मराठी बातम्या /बातम्या /explainer /

..तर एक भारतीय वंशाचा व्यक्ती पहिल्यांदाच ब्रिटनचा PM होईल, दर रविवारी जातात मंदिरात

..तर एक भारतीय वंशाचा व्यक्ती पहिल्यांदाच ब्रिटनचा PM होईल, दर रविवारी जातात मंदिरात

ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. ऋषींना आपल्या भारतीय वंशाचा अभिमान आहे. धर्माने हिंदू असलेल्या ऋषींनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले की ते आठवड्याच्या शेवटी मंदिरात जायला विसरत नाहीत.

ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. ऋषींना आपल्या भारतीय वंशाचा अभिमान आहे. धर्माने हिंदू असलेल्या ऋषींनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले की ते आठवड्याच्या शेवटी मंदिरात जायला विसरत नाहीत.

ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. ऋषींना आपल्या भारतीय वंशाचा अभिमान आहे. धर्माने हिंदू असलेल्या ऋषींनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले की ते आठवड्याच्या शेवटी मंदिरात जायला विसरत नाहीत.

  • Published by:  Rahul Punde
लंडन, 15 जुलै :  लवकरच भारतीयांना एक चांगली बातमी मिळू शकते. कारण, भारतीय वंशाचे यूकेचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक हे पुढील पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. ते कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आहेत आणि पुढच्या पंतप्रधानपदासाठी मतदानाच्या पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत.     आज झालेल्या दुसऱ्या फेरीच्या मतदानातही ते आघाडीवर राहिले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस ते ब्रिटनच्या पंतप्रधानपदाकडे कूच करताना दिसत आहेत. ऋषी यांच्या अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळाबद्दल ब्रिटनच्या प्रसारमाध्यमांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या असल्या, तरी पंतप्रधानपदासाठी झालेल्या मतदानावरून ते कंझर्व्हेटिव्ह पक्षातील सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून उदयास येत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वीही त्यांची पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून वर्णी लागली होती. जर ते पंतप्रधान झाले तर ब्रिटनच्या इतिहासात अशी पहिली व्यक्ती असेल की भारतीय वंशाची आहे. ऋषी सुनक यांची मुळे भारतात आहेत. त्यांच्या पत्नीचा जन्म भारतात झाला असून ती भारतातील सर्वात मोठी आयटी समूह कंपनी, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी आहे. ऋषी स्वत:ही सांगत आहेत की, मला आपल्या आशियाई वंशाचा अभिमान आहे. ते 2015 पासून रिचमंड, यॉर्कशायर येथून कंझर्व्हेटिव्हचे खासदार आहेत. ते नॉर्दर्टन शहराबाहेर कार्बी सिगस्टनमध्ये त्याच्या कुटुंबासह राहतात. हॅम्पशायर मध्ये जन्म वास्तविक त्यांचे आजी-आजोबा पंजाबमधून पूर्व आफ्रिकेत स्थलांतरित झाले होते. ऋषीचे वडील यशवीर यांचा जन्म केनियामध्ये तर आई उषा यांचा जन्म टांझानियामध्ये झाला होता. 1960 मध्ये ऋषीचे आजी-आजोबा मुलांसह ब्रिटनला आले. यशवीर हे वैद्यकीय क्षेत्रातील जनरल प्रॅक्टिशनर होते आणि आई फार्मासिस्ट होती. सुनक यांचा जन्म 1980 मध्ये हॅम्पशायरमधील साउथॅम्प्टन येथे झाला. त्यांनी विंचेस्टर कॉलेज या खाजगी शाळेत शिक्षण घेतले. जी शिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्था मानली जाते. अभ्यासात हुशार ऋषी सुनक यांनी नंतर ऑक्सफर्डमध्ये शिक्षण घेतले. ब्रिटिश सर्वाधिक पंतप्रधान ऑक्सफर्डचे त्यांनी ऑक्सफर्डमध्ये तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला. सामान्यतः ब्रिटीश राजकारणी त्या विषयांचा अभ्यास करतात आणि दुसरे म्हणजे या देशातील बहुतेक पंतप्रधान आणि बड्या नेत्यांनीही ऑक्सफर्डमधूनच अभ्यास केला आहे. त्यांनी पुढील शिक्षण स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीए केले. भावी पत्नी स्टॅनफोर्ड विद्यापीठात भेटली राजकारणात येण्याची इच्छा त्यांच्यात सुरुवातीपासूनच होती की नंतर त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला हे माहीत नाही. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी प्रथम गोल्डमन सॅक्स या गुंतवणूक बँकेत काम केले. एक गुंतवणूक फर्म देखील उघडली होती. त्यांची पत्नी अक्षता मूर्ती ही भारतीय सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी आहे. खरं तर, ते त्यांच्या भावी पत्नीला स्टॅनफोर्ड विद्यापीठात भेटला, जिथे ती देखील अभ्यासासाठी गेली होती. यानंतर दोघेही प्रेमात पडले आणि नंतर लग्न केले. त्याला दोन मुली आहेत. ज्यांनी आपल्यावर दीडशे वर्षे राज्य केलं, त्या देशाच्या सर्वोच्चपदी बसणार भारतीय माणूस? सासरच्या कंपनीत संचालक सुनक यांनी 2001 ते 2004 पर्यंत गोल्डमन सॅक्समध्ये विश्लेषक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी मुलांच्या गुंतवणूक निधी व्यवस्थापन कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 2006 मध्ये त्यांचे पार्टनर बनले. यानंतर त्यांनी जुन्या सहकाऱ्यासोबत हेड फंड कंपनी उघडली. ते त्यांचे सासरे नारायण मूर्ती यांच्या कॅटामरन व्हेंचर्स कंपनीतही संचालक होते. ऋषी आणि अक्षता यांची गणना ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये केली जाते. रिचमंड मतदारसंघातून खासदार त्यानंतर सुनक यांनी राजकारणात उडी घेतली. 2014 मध्ये, त्यांना कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या वतीने रिचमंडमध्ये पक्षाचे उमेदवार बनवण्यात आले. ही जागा महत्त्वाची होती कारण येथे महान ब्रिटिश नेते विल्यम हेग लढत असत. परंतु, त्यांनी निवडणुकीत उभे न राहण्याचा निर्णय घेतला होता. ही जागा कंझर्व्हेटिव्ह पक्षासाठी ब्रिटनमधील सर्वात सुरक्षित जागांपैकी एक मानली जाते. 100 वर्षांहून अधिक काळ या जागेवर कंझर्व्हेटिव्हचा कब्जा आहे. सुनक हे गेल्या वर्षी रिचमंड (यॉर्क्स) मतदारसंघातून दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. यापूर्वी 2018 मध्ये त्यांना ब्रिटनचे गृहनिर्माण मंत्री करण्यात आले होतं. EU सोडण्याच्या बाजूने प्रचार 2015 च्या सार्वत्रिक निवडणुकीत ऋषींनी सहज विजय मिळवला. 2015-2017 मध्ये त्यांना पर्यावरण, अन्न आणि ग्रामीण व्यवहार समितीचे सदस्य बनवण्यात आले. सुनक यांनी जनमत चाचणीत युरोपियन युनियन सोडण्याच्या बाजूने प्रचार केला आणि त्यांच्या मतदारसंघात 55 टक्के लोकांनी युरोपियन युनियन सोडण्याच्या बाजूने मतदान केलं होतं. बोरिस जॉन्सनच्या सुरुवातीच्या समर्थकांपैकी एक त्यांनी पंतप्रधान थेरेसा मे यांच्या ब्रेक्झिट करारावर तीन वेळा मतदान केले. ते बोरिस जॉन्सनच्या सुरुवातीच्या समर्थकांपैकी एक होते. अनेकवेळा ते त्यांचे समर्थक म्हणून मीडियात दिसले. जुलै 2019 मध्ये, जॉन्सन यांची सुनक यांनी अर्थ मंत्रालयाचे मुख्य सचिव म्हणून निवड केली होती. याआधी ते जानेवारी 2018 ते जुलै 2019 पर्यंत गृहनिर्माण, समुदाय आणि स्थानिक सरकार मंत्रालयात संसदीय उपसचिव होते. ऋषी सुनक यांच्याकडे पक्षाचा उगवता तारा म्हणून पाहिले जाते. आघाडीच्या नेत्यांनी त्यांचे कौतुक केले. त्यांची पक्षातील लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. धूम्रपान आणि अल्कोहोलपासून दूर ऋषी सुनक यांच्या वेबसाइटनुसार, तंदुरुस्त राहण्यासोबतच त्यांना क्रिकेट, फुटबॉल आणि चित्रपट पाहण्याची आवड आहे. साउथहॅम्प्टन फुटबॉल खेळाडू मॅट ले टेझियर हा त्यांच्या बालपणात त्यांचा हिरो होता. ते धर्माने हिंदू आहेत. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये गीता वाचून त्यांनी शपथ घेतली. ते धूम्रपान आणि दारूपासून पूर्णपणे दूर राहतात. त्यांच्या कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर त्यांना एक भाऊ आणि एक बहीण आहे. भाऊ संजय मानसशास्त्रज्ञ आहे तर बहीण रेखा अधिकारी आहे. ऋषी सुनक यांनी नेहमीच सांगितले की त्यांची आशियाई ओळख त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. वीकेंडला ते नक्कीच मंदिरात जातात असं त्यांनी स्वतः सांगितलं आहे.
First published:

Tags: Britain

पुढील बातम्या