मराठी बातम्या /बातम्या /explainer /

उत्तर प्रदेशातील कन्नौज परफ्यूमसाठी का आहे प्रसिद्ध? जगात अत्तराची सुरुवात कुठून झाली?

उत्तर प्रदेशातील कन्नौज परफ्यूमसाठी का आहे प्रसिद्ध? जगात अत्तराची सुरुवात कुठून झाली?

उत्तर प्रदेशातील कन्नौजमधील परफ्यूम व्यापारी पियुष जैन (Piyush Jain) आणि समाजवादी पक्षाचे आमदार पुष्पराज जैन उर्फ ​​पंपी जैन (Pushpraj Jain) यांच्या घरावर आणि ठिकाणांवर आयकर विभागाचं धाडसत्र सुरू आहे. कन्नोज परफ्यूमसाठी प्रसिद्ध का आहे? मेसोपोटेमियामध्ये तापुत्ती नावाच्या एका महिलेने तेल आणि फुलांचे मिश्रण करून पहिला परफ्यूम विकसित केल्याचा उल्लेख आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

कन्नौज, 31 डिसेंबर : उत्तर प्रदेशातील कन्नौजमधील परफ्यूम (सुगंधी द्रव्य किंवा अत्तर) व्यापाऱ्यांवर सध्या आयकर विभागाचं धाडसत्र सुरू आहे. आधी पियुष जैन (Piyush Jain) आणि आता समाजवादी पक्षाचे आमदार पुष्पराज जैन उर्फ ​​पंपी जैन (Pushpraj Jain News) यांच्या घरावर आणि ठिकाणांवर छापे टाकले. पियुष जैनच्या घरातून मिळालेली संपत्ती कुबेराला लाजवेल अशी होती. आयटी अधिकाऱ्यांना संपूर्ण घबाड मोजायला जवळपास दोन दिवस लागले. यावरुन अत्तर व्यापारात अमाप पैसा असल्याचं लक्षात येतंय. चला याच निमित्ताने अत्तराचा इतिहास जाणून घेऊ. कशी झाली अत्तराची सुरुवात, भारतात कधीपासून अस्तित्वात आहे?

परफ्यूम हा फ्रेंच शब्द आहे. इत्र हा पर्शियन शब्द असून तो अत्र यापासून तयार झाला आहे. परफ्यूम म्हणजे वनस्पती, फुले आणि पानांपासून तयार केलेलं नैसर्गिक सुगंधी तेल. आपण सध्या वापरत असलेला परफ्यूम हा शब्द per fumus या लॅटिन शब्दावरून आला आहे. ज्याचा अर्थ धुरातून आलेला (through smoke ) असा होतो. हे नंतर रोमन, पर्शियन आणि अरबांनी सांगितले.

मेंढपाळांनी आणलेल्या वनौषधींपासून परफ्यूमचा शोध लागल्याचे मानले जाते. त्यांना जाळल्यानंतर सुगंध येत होता. नंतर ते परफ्यूम म्हणून ओळखले गेले. इजिप्तमध्ये 400 वर्षांपूर्वी पहिल्यांजा परफ्यूम हा शब्द वापरला गेला होता.

2007 मध्ये, पुरातत्वशास्त्रज्ञांनी सायप्रसमध्ये 2000 ईसवीसन पूर्व काळातील एक परफ्यूम कारखाना शोधला होता. सायप्रसला परफ्यूम तयार करण्याचे ज्ञान मेसोपोटेमियातूनच मिळाले असा अंदाज आहे.

मेसोपोटेमियानंतर परफ्यूम तयार करण्याचे तंत्र पर्शियन लोकांच्या हाती होते असे इतिहास तज्ञांचे मत आहे. ज्यांनी अत्तराच्या विकासात मोठं योगदान दिलं. पर्शियन लोकांनी शेकडो वर्षे अत्तराच्या व्यापारावर मक्तेदारी केली. यानंतर परफ्यूम तयार करण्याची कला ग्रीक आणि रोमन साम्राज्यांपर्यंत पोहोचली.

परफ्यूम तयार करण्याच्या पद्धतीचा उल्लेख प्राचीन ग्रीक कागदपत्रांमध्ये आढळतो. पोम्पी येथील एका चित्रकाराच्या घरात एक भित्तीचित्र आहे, ज्यामध्ये परफ्यूम तयार करण्याची ग्रीक आणि रोमन पद्धत दिसते. 100 AD मध्ये रोमन लोक सुगंधासाठी दरवर्षी 2800 टन धूप वापरत होते.

Pushpraj Jain News: कोण आहेत पुष्पराज जैन, काय आहे त्यांचा व्यवसाय? जाणून घ्या स

भारतात परफ्यूम कधी आले?

परफ्यूम हे भारतातील सिंधू संस्कृतीतील असल्याचे मानले जाते. हिंदू आयुर्वेदात अत्तराचा उल्लेख चरक संहिता आणि सुश्रुत संहितेत प्रथमच आढळतो. अत्तर तयार करण्याचा उल्लेख बृहत-संहितेच्या एका मोठ्या ग्रंथाचाही भाग आहे. जे भारतीय खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ, ज्योतिषी वराहमिहिर यांनी लिहिले आहे.

1975 च्या अहवालानुसार, पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. पियोलो रोवेस्टी यांना टेराकोटा डिस्टिलेशन यंत्राचा शोध लागला होता. ज्याची कार्बन डेट 3000 BC सांगितली गेली आहे.

7व्या शतकाच्या सुरुवातीस भारतातील परफ्यूमसाठी कन्नौज जगभरात ओळखले जात होते. ज्याची पद्धत पर्शिया (इराण) येथून आली होती. येथून परफ्यूम जगातील अनेक देशांमध्ये जाते. सध्या हैदराबाद अत्तरासाठी प्रसिद्ध आहे. त्याचा सुगंध परफ्यूमपेक्षा जास्त काळ टिकतो. व्यवसाय म्हणून, पॅरिसमध्ये 1190 मध्ये परफ्यूम तयार करण्यास सुरुवात झाली. येथूनच आधुनिक परफ्यूमची सुरुवात मानली जाते.

इस्लाम आणि परफ्यूम

परफ्यूम तयार करण्यात इस्लामिक संस्कृतीचाही मोठा वाटा मानला जातो. इस्लामच्या उदयानंतर, सुगंधी उत्पादनात वाढ झाली. त्यांच्या संस्कृतीनुसार ते दैनंदिन जीवनातही परफ्यूम वापरत. ज्यामध्ये कस्तुरी आणि गुलाबाचा सर्वाधिक वापर करण्यात आला. व्यापारी म्हणून अरब आणि पर्शियन लोक मसाले, औषधी वनस्पती आणि कस्तुरी सारख्या प्राण्यांच्या सुगंध घेऊन जगभरात पोहचले.

First published:

Tags: Income tax, Uttar pardesh