मुंबई, 25 जानेवारी : यावेळी 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर 29 जानेवारीला बीटिंग रिट्रीट (Beating retreat) होणार आहे. मात्र, त्यात बदल करून 'अबाइड विथ मी' गाण्याऐवजी 'ए मेरे वत के लोगो' (a mere watan ke logo) ही धून वाजवली जाणार आहे. हे गाणे देशाच्या सैन्याचा सन्मान करणारे मानले गेले आहे. हे पहिल्यांदा 26 जानेवारी 1963 रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर गायले गेले. या गाण्याची निर्मिती कशी झाली. लोकांच्या जिभेवर कसं रुळलं याचीही वेगळी कहाणी आहे.
हे सदाबहार क्लासिक गाणे कवी प्रदीप यांनी लिहिले असून ते पहिल्यांदा लता मंगेशकर यांनी गायले होते. लतादीदी जेव्हा ते गात होत्या तेव्हा वातावरण इतके भावूक झाले होते की नेहरूंसह बहुतेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
या गाण्याचा जन्म कसा झाला?
या गाण्याचा जन्म कसा झाला हे माहीत आहे का? कवी प्रदीप यांनी नंतर एका मुलाखतीत हे गाणे कसे बनले ते सांगितले. 1962 च्या भारत-चीन युद्धात भारताचा दारुण पराभव झाला होता. संपूर्ण देशाचे मनोबल खचले होते. अशा परिस्थितीत सर्वांचा उत्साह आणि मनोधैर्य कसे वाढवता येईल यासाठी लोकांनी चित्रपट जगत आणि कवींकडे पाहिले.
मग या कवींना लिहायला सांगितले
सरकारनेही चित्रपटसृष्टीला याबाबत काहीतरी करण्याची विनंती केली, जेणेकरून देशात पुन्हा उत्साह संचारेल आणि चीनकडून झालेल्या पराभवाच्या दु:खावर फुंकर मारली जाईल. त्या काळात कवी प्रदीप यांनी अनेक देशभक्तीपर गीते लिहिली होती. त्यामुळे त्यांना गाणे लिहिण्यास सांगितले. त्यावेळी चित्रपटविश्वातील तीन महान गायकांची चलती होती. मोहम्मद रफी, मुकेश आणि लता मंगेशकर.
अन् एक भावनिक गाणे लिहिले गेले
रफी आणि मुकेश यांच्या आवाजात काही देशभक्तीपर गाणी गायली गेल्याने लता मंगेशकर यांना नवीन गाणे देण्याची कल्पना सुचली. पण त्यात अडथळा आला. त्यांचा आवाज मऊ आणि रेशमी होता. उत्कट गाणे कदाचित त्यात बसणार नाही. मग कवी प्रदीप यांनी एक भावनिक गाणे लिहिण्याचा विचार केला.
नेहरूंच्याही डोळ्यात अश्रू
अशा प्रकारे 'ए मेरे वतन के लोगों' या गाण्याचा जन्म झाला. लतादीदींनी जेव्हा दिल्लीतील रामलीला मैदानावर नेहरूंसमोर गाणे गायले तेव्हा त्यांच्या डोळ्यातही अश्रू तरळले. या गाण्याने कवी प्रदीप यांना अजरामर केले, तर लता मंगेशकर या गाण्याशी कायमच्या अशा प्रकारे जोडल्या गेल्या की त्यांचीही मोठी ओळख बनली. या गीताचा महसूल युद्धविधवा निधीत जमा करण्याचे आवाहन कवी प्रदीप यांनी केले.
..अन् 'त्या' घटनेनंतर विनोबा भावे यांनी सुरू केली भूदान चळवळ! काय होती घटना?
अशा प्रकारे त्यांनी चित्रपटात गाणी लिहिण्यास सुरुवात केली
कवी प्रदीप हे शिक्षक होते. ते कविताही लिहायचे. एकदा त्यांना काही कामानिमित्त मुंबईला जायचे होते. तिथे त्यांनी कविसंमेलनात भाग घेतला. त्यावेळी बॉम्बे टॉकीजमध्ये काम करणारी एक व्यक्ती आली. त्यांना त्यांची कविता खूप आवडली आणि त्यांनी ती बॉम्बे टॉकीजचे मालक हिमांशू राय यांना ऐकवली. हिमांशू राय यांच्याशी त्यांची ओळख झाली. हिमांशू राय यांना त्यांच्या कविता खूप आवडल्या. त्यांना ताबडतोब दरमहा 200 रुपये देण्यात आले, जे त्यावेळी खूप मोठी रक्कम होती.
अनेक हिट देशभक्तीपर गाणी लिहिली
कवी प्रदीप यांचे मूळ नाव 'रामचंद्र नारायणजी द्विवेदी' होते. त्यांचा जन्म मध्य प्रदेश प्रांतातील उज्जैनमधील बदनगर नावाच्या ठिकाणी झाला. कवी प्रदीपची ओळख 1940 मध्ये रिलीज झालेल्या बंधन या चित्रपटाने झाली. मात्र, 1943 च्या गोल्डन ज्युबिली हिट फिल्म किस्मतमधील "दूर हटो ए दुनिया वाला हिंदुस्तान हमारा है" या गाण्याद्वारे ते इतके महान गीतकार बनले, ज्यांच्या देशभक्तीपर गाण्यांवर लोक नाचायचे. या गाण्यावर तत्कालीन ब्रिटिश सरकार त्यांच्यावर संतापले. त्याच्या अटकेचे आदेश देण्यात आले. पळून जाण्यासाठी ते भूमिगत झाले होते.
दादा फाळके पुरस्काराने सन्मानित
5 दशकांच्या आपल्या व्यवसायात कवी प्रदीप यांनी 71 चित्रपटांसाठी 1700 गाणी लिहिली. त्यांच्या देशभक्तीपर गीतांपैकी बंधन (1940) चित्रपटातील "चल चल रे नौजवान", जागृती (1954) चित्रपटातील "आओ बच्चों तुम्हें दिखाएं", "दे दी हमे आझादी बिना खडग ढाल" आणि "जय संतोषी माँ" चित्रपट "जय संतोषी माँ" (1975). “यहां वहां जहां तहां मत पूछो कहां-कहां. भारत सरकारने 1997-98 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले. कवी प्रदीप यांचे 1998 मध्ये निधन झाले.
संगीत देखील हृदयस्पर्शी
'ए मेरे वतन के लोगो' या गाण्याला संगीत सी. रामचंद्र यांनी दिले आहे. याची धून हृदयस्पर्शी होती. सी रामचंद्र यांना चितळकर किंवा अण्णा साहिब म्हणूनही ओळखले जात होते. ते चित्रपटांमध्ये संगीत दिग्दर्शक होते आणि अधूनमधून पार्श्वगायकाची भूमिका करत असे. त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांना संगीत दिले. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1918 रोजी अहमदनगर येथे एका मराठी कुटुंबात झाला. 5 जानेवारी 1964 रोजी त्यांचे निधन झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.