मराठी बातम्या /बातम्या /explainer /

No Parking मध्ये उभ्या असलेल्या गाडीचा फोटो पाठवा अन् 500 मिळवा, गडकरींच्या 'मालामाल' योजनेत किती तथ्य?

No Parking मध्ये उभ्या असलेल्या गाडीचा फोटो पाठवा अन् 500 मिळवा, गडकरींच्या 'मालामाल' योजनेत किती तथ्य?

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Union Transport Minister Nitin Gadkari) यांनी पार्किंगच्या समस्येला आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या वादविवादाला आळा घालण्यासाठी असा कायदा आणण्याची योजना आखली जात असल्याचं एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं आहे.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Union Transport Minister Nitin Gadkari) यांनी पार्किंगच्या समस्येला आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या वादविवादाला आळा घालण्यासाठी असा कायदा आणण्याची योजना आखली जात असल्याचं एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं आहे.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Union Transport Minister Nitin Gadkari) यांनी पार्किंगच्या समस्येला आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या वादविवादाला आळा घालण्यासाठी असा कायदा आणण्याची योजना आखली जात असल्याचं एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 18 जून : अनेक मोठ्या शहरांमध्ये वाहतुकीची (Traffic) समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरांमध्ये वाहतुकीच्या समस्येसोबतच वाहन पार्किंगचा (Vehicle parking) प्रश्न देखील गंभीर आहे. वाहन पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा विविध उपाययोजना आणि दंडात्मक कारवाईसारखे पर्याय अवलंबते. परंतु, हा प्रश्न `जैसे थे` आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आता एक अनोखी उपाययोजना राबवली जाणार आहे. जर तुमच्या परिसरात एखाद्या व्यक्तीनं चुकीच्या पद्धतीनं वाहन पार्किंग केलं असेल, तर तुम्ही त्या वाहनाचा फोटो काढून संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना पाठवल्यास तुम्हाला 500 रुपयांचं बक्षीस मिळू शकणार आहे.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Union Transport Minister Nitin Gadkari) यांनी पार्किंगच्या समस्येला आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या वादविवादाला आळा घालण्यासाठी असा कायदा आणण्याची योजना आखली जात असल्याचं एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं आहे. बक्षीस देण्याची ही उपाययोजना नेमकी कशी असेल, ती कशारितीने राबवली जाईल आणि यातून खरोखरच समस्या सुटेल का असे अनेक प्रश्न तुमच्या मनात निश्चित असतील. याबाबतची माहिती `फर्स्टपोस्ट डॉट कॉम`ने दिली आहे.

नवीन योजनेत किती तथ्य?

दिल्ली येथे नुकतीच इंडस्ट्रियल डिकार्बोनायझेशन समिट 2022 (Industrial Decarbonization Summit 2022) चं आयोजन करण्यात आलं होतं. ``वाहन पार्किंगबाबत लवकरच एक नवा कायदा आणला जाईल. त्याअंतर्गत चुकीच्या पद्धतीनं पार्क केलेल्या वाहनाचा फोटो पाठवणाऱ्याला 500 रुपयांचे बक्षीस दिलं जाईल. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला 1000 रुपये दंड ठोठावला जाईल,`` असं या समिटच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितलं. गडकरी यांनी वाहन पार्किंग बाबतच्या संभाव्य कायद्याविषयी केलेलं सूतोवाच प्रत्यक्षात खरंच किती प्रभावी आणि उपयुक्त ठरु शकतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. तसंच खरोखर असा कायदा आणण्याबाबत त्यांचा विभाग काम करत आहे का याबद्दल सत्य माहिती अद्याप मिळालेली नाही.

Agnipath Scheme : 4 वर्षानंतर काय करणार अग्निवीर? गृहमंत्रालयानं तयार केला खास प्लॅन

वाहन विक्रीत वाढ

देशात कोरोनाच्या (Corona) साथीमुळे कारच्या विक्रीत मोठी घट झाली. मात्र, आता विक्री वाढताना दिसत आहे. `एनडीटीव्ही`च्या वृत्तानुसार, मे 2022 मध्ये देशातल्या डीलर्सना प्रवासी वाहनं पाठवण्याचं प्रमाण दुपटीनं वाढलं आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात हाहाकार माजवला होता. तेव्हा हे प्रमाण खूप कमी होतं. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने (SIAM) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी मे महिन्यात एक लाखांपेक्षा कमी प्रवासी युनिट्सची (Passenger Unit) विक्री झाली होती. त्या तुलनेत यंदा हे प्रमाण वाढलं आहे. मे 2022 मध्ये 2.5 लाख युनिट्सची विक्री झाली आहे. यात दुचाकी आणि तीन चाकी वाहनं वगळता कार तसेच अन्य वाहनांचा समावेश आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यात दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसह अन्य प्रवासी वाहनांची पाच लाखांपेक्षा कमी विक्री झाली होती. यावर्षी ही संख्या 15 लाखांच्या पुढे गेली आहे, असं एका अहवालात म्हटलं आहे. यावरून एकूण प्रवासी वाहनांच्या विक्रीत वाढ झाल्याचं दिसून येतं.

ही सर्व पार्श्वभूमी पाहता, केंद्रीय मंत्र्यांनी केलेलं हे विधान चेष्टेनं केलं आहे की खरोखरच यासाठी कायदेशीर चौकट आखली जात आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. देशातल्या शहरी भागांमध्ये कारची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात चुकीचं पार्किंग धोकादायक ठरू शकतं. या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी विधान केलं असावं.

लष्करभरतीचा अग्निपथ कार्यक्रम कसा असेल? हे आहेत गैरसमज अन् वस्तुस्थिती

यावेळी गडकरी म्हणाले, ``आजकाल प्रत्येकाला स्वमालकीची कार (Car) असावी, असं वाटतं. कारण ही गोष्ट प्रत्येकासाठी गरजेची बनली आहे. आजकाल चार व्यक्तींचं कुटुंब असेल तर त्यांच्याकडं सहा वाहनं असतात. पार्किंगसाठी नवी जागा कोणीही बांधत नाही किंवा त्यासाठी नव्यानं सोय केली जात नाही. उदाहरण द्यायचं झालं तर दिल्लीत रुंद रस्त्यांना पार्किंगची जागा समजलं जातं.’ ‘नागपुरातील माझ्या घरासमोर 12 गाड्यांच्या पार्किंगसाठी जागा आहे. मी रस्त्यावर वाहन अजिबात पार्क करत नाही,’ असं गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केलं.

`लाईव्ह मिंट`च्या वृत्तानुसार, मंत्री गडकरी म्हणाले, ``लोक त्यांच्या वाहनांसाठी पार्किंगची जागा तयार करत नाहीत. त्याऐवजी वाहनं उभी करण्यासाठी रस्त्याचा वापर करतात, ही बाब खेदजनक आहे.``

वाहनांची गरज, विक्रीची सद्यःस्थिती आणि पार्किंगची समस्या पाहता, गडकरी यांनी नमूद उपाय कितपत फायदेशीर ठरतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

First published:

Tags: Nitin gadkari, Traffic Rules