गोरखपूर हे योगी आदित्यनाथ यांचे होम टाऊन आहे. 1998 पासून ते 2017 मध्ये मुख्यमंत्री होईपर्यंत ते गोरखपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. शनिवारी गोरखपूर सदर जागेवरून सीएम योगी यांना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बनवल्यानंतर राजकीय पक्षांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ट्विट केले की, "कधी मथुरा म्हटले, कधी अयोध्या आणि आता म्हणत आहे गोरखपूर, जनतेच्या अगोजर त्यांच्या पक्षानेच त्यांना घरी पाठवले आहे. प्रत्यक्षात त्यांना तिकीट मिळाले नाही, तर त्यांचे परतीचे तिकीट कापले गेले आहे. काही दिवसांपूर्वी, भाजपचे राज्यसभा सदस्य हरनाथ सिंह यादव यांनी पक्ष नेतृत्वाला पत्र लिहून मुख्यमंत्री योगी यांना मथुरा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याची मागणी केली होती, त्याचवेळी योगी अयोध्येतून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा माध्यमांमध्ये होती. गोवा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची यादी जाहीर; उत्पल पर्रिकरांना मोठा झटका गोरखपूरमधून मुख्यमंत्री योगी यांच्या उमेदवाराची घोषणा आणि विरोधी पक्षांच्या प्रतिक्रियांदरम्यान, भाजपने रविवारी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले, “आमचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूरमधून निवडणूक लढवत आहेत. बुवा (मायावती), बबुआ (अखिलेश यादव) आणि श्रीमती वाड्रा जी (प्रियांका गांधी वाड्रा) यांना तुम्ही कोणत्या जागेवरून निवडणूक लढवत आहात किंवा पराभवाच्या भीतीने निवडणूक लढणार नाही, हे सांगितले पाहिजे. गोरखपूर भागातील भाजपचे ज्येष्ठ नेते अजय तिवारी यांनी दावा केला, "योगी मुख्यमंत्री असताना माफिया, गुन्हेगार आणि भ्रष्टाचाऱ्यांचा थरकाप उडत होता. आता त्यांची उमेदवारी घोषित झाल्याने विरोधकांची झोप उडाली आहे. मूळचे गोरखपूरचे रहिवासी असलेले कॅप्टन मिश्रा म्हणाले, "काँग्रेस योगींच्या विरोधात तगडा उमेदवार उभा करेल, ज्याप्रमाणे गोरखपूरच्या मणिराममध्ये त्रिभुवन नारायण सिंह यांचा काँग्रेसचे पंडित राम कृष्ण द्विवेदी यांच्याकडून पराभव झाला होता, त्याचप्रमाणे यावेळी योगींचा पराभव काँग्रेस उमेदवार करेल. डॉ. अग्रवाल हे भाजपचे आमदार असतानाही त्यांचा कार्यकाळ कौतुकास्पद असून लोकप्रिय आमदाराच्या दुर्लक्षाचा हिशोब जनता नक्कीच घेईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, 2002 पासून गोरखपूर शहरातून सलग निवडणुका जिंकणारे डॉ. राधामोहन दास अग्रवाल यांनी पीटीआय-भाषाला सांगितले की, "मी पक्षाचा समर्पित कार्यकर्ता आहे आणि पक्षाच्या निर्णयाचे स्वागत करतो." उल्लेखनीय म्हणजे ऑक्टोबर 1970 मध्ये त्रिभुवन नारायण सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले तेव्हा काँग्रेस दोन गटात विभागली गेली होती. त्यानंतर काँग्रेसने राज्यातील चौधरी चरणसिंग यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला. काँग्रेसच्या एका गटाने त्रिभुवन नारायण सिंह यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आणि 18 ऑक्टोबर 1970 रोजी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर सिंह यांनी गोरखपूरच्या मणिराम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या जागेवरून योगी आदित्यनाथ यांचे गुरू महंत अवैद्यनाथ हिंदू महासभेतून आमदार म्हणून निवडून आले आणि त्यानंतर खासदार. त्यांचे गुरु महंत दिग्विजय नाथ यांच्या निधनानंतर त्यांच्या गोरखपूर संसदीय जागेवर पोटनिवडणूक जिंकून ते खासदार झाले. चुकीच्या इंजेक्शनने सुरू झाली मुलायम यांची Love Story;अखिलेश यांची जखम आजही ताजी महंत अवैद्यनाथ यांनी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि काँग्रेस संघटना (संघटन) उमेदवार त्रिभुवन नारायण सिंह यांना पाठिंबा दिला. त्यानंतर निवडणुकीत काँग्रेसचे (इंदिरा) उमेदवार रामकृष्ण द्विवेदी यांनी सिंग यांचा पराभव केला. पराभवानंतर त्रिभुवन नारायण सिंह यांनी 3 एप्रिल 1971 रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. गोरखपूरच्या पनियारा (आता महाराजगंज जिल्ह्यातील) विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकलेले वीर बहादूर सिंह हे 24 सप्टेंबर 1985 ते 24 जून 1988 या काळात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही होते, परंतु त्यांना मुख्यमंत्री म्हणून निवडणूक लढवण्याची संधी मिळाली नाही. . येथील गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार राणा राहुल सिंग हे दुसऱ्या क्रमांकावर होते. मात्र, डॉ. अग्रवाल आणि त्यांच्या मतांमध्ये मोठी तफावत होती. डॉ. अग्रवाल यांना एक लाख 22 हजारांहून अधिक मते मिळाली, तर राहुल सिंह यांना केवळ 61 हजार मतांवर समाधान मानावे लागले. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आयपी सिंग यांनी सोमवारी 'पीटीआय-भाषा'ला सांगितले, “आमचे राष्ट्रीय अध्यक्ष (अखिलेश यादव) यांचा दावा 100% खरा ठरेल कारण 2018 च्या लोकसभा निवडणुकीत सपाने गोरखपूरमधून भाजपचा पराभव केला होता. डॉ. राधामोहन दास अग्रवाल यांच्या तिकीट कापणे, अंतर्गकलह, लबाडी आणि द्वेषाचे राजकारण यामुळे योगींचा निश्चित असून संपूर्ण राज्यातून भाजपचा सफाया होणार आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Assembly Election, UP Election, Yogi Aadityanath

    पुढील बातम्या