Explainer : कुराणमधील 26 आयत हटवण्याची मागणी करणारे वासिम रिझवी कोण आहेत? वाचा सविस्तर

Explainer : कुराणमधील 26 आयत हटवण्याची मागणी करणारे वासिम रिझवी कोण आहेत? वाचा सविस्तर

शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वासिम रिझवी यांच्या विरोधात जोरदार निदर्शेने केली जात आहेत. रिझवी आपल्याच धर्मातील लोकांच्या निशाण्यावर आले आहेत. त्यांना मुस्लिम असल्याचं नाकारलं जात असून त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 मार्च:  शिया वक्फ बोर्डाचे (Shia Central board of Waqf) माजी अध्यक्ष वासिम रिझवी (waseem Rizvi) यांच्या विरोधात जोरदार निदर्शेने केली जात आहेत. रिझवी आपल्याच धर्मातील लोकांच्या निशाण्यावर आले आहेत. त्यांना मुस्लीम (Muslim) असल्याचं नाकारलं जात असून त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली जात आहे. रिझवी यांनी कुराणमधील 26 आयत (अध्याय) हटवण्याची मागणी करत सुप्रीम कोर्टात (supreme Court) जनहित याचिका (PIL) दाखल केली आहे. यानंतर त्यांना लक्ष्य केलं जात आहे.

रिझवी यांनी काय म्हटलं आहे

उत्तरप्रदेशची राजधानी लखनौ (Lucknow) येथे बोलताना रिझवी म्हणाले होते, की कुराणमधील काही आयत दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्यानं ती हटवली पाहिजेत म्हणजे दहशतवादी कारवायांशी मुसलमानांची नावे जोडली जाणार नाहीत. या मागणीसाठी शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष रिझवी यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. परंतु याचे परिणाम काही वेगळेच झाले आहेत. याचिका दाखल केल्याची माहिती मिळताच मुस्लिम धर्मगुरुंनी रिझवी यांच्या विरोधात एकत्र येण्यास सुरुवात केली.

धर्मगुरु येताहेत एकत्र

ताज्या स्थितीनुसार, लखनौमध्ये रिझवी यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळले जात आहेत. त्यांना ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. तसेच निदर्शने केली जात आहेत. त्यांच्यावर हल्ला होऊ नये यासाठी काश्मिर गल्लीमधील त्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच एकामागून एक अशा अनेक संघटनांनी त्यांच्याविरोधात फतवा जारी केला आहे. रिझवी यांना ठार मारणाऱ्यास मोठा ईनाम दिला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे. तसेच त्यांच्यावर बहिष्कार टाकावा, यासाठी मोहिम देखील राबवण्यात येत आहे.

रिझवी यांचा तर्क काय आहे?

राजकारणात चमकण्यासाठी, सक्रिय राजकारणात (Politics) प्रवेश करण्यासाठी आणि मुस्लिम विरोधी शक्तींना संतुष्ट करण्यासाठी रिझवी यांनी हे केले असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र स्पष्टीकरण देताना रिझवी यांनी सांगितले की जी 26 आयत हटवण्यासाठी ही याचिका दाखल केली आहे, ती मुळ कुराणचा भाग नाहीत. धर्माला मानणाऱ्या मुस्लिम व्यक्तींनी त्यावर विश्वास ठेवावा यासाठी कट्टरपंथीयांनी ते नंतर जोडले आहेत.

त्यांच्या वडिलांचे लवकर झाले निधन

रिझवी हे स्वतः शिया मुस्लिम आहेत. ते उत्तर प्रदेशातील शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांचा सक्रिय राजकारणात देखील सहभाग होता. शिया कुटुंबात जन्मलेल्या वासीम यांचे वडील रेल्वे कर्मचारी होते. वासीम लहान असतानाच त्यांच्या वडीलांचे निधन झाले. त्यानंतर रिझवी यांनी उच्च शिक्षण घेतले आणि कमी वयातच काम करु लागले.

खासगी माहिती कमी उपलब्ध

रिझवी यांच्या खासगी आयुष्याबद्दल फारशी कोणाला माहिती नाही. विकिपीडीयाच्या माहितीनुसार त्यांनी सौदी अरब, जपान आणि अमेरिकेतील अनेक स्टोअर्समध्ये काम केले आहे. त्यानंतर ती कामे सोडून ते भारतात परतले. त्यानंतर लखनौ येथे त्यांनी व्यापार सुरु केला. त्यानंतर ते शिया नेते म्हणून ओळखले जाऊ लागले आणि महापालिका निवडणुकीतही सहभागी झाले. त्यानंतर रिझवी हे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एक सुप्रसिध्द नाव झाले. याच दरम्यान ते केंद्रीय शिया बोर्डाचे अध्यक्ष झाले. 2020 पर्यंत ते या पदावर कार्यरत होते. या काळात ते मुस्लीम विरोधी वक्तव्यांमुळे बरेच चर्चेत राहिले. राजकीय जीवनात प्रगती करण्यासाठी ते अशी वक्तव्य करतात, असा आरोप दरवेळी त्यांच्यावर करण्यात आला तसेच अनेकदा त्यांना मुस्लिम समजण्यास देखील नकार देण्यात आला.

राम की जन्मभूमी चित्रपटाची केली निर्मिती

रिझवी यांनी बॉलिवूडमध्ये (Bollywood) नशीब आजमवण्याचे देखील प्रयत्न केले. 2019मध्ये त्यांनी निर्माते म्हणून एक चित्रपट लॉन्च केला. राम की जन्मभूमी या चित्रपटाचे दिग्दर्शक सनोज मिश्र होते. या चित्रपटाची पटकथा वासिम रिझवी यांनी लिहीली होती. 29 मार्च 2019 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात राम मंदिर, बाबरी मशीद बांधणी यासह हलाला सारख्याबाबींवर भाष्य करण्यात आलं होतं. या चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही पण रिझवी मात्र चर्चेत आले. यादरम्यान रिझवी यांनी दहशतवादी अब्दुल मेनन याचा फोन आल्याचंही बोललं जातं.

(हे वाचा:  Explainer: शाही स्नान म्हणजे काय? शाही स्नानावेळी साधूंमध्ये का होतात विवाद?)

रिझवी यांची वादग्रस्त विधाने

या व्यतरिक्त अनेकदा रिझवी यांची विधाने वादग्रस्त ठरली. एका प्रसंगी ते म्हणाले होते की देशातील 9 वादग्रस्त मशिदी हिंदूंच्या स्वाधीन केल्या पाहिजेत. याचवेळी रिझवी यांनी बाबरी मशीदीचेही नाव घेत ती भारतीय भूमीवर कलंक आहे असं म्हणलं होतं. तसेच एकदा इस्लामच्या ध्वजाची तुलना त्यांनी पाकिस्तानी ध्वजाशी करत या शिया नेत्यानं म्हटलं की हिरवा झेंडा हा पाकिस्तानशी संबंधित असून, तो फडकवणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. इस्लामी मदरशांना कुलूप लावावे, असे आवाहनही त्यांनी केलं होतं. अलिकडेच कुराणमधील निवडक आयत हटवण्याविषयी बोलताना रिझवी म्हणाले की मदरशांमध्ये कुराणातील हे आयत मुलांना शिकवले जात आहेत त्यामुळे ते कट्टरपंथी होत आहेत.

Published by: Aiman Desai
First published: March 15, 2021, 11:28 PM IST
Tags: pakistan

ताज्या बातम्या