मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Infosys चे संस्थापक नारायण मूर्तींचे जावई ब्रिटनचे भावी PM ऋषी सुनक यांची नेटवर्थ माहितीय?

Infosys चे संस्थापक नारायण मूर्तींचे जावई ब्रिटनचे भावी PM ऋषी सुनक यांची नेटवर्थ माहितीय?

2009 मध्ये अक्षता मूर्तीशी लग्न केल्यानंतर ऋषी सुनक यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे. अक्षता मूर्ती ह्या इन्फोसिसचे सहसंस्थापक एनआर नारायण मूर्ती यांची मुलगी आहे.

2009 मध्ये अक्षता मूर्तीशी लग्न केल्यानंतर ऋषी सुनक यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे. अक्षता मूर्ती ह्या इन्फोसिसचे सहसंस्थापक एनआर नारायण मूर्ती यांची मुलगी आहे.

2009 मध्ये अक्षता मूर्तीशी लग्न केल्यानंतर ऋषी सुनक यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे. अक्षता मूर्ती ह्या इन्फोसिसचे सहसंस्थापक एनआर नारायण मूर्ती यांची मुलगी आहे.

  • Published by:  Rahul Punde
नवी दिल्ली, 20 जुलै : लवकरच भारतीयांना एक चांगली बातमी मिळू शकते. कारण, भारतीय वंशाचे यूकेचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक हे पुढील पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. ते कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते असून पुढच्या पंतप्रधानपदासाठी मतदानाच्या सर्व फेरीत आघाडीवर आहेत. दिवसेंदिवस ते ब्रिटनच्या पंतप्रधानपदाकडे एकएक पाऊल पुढे टाकताना दिसत आहेत. पण, ऋषी सुनक यांचा भारताशी कसा संबंध? त्यांची नेटवर्थ किती आहे? अशा अनेक गोष्टी तुम्हाला माहीत नसतील? चला तर मग वाट कसली बघताय? लगेच जाणून घेऊ. ऋषी सुनक यांची मुळे भारतात आहेत. त्यांच्या पत्नीचा जन्म भारतात झाला असून त्या भारतातील सर्वात मोठी आयटी समूह कंपनी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि लेखिका सुधा मूर्ती यांची मुलगी आहे. ऋषी स्वत: ही सांगतात की, मला आपल्या आशियाई वंशाचा अभिमान आहे. हॅम्पशायर मध्ये जन्म वास्तविक त्यांचे आजी-आजोबा पंजाबमधून पूर्व आफ्रिकेत स्थलांतरित झाले होते. ऋषींचे वडील यशवीर यांचा जन्म केनियामध्ये तर आई उषा यांचा जन्म टांझानियामध्ये झाला होता. 1960 मध्ये ऋषींचे आजी-आजोबा मुलांसह ब्रिटनला आले. यशवीर हे वैद्यकीय क्षेत्रातील जनरल प्रॅक्टिशनर होते आणि आई फार्मासिस्ट होती. सुनक यांचा जन्म 1980 मध्ये हॅम्पशायरमधील साउथॅम्प्टन येथे झाला. त्यांनी विंचेस्टर कॉलेज या खाजगी शाळेत शिक्षण घेतले. जी शिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्था मानली जाते. अभ्यासात हुशार ऋषी सुनक यांनी नंतर ऑक्सफर्डमध्ये शिक्षण घेतले. भावी पत्नीची स्टॅनफोर्ड विद्यापीठात भेट राजकारणात येण्याची इच्छा त्यांच्यात सुरुवातीपासूनच होती की नंतर निर्माण झाली, याबद्दल जास्त माहिती नाही. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी प्रथम गोल्डमन सॅक्स या गुंतवणूक बँकेत काम केलं. त्यांनी एक गुंतवणूक फर्म देखील उघडली होती. त्यांची पत्नी अक्षता मूर्ती ही भारतीय सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी आहे. खरंतर, ते त्यांच्या भावी पत्नीला स्टॅनफोर्ड विद्यापीठात भेटले, जिथे ती देखील अभ्यासासाठी गेली होती. यानंतर दोघेही प्रेमात पडले आणि नंतर लग्न केले. त्यांना दोन मुलं आहेत. सासरच्या कंपनीत संचालक सुनक यांनी 2001 ते 2004 पर्यंत गोल्डमन सॅक्समध्ये विश्लेषक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी मुलांच्या गुंतवणूक निधी व्यवस्थापन कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. या कंपनीत 2006 मध्ये ते पार्टनर बनले. यानंतर त्यांनी जुन्या सहकाऱ्यासोबत हेड फंड कंपनी उघडली. ते त्यांचे सासरे नारायण मूर्ती यांच्या कॅटामरन व्हेंचर्स कंपनीतही संचालक होते. ऋषी आणि अक्षता यांची गणना ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये केली जाते. रिचमंड मतदारसंघातून खासदार त्यानंतर सुनक यांनी राजकारणात उडी घेतली. 2014 मध्ये, त्यांना कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या वतीने रिचमंडमध्ये पक्षाचे उमेदवार बनवण्यात आले. ही जागा महत्त्वाची होती. कारण, येथे महान ब्रिटिश नेते विल्यम हेग लढत असत. परंतु, त्यांनी निवडणुकीत उभे न राहण्याचा निर्णय घेतला. ही जागा कंझर्व्हेटिव्ह पक्षासाठी ब्रिटनमधील सर्वात सुरक्षित जागांपैकी एक मानली जाते. 100 वर्षांहून अधिक काळ या जागेवर कंझर्व्हेटिव्हचा ताबा आहे. सुनक हे गेल्या वर्षी रिचमंड (यॉर्क्स) मतदारसंघातून दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. यापूर्वी 2018 मध्ये त्यांना ब्रिटनचे गृहनिर्माण मंत्री करण्यात आले होतं. भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांच्या PM होण्याला बोरिस जॉन्सन यांचा विरोध? ऋषी सुनक यांची संपत्ती किती? ब्रिटनच्या पुढील पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत असल्याने नाही तर ऋषी सुनक त्यांच्या संपत्तीमुळेही अनेकदा चर्चेत आले आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या संडे टाइम्सच्या श्रीमंतांच्या यादीत ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती 73 कोटी युरोच्या संपत्तीसह 222 व्या क्रमांकावर होते. ही यादी ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, 1989 मध्ये ही यादी तयार झाल्यापासून ऋषी सुनक हे पहिले आघाडीचे राजकारणी आहेत, ज्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. भारतीय वंशाच्या या जोडप्याकडे 15 मिलियन यूरोची चार घरे आहेत, पैकी दोन लंडनमध्ये, एक यॉर्कशायरमध्ये आणि एक लॉस एंजेलिसमध्ये आहे. सुनक ब्रिटनच्या श्रीमंतांच्या यादीत कसे आले? सुनक यांची स्वतःची खूप संपत्ती असली तरी 2009 मध्ये अक्षता मूर्तींसोबत लग्न केल्यानंतर त्यांची संपत्ती खूप वाढली असल्याचेही बोलले जाते. अक्षता मूर्ती इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांची मुलगी आहे. ते स्वतः भारतातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. तिच्या वडिलांच्या व्यवसायाची वारसदार, अक्षता यांचा इन्फोसिसमध्ये मोठा वाटा आहे. ती स्वतः अक्षता डिझाइन्स नावाच्या फॅशन लेबलची मालक आहे. गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, संडे टाइम्सच्या श्रीमंतांच्या यादीत त्यांच्या पत्नीचे नाव आले होते, जेव्हा तिने एका भारतीय आयटी कंपनीतील तिच्या 690 दशलक्ष डॉलर भागभांडवलातून कमावलेल्या नफ्यावर कर भरण्यास नकार दिला होता. त्यावेळी अक्षता म्हणाली की, आपल्याकडे यूकेचा डोमासाइल नाही. मात्र, तिच्यावर दबाव वाढल्यानंतर अखेर तिने कर भरण्यास होकार दिला. EU सोडण्याच्या बाजूने प्रचार 2015 च्या सार्वत्रिक निवडणुकीत ऋषींनी सहज विजय मिळवला. 2015-2017 मध्ये त्यांना पर्यावरण, अन्न आणि ग्रामीण व्यवहार समितीचे सदस्य बनवण्यात आले. सुनक यांनी जनमत चाचणीत युरोपियन युनियन सोडण्याच्या बाजूने प्रचार केला होता. त्यांच्या मतदारसंघात 55 टक्के लोकांनी युरोपियन युनियन सोडण्याच्या बाजूने मतदान केलं होतं. बोरिस जॉन्सनच्या सुरुवातीच्या समर्थकांपैकी एक त्यांनी पंतप्रधान थेरेसा मे यांच्या ब्रेक्झिट करारावर तीन वेळा मतदान केले. ते बोरिस जॉन्सनच्या सुरुवातीच्या समर्थकांपैकी एक होते. अनेकवेळा ते त्यांचे समर्थक म्हणून मीडियात दिसले. जुलै 2019 मध्ये, जॉन्सन यांची सुनक यांनी अर्थ मंत्रालयाचे मुख्य सचिव म्हणून निवड केली होती. याआधी ते जानेवारी 2018 ते जुलै 2019 पर्यंत गृहनिर्माण, समुदाय आणि स्थानिक सरकार मंत्रालयात संसदीय उपसचिव होते. ऋषी सुनक यांच्याकडे पक्षाचा उगवता तारा म्हणून पाहिले जाते. आघाडीच्या नेत्यांनी त्यांचे कौतुक केले. त्यांची पक्षातील लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. धूम्रपान आणि अल्कोहोलपासून दूर ऋषी सुनक यांच्या वेबसाइटनुसार, फिट राहण्यासोबतच त्यांना क्रिकेट, फुटबॉल आणि चित्रपट पाहण्याची आवड आहे. साउथहॅम्प्टन फुटबॉल खेळाडू मॅट ले टेझियर हा त्यांच्या बालपणात त्यांचा हिरो होता. ते धर्माने हिंदू असून हाऊस ऑफ कॉमन्समध्ये गीता वाचून त्यांनी शपथ घेतली. धूम्रपान आणि दारूपासून पूर्णपणे दूर राहतात. त्यांच्या कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर त्यांना एक भाऊ आणि एक बहीण आहे. भाऊ संजय मानसशास्त्रज्ञ आहे तर बहीण रेखा अधिकारी आहे. ऋषी सुनक यांनी नेहमीच सांगितले की त्यांची आशियाई ओळख त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. वीकेंडला ते आवरर्जून मंदिरात जातात असं त्यांनी स्वतः सांगितलं आहे.
First published:

पुढील बातम्या