नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी : आजच्या काळात लठ्ठपणाची (Over Weight) आणि अशक्तपणाचीही (Under Weight) समस्या सारख्याच प्रमाणात वाढली आहे. या समस्यांवर अशी अनेक उत्पादनं आणि हेल्थ सप्लिमेंट्स बाजारात आले आहेत जे वजन वाढवण्याचा आणि घटवण्याचा दावा करतात. बरेच लोक या विषयावर डॉक्टरांचा सल्ला देखील घेतात.
तुमचं वजन जास्त किंवा कमी आहे हे बॉडी मास इंडेक्सद्वारे ओळखलं जातं. यानुसार जर तुमचा बॉडी मास इंडेक्स 18.5 पेक्षा कमी असेल, तर तुम्ही कमी वजनाच्या श्रेणीत येता आणि जर तुमचा बॉडी मास इंडेक्स 25 पेक्षा जास्त असेल, तर तुम्ही जादा वजनाच्या श्रेणीत येता. 30 च्या वर बॉडी मास इंडेक्स असेल, तर तुमचा समावेश लठ्ठपणाच्या श्रेणीत होतो. हेल्थ लाईनच्या बातमीनुसार, तुमच्या आरोग्याच्या आधारावर बॉडी मास इंडेक्स बनवता येत नाही. कारण तो तुमची उंची आणि वजनाच्या आधारे मोजला जातो. तसंच, स्नायूंच्या वस्तुमानाची गणना करत नाही. तेव्हा, जी व्यक्ती खूप पातळ किंवा खूप लठ्ठ आहे, ती देखील शारीरिकदृष्ट्या निरोगी (Gain Weight Fast and Safely) असू शकते.
कमी वजनाचे आरोग्यावर काय परिणाम होतात?
लठ्ठपणा ही सध्या जगातील सर्वात मोठी आरोग्य समस्या आहे. तथापि, कमी वजन असणंही आपल्या आरोग्यासाठी तितकंच हानिकारक असू शकतं. एका अभ्यासानुसार, कमी वजनामुळे पुरुषांमध्ये 140 टक्के आणि महिलांमध्ये 100 टक्के अकाली मृत्यूचा धोका वाढतो. त्या तुलनेत लठ्ठपणामुळे लवकर मृत्यू होण्याचा धोका 50 टक्के आहे. यावरून हे स्पष्ट आहे की, कमी वजन असणं आपल्या आरोग्यासाठी अधिक धोकादायक आहे.
कमी वजनामुळं रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते. यामुळं तुम्हाला विविध आजारांचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. यामुळं ऑस्टिओपोरोसिस आणि फ्रॅक्चरदेखील होऊ शकतात आणि प्रजननाशी संबंधित समस्या देखील निर्माण होऊ शकतात.
जाणून घ्या कमी वजनाचं कारण
कमी वजन असण्याची अनेक कारणं असू शकतात. त्यापैकी काहींवर उपचार करणं शक्य आहे. तर, काहींवर उपचार नाहीत.
जाणून घ्या कमी वजनाची सामान्य कारणं.
इटिंग डिसऑर्डर - या सर्वात वर एनोरेक्सिया नर्वोसा आहे. हा एक गंभीर मानसिक विकार आहे. यामध्ये व्यक्तीला काहीही खाण्याची इच्छा फार कमी होते.
थायरॉईड - वाढलेलं थायरॉईड संप्रेरकाचं प्रमाण (हायपरथायरॉईडीझम). यामुळं चयापचय उत्तेजित होऊन शरीराला अपायकारकरीत्या वजन कमी होऊ लागतं.
सीलियाक डिसीज - हा एक गंभीर ग्लूटेन इनटॉलरन्स आजार किंवा अॅलर्जी आहे. ग्लूटेन हे बहुतेक धान्यांमध्ये आढळणारं प्रोटीन आहे. या आजारात लोकांना हे प्रोटीन पचण्यास त्रास होतो, ज्यामुळं शरीराला आवश्यक प्रोटीन मिळत नाही आणि वजन कमी होतं.
हे वाचा - Winter Health Tips: हिवाळ्यात तुमचीही बोटं सुन्न होतात? जाणून घ्या त्याची कारणे आणि घरगुती उपाय
मधुमेह - टाइप 1 मधुमेह असणं हे वजन कमी होण्याचं मुख्य कारण असू शकतं.
कर्करोग - कर्करोगाच्या गाठी अनेकदा मोठ्या प्रमाणात कॅलरी बर्न करतात आणि त्यामुळं एखाद्याचं वजन खूप कमी होऊ शकतं.
संक्रमण - काही संक्रमणांमुळं एखाद्या व्यक्तीचं वजन गंभीररीत्या कमी होऊ शकतं. यामध्ये परजीवी, टीबी आणि एचआयव्ही/एड्स यांचा समावेश होतो.
वरील समस्यांसाठी तुम्ही चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
या सुरक्षित मार्गांनी वजन वाढवा
वजन वाढवणं अवघड काम नाही. छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर, वजन सहज वाढवता येतं. मात्र, वजन वाढवण्यासाठी योग्य आणि दीर्घ प्रक्रियेतून जावं लागतं.
1. आहारात प्रथिनं, कार्बोहायड्रेट आणि फॅट अधिक प्रमाणात घ्या
वजन वाढवण्यात प्रथिनं महत्त्वाची भूमिका बजावतात. याशिवाय, आपण अतिरिक्त कॅलरी वापरता, ती फॅटमध्ये किंवा चरबीमध्ये बदलतात. यासोबतच कार्ब्स आणि फॅट देखील वजन वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
2. पुरेशी झोप घेत असल्याची काळजी घ्या.
निरोगी शरीरासाठी तुम्हाला पुरेशी झोप मिळणं खूप महत्त्वाचं आहे. झोपेच्या कमतरतेमुळे शरीराच्या विविध अवयवांवर वेगवेगळे परिणाम होतात. ज्याप्रमाणे पुरेशी झोप न मिळाल्यानं वजन वाढतं, त्याचप्रमाणं, कमी झोपेमुळेही वजन झपाट्यानं कमी होतं.
हे वाचा - Liver Healthy: लिवर खराब होणं म्हणजे संपलं..! निरोगी आरोग्यासाठी आधीपासूनच अशी घ्या काळजी
3. जेवण वगळू नका – नेहमी लक्षात ठेवा की, जर तुम्ही वजन वाढवण्याचा प्रयत्न करत असाल तर, तुम्ही कोणत्याही वेळचं जेवण वगळू नये.
4. जेवण्यापूर्वी पाणी पिऊ नका – ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांना जेवणापूर्वी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. याउलट, वजन वाढवण्यासाठी जेवण करण्यापूर्वी पाणी पिऊ नका. यामुळं तुम्हाला अधिक अन्न खाता येईल.
5. धूम्रपान करू नका
अभ्यासात असं आढळून आलंय की, जे लोक धूम्रपान करतात त्यांचं वजन झपाट्यानं कमी होतं. तसंच, त्यांना वजन वाढवण्यात खूप त्रास होतो. त्यामुळं वजन वाढवण्याचा प्रयत्न करत असाल, तर धुम्रपानापासून दूर राहा.
6. नियमित व्यायाम करा
व्यायाम केल्यानं तुम्हाला चांगली भूक तर लागतेच; पण त्यामुळं तुमची ऊर्जा आणि प्रतिकारशक्तीही वाढते. याशिवाय, वर्कआउट करून, तुम्ही तुमच्या शरीरात वजनाचं वितरण योग्य प्रकारे होत असल्याची खात्री करू शकता.
हे वाचा - Skin And Hair: ब्युटी केअरसाठी लेमन ग्रासचा असा उपयोग तुम्ही केला नसेल; दिसेल डॅशिंग लूक
7. आहारात स्निग्ध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा
जेव्हा तुम्ही चीज, लोणी किंवा तूप खाता, तेव्हा अशा उत्पादनांचा वापर करा, त्यानंतर संपूर्ण फॅट डेअरी उत्पादनांचाच वापर करा. यामुळं तुमचं वजन वाढण्यास खूप मदत होऊ शकते.
8. भरपूर प्रमाणात ऊर्जा देणारे अन्नपदार्थ खा
एनर्जी डेन्स फूडमध्ये भरपूर कॅलरीज आढळतात. म्हणजेच त्यांच्यात जास्त कॅलरीज असतात. उदा., काजू, सुका मेवा, कंदमूळं, पूर्ण स्निग्धांशयुक्त दुग्धजन्य पदार्थ, मांस आदी.
( सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weight, Weight gain