कोरोना निदानासाठी ऑक्सिमीटर सक्षम नाही? आता का उपस्थित होतोय प्रश्न

कोरोना निदानासाठी ऑक्सिमीटर सक्षम नाही? आता का उपस्थित होतोय प्रश्न

दाट लोकवस्तीत घरोघरी, दारोदारी जाऊन याच ऑक्सिमीटरच्या सहाय्यानं लक्षणं न दिसणाऱ्या कोरोना रुग्णांचा शोध सुरू होता. मात्र, तज्ञांच्या मते प्रत्येकवेळी ऑक्सिमीटरपासून योग्यच माहिती मिळेल असे नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी: कोरोना रुग्णांमध्ये प्रामुख्याने ऑक्सिजनची पातळी (Oxygen Level) कमी होत जाते. बऱ्याच प्रकरणांमध्ये अतिशय गंभीर अवस्था देखील पाहण्यात आली आहे. कोरोनाची सुरुवात झाल्यापासून म्हणजेच एका वर्षांपेक्षा जास्त काळामध्ये पल्स ऑक्सिमीटर (Pulse Oximeter) एक अत्यावश्यक यंत्र झालं. कोरोना काळात पल्स ऑक्सिमीटरची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. पण आता या ऑक्सिमीटरच्या सत्यतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

ऑक्सिमीटर हे रक्तामधील ऑक्सिजनच्या पातळीची रिडिंग सांगणारं एक छोटंसं यंत्र आहे. जे बोटांत किंवा कानात बसवून तपासणी केली जाते. या यंत्राद्वारे इन्फ्रारेड किरणांच्या सहाय्याने शरीरात ऑक्सिजनची पातळी तपासली जाते.

रुग्णालयावरील कोरोना रुग्णांचा दबाव कमी करण्यासाठी दिल्ली सरकारने रुग्णांना घरामध्येच आयसोलेट करण्याची योजना आखली होती. त्यावेळी रुग्णांना हजारोंच्या संख्येने ऑक्सिमीटर वाटण्यात आले होते. जेणेकरून ते आपली ऑक्सिजनची पातळी स्वत:च तपासू शकतील. पण आता तज्ज्ञांचं असं मत आहे की, 'या यंत्राची आपली एक मर्यादा आहे आणि काही बाबतीत असं होऊ शकतं की हे उपकरण योग्य माहिती नाही देऊ शकत.'

आरोग्यसंबंधित अमेरिकन संघराज्य संस्था एफडीएने स्पष्टपणे सांगितलं, 'प्रत्येक वेळी ऑक्सिमीटरपासून योग्यच माहिती मिळेल असे नाही. त्यामुळे कोरोनाचे निदान किंवा विषाणूची लागण झाले की नाही हे सांगण्यासाठी त्याचा वापर अजिबात केला जाऊ शकत नाही.

हे वाचा - कोरोनाचा विळखा आणि लॉकडाऊनची पकड आणखी घट्ट; कुठल्या जिल्ह्यात आहे संचारबंदी?

ऑक्सिमीटरची रीडिंग काही घटकांवर अवलंबून असू शकते. एफडीएने सांगितले की, ब्लॅक त्वचा असलेल्या लोकांबाबतीत हे यंत्र योग्य रीडिंग देत नाही. त्वचेची चरबी, त्वचेचं तापमान, तंबाखूचा वापर आणि नखांवर लावलेल्या नेल पॉलिशमुळे ऑक्सिमीटरचं रीडिंग योग्य होत नसल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. एफडीएने आपल्या निवेदनात स्पष्टपणे सांगितले आहे की, लोक आपल्या घरीच कोविडला मॉनिटर करण्यासाठी या यंत्राचा वापर करत आहे. त्यांनी हे सर्व घटक लक्षात ठेवले पाहिजे आणि आपल्यामध्ये कोणत्याही प्रकराची असामान्य लक्षणं दिसून आल्यानंतर या यंत्रावर विश्वास ठेवू नये.

रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यावर त्याला हायपॉक्सिया नावाने ओळखलं जातं. ज्याची योग्य तपासणी आरोग्य सेवा तज्ज्ञांकडून करण्यात यावी असा सल्ला दिला जातो. एफडीएने सांगितले की, 'जर चेहरा, ओठ आणि नखांवर निळापणा दिसून आला, श्वास घ्यायला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ लागला, छातीत दुखू लागले किंवा हृदयाचे ठोके वाढल्यासारखी स्थिती निर्माण झाली तर लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.'

हे वाचा -   Explainer : राज्यात कोरोना वाढला, नवे निर्बंध लागू; जाणून घ्या तुमच्या मनातल्या Lockdown संदर्भात सगळ्या प्रश्नांची उत्तरं

अशा परिस्थितीत ऑक्सिमीटरवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका असा सल्ला देण्यात आला आहे. एफडीएने अशाप्रकराचा इशारा तेव्हा दिला होतो जेव्हा अमेरिकेच्या रोग प्रतिबंधक व नियंत्रकने (CDC) ऑक्सिमीटरच्या अचूकतेवर खूप कमी डेटा असल्याच्या आधारे या यंत्राला अपुरे असल्याचं म्हटलं होतं.

यापूर्वी डिसेंबर 2020 मध्ये हायपॉक्सियावरून एक संशोधन करण्यात आले होते. त्यामध्ये देखील असे सांगण्यात आले होते की, रक्तवाहिन्यांमध्ये ऑक्सिजनची लेव्हल तपासण्यासाठी या यंत्राचा वापर करताना सर्वात मोठा फॅक्टर त्वचेचा रंग आहे. या संशोधनात असंही सांगण्यात आले होते की, गोऱ्या रंगाच्या त्वचेच्या रुग्णांच्या तुलनेत काळ्या रंगाच्या त्वचेच्या रुग्णांच्या प्रकरणात ऑक्सिमीटर तीन पट कमी अचूक पाहिला गेला.'

First published: February 23, 2021, 7:16 AM IST

ताज्या बातम्या