मराठी बातम्या /बातम्या /explainer /Explainer : देशात दर चौथ्या मिनिटाला होते आत्महत्या; महाराष्ट्र अव्वल, ही आहेत मुख्य कारणं

Explainer : देशात दर चौथ्या मिनिटाला होते आत्महत्या; महाराष्ट्र अव्वल, ही आहेत मुख्य कारणं

देशातल्या आत्महत्यांचं प्रमाण वाढत असून, तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात 14 ते 30 या वयोगटातल्या आत्महत्यांचं (Youth Suicide) प्रमाण सर्वांत जास्त आहे. तसंच, या वयोगटातल्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत.

देशातल्या आत्महत्यांचं प्रमाण वाढत असून, तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात 14 ते 30 या वयोगटातल्या आत्महत्यांचं (Youth Suicide) प्रमाण सर्वांत जास्त आहे. तसंच, या वयोगटातल्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत.

देशातल्या आत्महत्यांचं प्रमाण वाढत असून, तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात 14 ते 30 या वयोगटातल्या आत्महत्यांचं (Youth Suicide) प्रमाण सर्वांत जास्त आहे. तसंच, या वयोगटातल्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत.

पुढे वाचा ...

  नवी दिल्ली 03 ऑगस्ट : माणूस जगण्याला कंटाळला, निराश झाला, त्याला कोणत्या तरी गोष्टीचा प्रचंड ताण आला किंवा आपल्या मनासारखं काहीच होत नाहीये, आपला कायमच पराभाव होतोय अशी धारणा त्याच्या मनात पक्की झाली, की तो चिडखोर होतो. आतल्या आत कुजत राहतो. त्याच्या भावना ऐकून घेणारं, त्याला समजून घेणारं कोणीच त्याला मिळालं नाही, तर तो आत्महत्येसारखं (Suicide) टोकाचं पाऊल उचलू शकतो. 2017 ते 2019 या कालावधीत देशात कोणकोणत्या कारणांनी किती जणांनी आत्महत्या केल्या, याची माहिती केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी 30 जुलै 2021 रोजी लोकसभेत (Loksabha) दिली.

  देशातल्या आत्महत्यांचं प्रमाण वाढत असून, तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात 14 ते 30 या वयोगटातल्या आत्महत्यांचं (Youth Suicide) प्रमाण सर्वांत जास्त आहे. तसंच, या वयोगटातल्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात (Maharashtra) झाल्या असून, कौटुंबिक वाद (Domestic Dispute) हे या वयोगटातल्या आत्महत्यांचं प्रमुख कारण आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या (Farmer Suicide) बाबतीतही देशात महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. 'दैनिक भास्कर'ने याबद्दलचं सविस्तर वृत्त दिलं आहे.

  Explainer: आसाम-मिझोराम वादाचं मूळ कशात? काय आहे ब्रिटीश कनेक्शन?

  आत्महत्येला पाप मानलं जातं. तसंच, आत्महत्या हा कायद्याच्या दृष्टीने गुन्हा आहे. हे माहिती असूनही माणसाचे सगळे प्रयत्न संपले, की तो नाईलाजाने आत्महत्येचं कठोर पाऊल उचलतो. 'नॅशनल क्राइम रेकॉर्डस् ब्यूरो'तर्फे (NRCB) देशातल्या अन्य गुन्ह्यांसोबतच आत्महत्येच्या गुन्ह्यांचीही आकडेवारी नोंदवली जाते. त्या आकडेवारीतून हे स्पष्टपणे दिसून येतं, की देशातल्या आत्महत्यांचं प्रमाण वाढतं आहे. 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये आत्महत्येच्या आकडेवारीत 3.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2019 या वर्षात 1.39 लाखांहून अधिक नागरिकांनी आत्महत्या केली. याचाच अर्थ असा, की देशात दर चार मिनिटांना एक या हिशेबाने आत्महत्या होत आहेत. ही तर गंभीर बाब आहेच; मात्र त्याहून गंभीर बाब अशी आहे, की देशाचं भविष्य म्हणून ज्या युवा पिढीकडे पाहिलं जातं, त्या युवा पिढीतल्या आत्महत्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे.

  एकूण आत्महत्यांपैकी 14 ते 30 या वयोगटातल्या आत्महत्यांचं प्रमाण तब्बल 41 टक्के एवढं आहे. तसंच, सर्वाधिक युवकांच्या आत्महत्या कौटुंबिक वादांमुळे होत असल्याचं आढळलं आहे. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतातली कुटुंबव्यवस्था पुरातन काळापासून खूप चांगली, आदर्शवत आहे, असं आपण अभिमानाने सांगतो. त्या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी काही वेगळंच सांगते आहे. तसंच, महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट अशी, की 14 ते 30 या वयोगटातल्या व्यक्तींच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. महाराष्ट्रात 2017, 2018 आणि 2019 या तीन वर्षांत 14 ते 30 या वयोगटातल्या अनुक्रमे 6420, 6516, 6842 एवढ्या व्यक्तींनी आत्महत्या केल्या. त्याखालोखाल या वयोगटातल्या आत्महत्यांचं प्रमाण मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, कर्नाटक या राज्यांत आहे.

  कौटुंबिक वादांनंतर आत्महत्येला भाग पाडणारं दुसरं कारण आहे असाध्य आजार. त्यानंतर विवाहाबद्दलच्या समस्या, परीक्षेत नापास होणं, बेरोजगारी या कारणांचा क्रमांक लागतो.

  Explainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून? वाचून ज्ञानात पडेल भर

  2017 ते 2019 या कालावधीत सर्वाधिक आत्महत्या कौटुंबिक भांडणांमुळे झाल्या आहेत. 2019 मध्ये झालेल्या 79,607 आत्महत्यांपैकी 23 टक्के आत्महत्यांमागे कौटुंबिक वाद हे कारण होतं. त्यात 18 ते 30 या वयोगटातल्या व्यक्तींची संख्या सर्वाधिक होती. या तीन वर्षांत 202 महिलांनी शारीरिक अत्याचाराला कंटाळून मृत्यूला जवळ केलं. त्यात 14 ते 18 वयोगटातल्या तरुणींची संख्या निम्म्याहून अधिक आहे.

  2019च्या आकडेवारीचा विचार केला, तर 14 ते 18 या वयोगटातल्या म्हणजे किशोरावस्थेतल्या मुलांनी आत्महत्या करण्यामागे तीन महत्त्वाची कारणं दिसून आली. ती म्हणजे कौटुंबिक वाद, परीक्षेत नापास होणं आणि प्रेमप्रकरण. या वयोगटातल्या एकूण आत्महत्यांपैकी 57 टक्के आत्महत्यांमागे ही तीन कारणं आहेत.

  तसंच कौटुंबिक वादांचा परिणाम मुलींवर जास्त होत असल्याचंही दिसून येत आहे. 2017 ते 2019 या कालावधीत 14 ते 18 वयोगटातल्या 6098 जणांनी आत्महत्या केल्या. त्यात 58 टक्के मुली होत्या. परीक्षेत नापास झाल्यामुळे आत्महत्या करणाऱ्यांमध्ये मात्र मुलींच्या तुलनेत मुलांचं प्रमाण अधिक आहे.

  18 ते 30 या वयोगटाचा विचार केला, तर 2019 मध्ये 16,280 जणांनी कौटुंबिक भांडणांमुळे, 5786 जणांनी आजारपणामुळे, तर 4236 जणांनी विवाहाशी संबंधित समस्यांमुळे जीवन संपवलं. या वयोगटातल्या एकूण आत्महत्यांपैकी या तीन कारणांनी होणाऱ्या आत्महत्यांचं प्रमाण निम्म्याहून अधिक आहे.

  हुंड्याची प्रथा (Dowry) आजच्या काळात पाळली जात नाही, असं म्हटलं जातं; मात्र वस्तुस्थिती तशी नाही. या ना त्या रूपाने मुलीच्या माहेरून संपत्ती मागण्याचे प्रकार आजच्या आधुनिक युगातही सुरू आहे. साहजिकच त्याचा सर्वाधिक मानसिक त्रास (Mental Stress) मुलींना होतो. आत्महत्यांची आकडेवारीही तेच सांगते. 2017 ते 2019 या कालावधीत 13,386 जणांनी विवाहातल्या समस्यांशी (Marriage Related Problems) संबंधित कारणांनी आत्महत्या केल्या. त्यातल्या एक चतुर्थांश आत्महत्या हुंड्यामुळे झाल्या आणि त्यात 93 टक्के आत्महत्या महिलांच्या होत्या. या तीन वर्षांच्या कालावधीत 14 ते 18 वयोगटातल्या 59 मुलींना आत्महत्या करावी लागली. कायद्याने बंदी असलेले बालविवाह होत असल्याचंही या आकड्यावरून स्पष्ट होत आहे. विवाहातल्या समस्यांशी संबंधित आत्महत्यांमध्ये हुंडा हे सर्वांत पहिलं कारण असून, 2019मध्येही 1427 महिलांनी हुंड्याच्या कारणामुळे आपला जीव दिला.

  Cloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय? आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...

  महिला भावनिकदृष्ट्या नाजूक (Emotional) असल्याचं मानलं जातं; पण हे विधान सरसकट सत्य नाही. आपल्या प्रिय व्यक्तीच्या निधनाचा धक्का सहन करण्याची क्षमता पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक असल्याचं दिसून आलं आहे. प्रिय व्यक्तीच्या निधनाच्या कारणामुळे 2017 साली 179 पुरुष आणि 127 महिला, 2018 साली 198 पुरुष आणि 99 महिला, तर 2019 साली 173 पुरुष आणि 132 महिलांनी आत्महत्या केली.

  2018च्या तुलनेत 2019मध्ये देशात आत्महत्यांचं प्रमाण 3.5 टक्क्यांनी वाढलं आहे. बिहार, पंजाब, झारखंड, उत्तराखंड, आंध्र प्रदेश ही आत्महत्येचं प्रमाण वाढण्यातली आघाडीची पाच राज्यं आहेत. हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, मिझोराम, पश्चिम बंगाल या पाच राज्यांतल्या आत्महत्यांचं प्रमाण या कालावधीत घटलं आहे.

  बिहार राज्यात 2018 साली 443 जणांनी आत्महत्या केली होती. 2019मध्ये हा आकडा 641 झाला. ही वाढ 44.7 टक्के आहे. पंजाबमध्ये आत्महत्येच्या प्रमाणात 37 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याच कालावधीत हिमाचल प्रदेशात आत्महत्यांचं प्रमाण 21 टक्क्यांनी घटलं आहे. हे प्रमाण कोणत्याही राज्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

  एकीकडे देशातल्या कृषी उत्पादनात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाणही सर्वाधिक आहे. शेतकरी आत्महत्यांचा प्रदेश हा राज्याला लागलेला कलंक अद्याप पुसून निघालेला नाही. 2017 ते 2019 या कालावधीत महाराष्ट्रातल्या 7345 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्याखालोखाल कर्नाटकातल्या 3853, तेलंगणमधल्या 2237, आंध्र प्रदेशातल्या 1368, तर पंजाबातल्या 711 शेतकऱ्यांनी या कालावधीत आत्महत्या केल्या. या कालावधीत देशातल्या एकूण 17 हजार 675 शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या कारणांनी आपलं जीवन संपवलं.

  आजारपणाला कंटाळणं (Prolonged Illness) हे आत्महत्यांमागचं दुसरं सर्वांत महत्त्वाचं कारण असल्याचंही आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. त्यात अनुक्रमे मानसिक आजार, दीर्घ आजारपण, कॅन्सर, एड्स आणि पॅरालिसिस या आजारांमुळे आत्महत्या होतात. 2017 ते 2019 या कालावधीत दर वर्षी किमान साडेसहा हजार जणांनी आजारपणाच्या कारणामुळे आत्महत्या केल्या आहेत. मानसिक आजारपणामुळे आत्महत्या करणाऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे.

  First published:

  Tags: Stress, Suicide, Suicide case