Home /News /explainer /

Russia-Ukraine War | आर्थिक निर्बंध लादल्यानंतरही रशियाची अर्थव्यवस्था इतकी मजबूत कशी? हे आहे मुख्य कारण

Russia-Ukraine War | आर्थिक निर्बंध लादल्यानंतरही रशियाची अर्थव्यवस्था इतकी मजबूत कशी? हे आहे मुख्य कारण

रशियाने युक्रेनवर आक्रमण (Russia-Ukraine War) केल्यानंतर जगातील अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. याचा रशियाच्या अर्थव्यवस्थेवर आणि निर्यातीवर काही परिणाम झाला आहे का?

    नवी दिल्ली, 4 मार्च : रशियाने युक्रेनवर हल्ला (Russia-Ukraine War) केल्यानंतर रशिया आणि त्यांची अर्थव्यवस्था कमकुवत करण्यासाठी अनेक देशांनी आर्थिक निर्बंधांचा (Economic Sanctions on Russia) अवलंब केला आहे. मात्र, सध्या तरी रशियाला काही फरक पडल्याचे दिसत नाही. दरम्यान, रशियाचे मित्र राष्ट्र आणि त्याची निर्यात अर्थव्यवस्था याबाबत अनेक चर्चा झाल्या आहेत. येथे आम्ही अशा 10 देशांविषयी माहिती देणार आहोत, ज्यामुळे रशियाची अर्थव्यवस्था इतकी मजबूत आहे. रशियाच्या निर्यातीत चीनचा वाटा सर्वात मोठा रशियाच्या एकूण निर्यातीत (Russia Export) सर्वात मोठा वाटा हा चीनचा आहे (Russia Export to China). दरवर्षी रशियाच्या एकूण निर्यातीपैकी 14.5% एकट्या चीनचा वाटा आहे. कदाचित हेच कारण असेल की युक्रेनवर आक्रमण (Russia Attack On Ukraine) करण्यापूर्वी रशियाने आंतरराष्ट्रीय आर्थिक निर्बंधांची फारशी चिंता केली नाही. या निर्बंधांमुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या मोठ्या भागावर काहीही फरक पडला नाही. चीनमधील गुंतवणूक वाढवली याचा पुरावा रशियाच्या युद्धापूर्वीच्या तयारीत सापडतो. रॉयटर्सच्या एका बातमीनुसार, या युद्धापूर्वी रशियाला निर्बंधांची भीती वाटत होती, त्यामुळे रशियाने अनेक वर्षांपूर्वीच इतर देशांशी संपर्क कमी करण्यास सुरुवात केली होती. यासाठी, रशियन सेंट्रल बँकेने गेल्या काही वर्षांत इतर देशांमध्ये असलेल्या मालमत्तेमध्ये झपाट्याने घट केली आहे. या काळात फ्रान्स, अमेरिका, जर्मनी आणि ब्रिटन सारख्या देशांमध्ये त्याचे एक्सपोजर 50 टक्क्यांहून अधिक कमी झाले. दुसरीकडे चीन, जपानसह इतर काही देशांमध्ये एक्सपोजर वाढले होते. पेशावरच्या मशिदीत जबरदस्त स्फोट; शुक्रवारी नमाजाच्या वेळीच Suicide Blast परकीय चलनाच्या बाबतीतही रशियाने त्या देशांचे चलन ऑफलोड केले, ज्यांच्याकडून विरोध होण्याची शक्यता होती. गेल्या सात-आठ वर्षांत रशियाने अमेरिकन चलन डॉलर (USD) आणि युरोपियन युनियनचे चलन युरो (Euro) 12-14 टक्क्यांपर्यंत खाली आणले आहे. याची भरपाई चीनचे चलन युआनच्या (Yuan)वाढत्या एक्सपोजरद्वारे करण्यात आली. आठ वर्षांपूर्वी ज्या युआनमध्ये रशियन एक्सपोजर जवळजवळ शून्य होते ते आता 10 टक्क्यांहून अधिक आहे. चीनने रशियावर निर्बंध लादण्यास नकार दिला आहे. त्यामुळे निर्बंधानंतरही युआनमध्ये जागतिक व्यापार करण्याचा पर्याय रशियासाठी खुला आहे. रशियाची इतर देशांमध्ये निर्यात चीननंतर रशिया जर्मनीला सर्वाधिक निर्यात करतो. वास्तविक, हे एकूण निर्यातीच्या केवळ 6.2% आहे. याशिवाय, रशियाच्या एकूण निर्यातीपैकी 5.3% युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाचा सर्वात मोठा सहयोगी असलेल्या बेलारूसला जातो. याव्यतिरिक्त नेदरलँड 5.8%, तुर्की 5.1%, यूएस 4.5%, दक्षिण कोरिया 3.7%, कझाकस्तान आणि पोलंड 3.5% आणि इटली 3.4% हे सर्वाधिक निर्यात वाटा असलेले रशियाचे उर्वरित 10 देश आहेत. या यादीत भारताचे नाव नाही. पण भारताच्या संरक्षण, कच्चे तेल, वायू आणि इतर आयातीत रशियाचा वाटा चांगला आहे. डिसेंबर 2021 च्या आकडेवारीनुसार, भारताने रशियाकडून सुमारे 72.47 अब्ज रुपयांची आयात केली. रशिया-युक्रेन युद्धाचा सर्वसामान्यांवर मोठा परिणाम होणार? 'या' गोष्टी महागणार! रशियाचा मुख्य निर्यात व्यवसाय रशिया प्रामुख्याने कच्चे तेल, खते, नैसर्गिक वायू आणि संरक्षण वस्तूंची निर्यात करतो. कच्च्या तेलाच्या किंमती निश्चित करण्यात रशियाची महत्त्वाची भूमिका आहे, ते दरवर्षी 65 लाख बॅरल तेल निर्यात करतात. सूर्यफूल तेलाच्या बाबतीत जगभरातील 75% निर्यात रशिया आणि युक्रेनद्वारे केली जाते. रशिया जगातील 17% नैसर्गिक वायूचे उत्पादन करतो. त्याच वेळी, जगातील 15% नायट्रोजन खतांचा व्यापार रशियाद्वारे केला जातो. तर पोटॅश खताच्या निर्यातीत रशियाचा वाटा 17% पेक्षा जास्त आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Russia Ukraine

    पुढील बातम्या