Home /News /explainer /

युक्रेनचे संकट जगाला शीतयुद्धाकडे ढकलत आहे का? युरोपमध्ये युद्धाची परिस्थिती?

युक्रेनचे संकट जगाला शीतयुद्धाकडे ढकलत आहे का? युरोपमध्ये युद्धाची परिस्थिती?

युक्रेनच्या (Ukraine) सीमेवर रशियन (Russian) सैन्याचा वावर वाढल्याने युरोपमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या देशाची सामरिक परिस्थिती, क्रिमियावर रशियासोबतचा तणावपूर्ण इतिहास, या प्रदेशात अमेरिकेच्या (USA) नेतृत्वाखालील नाटोची वाढती पोहोच यासारख्या घटना घडत आहेत. सध्या जगातील अनेक देश या प्रकरणी आपली चिंता व्यक्त करत आहेत. अशाच गोष्टींमुळे शीतयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पुढे वाचा ...
    कीव Kyiv, 24 जानेवारी : गेल्या अनेक दिवसांपासून युक्रेनबाबत (Ukraine) अमेरिका (US) आणि रशिया (Russia) यांच्यातील तणाव वाढत आहे. रशियाला अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांकडून सतत इशारे दिले जात आहे. अशा परिस्थिती रशिया आणि अमेरिका यांच्यात बैठकांची एक फेरी झाली असून पहिल्या बैठकीत दोघेही केवळ चर्चा सुरू ठेवण्याचा निर्णय घेऊ शकले आहेत. गेल्या दीड महिन्यांपासून ज्या प्रकारच्या घटना घडत आहेत, त्यावरून जग पुन्हा शीतयुद्धाच्या युगात गेल्याचे दिसतंय. खरेच असे घडते आहे का? याचेही विश्लेषण केले जात आहे. युक्रेनचा पश्चिमेकडे कल युक्रेन युरोपीय संस्थांशी जवळीक वाढवत असून नाटोचा सदस्य होणार असल्याच्या रशियाच्या आरोपाने या संकटाची सुरुवात झाली आहे. यानंतर युक्रेनच्या सीमेवर रशियन सैन्याची संख्या वेगाने वाढू लागली, त्यानंतर पाश्चिमात्य देशांकडूनही कठोर प्रतिक्रिया येऊ लागल्या. शीतयुद्धासारखी परिस्थिती? सध्याच्या वादविवाद शीतयुद्धाच्या काळात दिसायचे तसे आहेत. युक्रेनवर हल्ला केल्यास रशियाला मोठी किंमत मोजावी लागेल, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते. बिडेन यांनी पाश्चिमात्य देशांवर मोठ्या आर्थिक निर्बंधांचा इशाराही दिला. असाच इशारा नाटो सदस्य आणि युरोपीय देशांनीही दिला होता. सीमेवर लष्करी छावणी युक्रेन आणि क्रिमियाजवळील रशियन सीमेवर मोठ्या संख्येने युद्ध परिस्थितीत दिसणाऱ्या सैन्याप्रमाणेच सैन्य गोळा झाल्याचे सॅटेलाईट फोटोंवरुन लक्षात येत आहे. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार रशियाने आपल्या पूर्व सीमेवर एक लाख सैनिक तैनात केले आहेत. युक्रेन हा सोव्हिएत युनियनचा एक भाग आहे. इथली भाषा फक्त रशियनच नाही तर सांस्कृतिकदृष्ट्या दोन्ही देश एकच आहेत. रशियानंतर हा युरोपमधील दुसरा सर्वात मोठा देश आहे. अमेरिकेनं Ukraine मधील अधिकाऱ्यांच्या कुटुंबांना बोलावलं परत, धाडणार सैनिक नाटो प्रवेश युक्रेनचे शेजारी देश सोव्हिएत युनियनला विरोध करण्यासाठी शीतयुद्धाच्या काळात तयार करण्यात आलेल्या NATO या लष्करी संघटनेचे सदस्य आहेत. शीतयुद्ध संपल्यानंतरही नाटोची सक्रियता सुरूच आहे. ज्याला रशिया स्वतःसाठी धोका मानतो. युक्रेनच्या सीमेला लागून असलेले पोलंड, स्लोव्हाकिया, रोमानिया, हंगेरी हे देश नाटोचे सदस्य झाले आहेत. अशा स्थितीत रशियाच्या सीमेला लागून असलेल्या युक्रेनचे नाटोमध्ये सामील होणे नेहमीच रशियासाठी धोक्याचे ठरले आहे. युक्रेनचा नाटोकडे कल 2014 पासून रशियाने क्रिमियाला जोडल्यामुळे युक्रेन नाटोमध्ये सामील होण्याची शक्यता वाढली आहे. युक्रेनने रशियन-समर्थित राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच यांना सत्तेवरून हटवल्यापासून, रशियाने पूर्व युक्रेनमधील फुटीरतावाद्यांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे, ज्याने डॉनबास म्हणून ओळखल्या जाणार्‍या पूर्व युक्रेनचा भाग व्यापला आहे. रशियाच्या मागण्या युक्रेनने नाटोचे सदस्य व्हावे असे रशियाला मुळीच वाटत नाही. त्यामुळे नाटोच्या नावाखाली अमेरिकन सैन्य रशियाच्या सीमेवर येईल. आता रशियाने थेट युक्रेनला नाटोचे सदस्य होऊ देऊ नये, अशी मागणी केली आहे. नाटोने पूर्व युरोपमधील लष्करी हालचाली थांबवाव्यात अशी रशियाची मागणी आहे. ज्यामध्ये पोलंड आणि बाल्टिक हे मुख्य क्षेत्र आहेत. नाटो किंवा इतर कोणत्याही संघटनेच्या माध्यमातून पश्चिमेचा विस्तार पूर्वेकडे होणार नाही याची हमी मागितली आहे. एकमेकांकडून दिसणारी परिस्थिती आणि तणाव हे अगदी शीतयुद्धासारखेच आहेत यात शंका नाही. नाटोचे म्हणणे आहे की युक्रेनचे सदस्य व्हायचे की नाही हे तो पूर्णपणे ठरवेल. त्याचवेळी, रशियालाही युक्रेनवर हल्ला करायचा नाही पण आवश्यक पावले उचलण्याची तयारी केली आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: America, Russia, USA

    पुढील बातम्या