मुंबई, 14 जानेवारी : मकर संक्रांती (makar sankranti 2022) हा असा एक सण आहे, जो भारतातील विविध राज्यांमध्ये अनेक नावांनी आणि अनेक प्रकारे साजरा केला जातो. पण, वर्षाभरता 12 संक्राती येतात हे तुम्हाला माहीत आहे का? जेव्हा सूर्य (Sun) एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा त्याला संक्रांती म्हणतात. सूर्य एका वर्षात 12 राशींसोबत असं करतो, त्यामुळे 12 सूर्य संक्रांती येतात. या वेळेला सौर महिना देखील म्हणतात. या 12 संक्रांतांपैकी 4 संक्रांत अधिक महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यात मकर संक्रांत सर्वात महत्त्वाची मानली जाते.
मकर राशीव्यतिरिक्त जेव्हा सूर्य मेष, तूळ आणि कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा ही संक्रांतही महत्त्वाची मानली जाते. हिंदू धर्मातील दिनदर्शिका सूर्य, चंद्र आणि नक्षत्रांवर आधारित असल्याने, सूर्य आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
ज्याप्रमाणे चंद्रवर्षाला दोन बाजू असतात - शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष, त्याचप्रमाणे सौर वर्षाचे म्हणजे वर्षाचे दोन भाग असतात - उत्तरायण आणि दक्षिणायण. सूर्य वर्षाचा पहिला महिना मेष असतो तर चंद्र वर्षातील महला महिना चैत्र असतो.
मकर संक्रांत ही सर्वात खास का आहे?
जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा उत्तरायण चालू होते. त्यावेळी पृथ्वीचा उत्तर गोलार्ध सूर्याकडे वळतो. त्यानंतर सूर्य उत्तरेकडून उगवायला लागतो. तो पूर्वेऐवजी उत्तरेकडून सरकतो. सूर्य उत्तरायणात 6 महिने आणि दक्षिणायन 6 महिने राहतो. उत्तरायण हा देवांचा दिवस आणि दक्षिणायन हा पितरांचा दिवस मानला जातो. मकर संक्रांतीचा दिवस चांगला पक्वानं खाण्यापासून सुरू होतो.
उत्तरायणाचे महत्त्व सांगताना भगवान श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे की, जेव्हा सूर्यदेव उत्तरायण सुरू करतात, तेव्हा या प्रकाशात शरीराचा त्याग केल्याने माणसाचा पुनर्जन्म होत नाही, असे लोक थेट ब्रह्माची प्राप्ती करतात.
मेष संक्रांती काय आहे?
जेव्हा सूर्य मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा ती मेष संक्रांत असते. सूर्य मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करतो. या दिवशी पंजाबमध्ये बैशाख सण साजरा केला जातो. बैसाखीच्या वेळी आकाशात विशाखा नक्षत्र असते. हा दिवसही सणासारखा साजरा केला जातो. याला शेतीचा सण असेही म्हणतात, कारण रब्बी पीक पक्व होऊन तयार होतात.
मकरसंक्रांत दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीलाच का असते?
तूळ संक्रांती कधी असते?
सूर्याच्या तूळ राशीत प्रवेशाला तूळ संक्रांती म्हणतात. हे ऑक्टोबरच्या मध्यभागी घडते. कर्नाटकात याला विशेष महत्त्व आहे. त्याला 'तुळ संक्रमण' असेही म्हणतात. या दिवशी 'तीर्थोद्भव' नावाने कावेरीच्या तीरावर जत्रा भरते. गणेश चतुर्थीलाही याच तूळ महिन्यात सुरुवात होते. कार्तिक स्नान सुरू होते.
कर्क ही चौथी महत्त्वाची संक्रांती
मकर संक्रांती ते कर्क संक्रांती दरम्यान 6 महिन्यांचे अंतर आहे. या दिवशी सूर्य मिथुन सोडून कर्क राशीत प्रवेश करतो.
याबरोबर दक्षिणायन सुरू होते. दक्षिणायनमध्ये वर्षा, शरद आणि हेमंत असे तीन विशेष ऋतू आहेत. या दरम्यान रात्री मोठ्या होऊ लागतात. कर्क संक्रांती जुलैच्या मध्यात येते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Festival, Makar Sankranti