मराठी बातम्या /बातम्या /explainer /शकडो वर्षे ऊन, पाऊस, वारा झेलूनही प्राचीन बांधकाम इतकं भक्कम कसं? शास्त्रज्ञांनी अखेर काढलं शोधून

शकडो वर्षे ऊन, पाऊस, वारा झेलूनही प्राचीन बांधकाम इतकं भक्कम कसं? शास्त्रज्ञांनी अखेर काढलं शोधून

प्राचीन बांधकाम इतकं भक्कम कसं?

प्राचीन बांधकाम इतकं भक्कम कसं?

रोममधील पेन्थिऑन हे 128 एडीमध्ये बांधलेले मंदिर आहे, ज्यामध्ये किंचित झीज वगळता काळाचं कोणतंही चिन्ह दिसत नाही.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 14 जानेवारी : जुन्या काळातल्या ऐतिहासिक वास्तू पाहताना अचंबित व्हायला होतं. कुठलंही तंत्रज्ञान विकसित नसतानाही इतक्या मोठ्या वास्तू कशा उभ्या राहू शकतात हे एक आश्चर्यच आहे. त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आज शेकडो, हजारो वर्षांनंतरही थंडी, ऊन, पाऊस झेलून त्या वास्तू तशाच दिमाखात आपल्यासमोर उभ्या आहेत. संशोधकांनी त्यामागचं कारण शोधलं. सेल्फ हीलिंग तंत्रज्ञान अर्थात आपोआप पूर्ववत होणं, या तंत्राच्या साह्यानं या वास्तू बांधल्या गेल्या आहेत. ही कोणतीही जादू वगैरे नसून ते तंत्रज्ञान पूर्वीच्या माणसांनी जाणून घेऊन त्याचा अभ्यास केला व त्यावरून त्यांनी ते पक्कं बांधकाम केलं. 'आज तक'ने याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.

  बांधकामाचं तंत्रज्ञान आता इतकं विकसित झालंय, तरीही 2 वर्षांपूर्वी बांधलेलं घर गळतं, त्याला भेगा पडतात. इसवी सन 128 मध्ये रोममध्ये बांधण्यात आलेली पेन्थिऑन ही मंदिरं आजही सुस्थितीत आहेत. कुठे तरी झालेल्या थोड्याशा पडझडीव्यतिरिक्त त्या वास्तूंमध्ये कोणत्याही भेगा किंवा दुरुस्तीच्या खुणा नाहीत. या ऐतिहासिक वास्तू इतक्या मोठ्या कालावधीत सुस्थितीत कशा राहिल्या याबाबत संशोधकांनी अभ्यास केला. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीसोबत इटली आणि स्वित्झर्लंडच्या लॅब्जनी मिळून हा अभ्यास केला. यात शेकडो वर्षं जुन्या वास्तू तपासण्यात आल्या. इटलीच्या स्मारकांवर यात लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं. सध्याच्या घडीला या वास्तू सर्वांत जुन्या व सुस्थितीत असलेल्या आहेत. सायन्स अ‍ॅडव्हासेस जर्नलमध्ये जानेवारी महिन्यात त्याबाबतची निरीक्षणं प्रकाशित करण्यात आली.

  त्यावरून प्राचीन रोममध्ये वास्तुरचनाकार वास्तू बनवताना हॉट मिक्सिंग पद्धतीचा अवलंब करत असल्याचं संशोधकांना समजलं. यामुळे सिमेंटमध्ये सेल्फ हीलिंग गुण तयार होत होते. त्यामुळे इमारतीला पडलेल्या भेगा आपोआप भरून यायच्या. बांधकामासाठी वापरण्यात येणारं साहित्यही वेगळं होतं. कॅल्शिअम कार्बोनेटचे अनेक प्रकार त्यात वापरले होते. ते सर्व खूप जास्त तापमानात एकत्र केलं जायचं. त्यामुळे त्यात एक्झोथर्मिक रिअ‍ॅक्शन व्हायची, म्हणजेच आपोआप उष्णता तयार होणं. ही उष्णता सिमेंटमध्ये जाऊन त्यात सेल्फ हीलिंग गुण यायचे.

  वाचा - शिवाच्या'रुद्राष्टकम स्त्रोत्रा'नं अडचणींचा होईल विनाश; श्रीरामानेही केलेला जप

  संशोधकांनी या पद्धतीचा उपयोग करून एक बांधकाम केलं. त्यानंतर त्या वास्तूचं भरपूर नुकसान केलं. मग भेगांमध्ये पाणी घालून सोडून दिलं. त्यानंतर 2 आठवड्यात भेगा भरून आल्या व पाणी सुकून गेलं.

  आता संशोधकांनी नव्या पद्धतीनं सेल्फ हीलिंग काँक्रीट बनवण्यासाठी अभ्यास सुरू केलाय. यात बॅक्टेरियाद्वारे इमारती सुरक्षित करण्याबाबत अभ्यास केला जातोय. सिव्हिल इंजिनीअरिंगप्रमाणेच मरीन बायोलॉजीचा वापरही यात केला जाणार आहे. म्हणजेच यात समुद्रातल्या जिवाणूंचा समावेश बांधकाम साहित्यात केला जाणार आहे. यामुळे घर किंवा बंगला अधिक काळ टिकेल.

  नेदरलँडच्या डेल्फ युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीने यावर काम सुरूही केलंय. यात बॅसिलस स्युडोफर्म्स या एका प्रकारच्या समुद्री जिवाणूंना सिमेंटमध्ये मिसळलं जाईल. हे जिवाणू दीर्घ काळ सुप्तावस्थेत राहतात. त्या काँक्रिटमध्ये ओलावा आल्यावर ते बॅक्टेरिया त्यांचं काम सुरू करतील आणि भेग भरून येईल. याबाबत अजून खूप चाचण्या होणार आहेत. त्यावर सुरू असलेल्या हिलकॉन नावाच्या प्रकल्पानुसार, हे तंत्रज्ञान वापरून सार्वजनिक इमारती किंवा पूल वगैरे बनवता येऊ शकेल; पण राहण्यासाठीच्या इमारती बनवणं सध्या अवघड आहे.

  पूर्वीची माणसं बांधकामासाठी वेगळं साहित्य वापरत होते, असं याआधीच्यांना वाटायचं. रोममधल्या इमारती, रस्ते, पूल अशा रचना उभारण्यासाठी ज्वालामुखीतली राख आणि चुन्याचा वापर केला जायचा. त्यांचं हॉट मिक्सिंग करून त्यात सिरॅमिक आणि वाळू मिसळली जायची. आता संशोधकांनी सेल्फ हीलिंग करणारं नवीन तंत्रज्ञान विकसित केलं आहे.

  First published:

  Tags: Science