मराठी बातम्या /बातम्या /explainer /

National Pollution Control Day: हजारो लोकांच्या मृत्यूनंतरही आपण काहीच धडा घेतला नाही?

National Pollution Control Day: हजारो लोकांच्या मृत्यूनंतरही आपण काहीच धडा घेतला नाही?

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस 2021 (National Pollution Control Day 2021) दरवर्षी 2 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. 37 वर्षांपूर्वी, 2-3 डिसेंबरच्या रात्री, भोपाळमधील औद्योगिक दुर्घटनेत गॅस गळतीमुळे मरण पावलेल्या लोकांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. गेल्या वर्षभरात भारताच्या राजधानीसह देशातील सर्व प्रमुख शहरांमधील प्रदूषणाची पातळी गेल्या वर्षीच्या तुलनेत झपाट्याने वाढली आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

भोपाळ, 2 डिसेंबर: भारतातील (India) वायू प्रदूषणाची (Air Pollution) चर्चा तेव्हाच होते जेव्हा दिल्लीचं वातावरण बिघडतं. आज कदाचित तेच बरोबर वाटत आहे. पण विचित्र गोष्ट अशी आहे की भारतात साजरा केला जाणारा राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस (National Pollution Control day) जगातील सर्वात वाईट औद्योगिक घटनेत बळी पडलेल्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. 2-3 डिसेंबर 1984 रोजी भोपाळमध्ये विषारी वायू गळतीची औद्योगिक दुर्घटना घडली. ज्यात हजारो सामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आणि त्या प्रदूषणाचा परिणाम 37 वर्षांनंतरही दिसून येतो.

घटनेतून काहीच धडा घेतला नाही?

ही दुर्घटना जगभरातील पर्यावरणवाद्यांसाठी एक उत्तम केस स्टडी बनली आहे. हा दिवस औद्योगिक व्यवस्था आणि त्यामधील मानवी चुकांमुळे होणारे प्रदूषण याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. या अपघातासोबत मोठं दुर्दैव हेही आहे की घटनेच्या 37 वर्षांनंतरही देशात पर्यावरणाबाबत म्हणावी तशी जनजागृती झालेली नाही, जी आवश्यक आहे.

दिवसेंदिवस प्रदूषण वाढतंय

आज देशाची राजधानी प्रत्येक हिवाळ्याच्या ऋतूपूर्वी विक्रमी प्रदूषणाशी लढा देताना दिसत आहे. अद्याप त्याला यश आलेलं नाही. देशातील प्रत्येक शहरात वायू प्रदूषणाचे नवीन विक्रम होत आहेत. त्याचा थेट परिणाम लोकांच्या जीवनमानावर होत आहे.

काय घडलं होतं त्या दिवशी?

भोपाळ दुर्घटना हा अनेक अर्थांनी खूप मोठा धडा देणारा अपघात होता. 1984 मध्ये, 2-3 डिसेंबरच्या रात्री युनियन कार्बाइड कारखान्यात मिथाइल आयसो सायनाइड (MIC) ची गळती झाली होती. हा विषारी वायू हवेत मिसळल्याने तो शहरात दूरवर पसरला आणि हजारो लोकांसाठी जीवघेणा ठरला. एवढेच नाही तर हवेत राहण्यासोबतच भोपाळच्या तलावात आणि तिथल्या जमिनीतही मिसळला.

घटनेच्या 36 वर्षांनंतरही इथं जन्माला येणारी मुलं भोगतायेत शिक्षा! काय आहे कारण?

काय परिणाम झाला?

भोपाळ दुर्घटना केवळ वायू प्रदूषणाचेच नाही तर जल प्रदूषण आणि जमीन प्रदूषणाचेही उदाहरण बनले. या अपघाताचा फटका आजही कायम असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्या दिवशी एकूण 40 टन मिक गॅसची गळती झाली. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या आकडेवारीनुसार, त्या अपघातात लाखो लोकांना गॅसची बाधा झाली होती, त्यापैकी एकूण 23 हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

सध्याची वायू प्रदूषणाची समस्या वेगळ्या

प्रदूषणाचे गांभीर्य जागृत करण्यासाठी ही घटना आठवली तरी पुरेशी आहे, पण भारतातील प्रदूषणाची समस्या वेगळ्याच प्रकारे चिंताजनक आहे. देशाची गंभीर स्थिती समजून घेण्यासाठी त्याचे स्वरूप समजून घेतले पाहिजे. कारण आणि परिणामाच्या दृष्टीने सध्याची परिस्थिती भोपाळ दुर्घटनेसारखी स्पष्ट नाही. मानवनिर्मित कारणांमुळे प्रदूषण वाढत असून त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर अप्रत्यक्षपणे होत आहे.

विविध स्त्रोतांचा समावेश

प्रथम जर आपण स्त्रोतांबद्दल बोललो, तर वाहनांपासून होणारे प्रदूषण, ऊर्जा निर्मितीच्या मोठ्या उद्योगांपासून ते लहान उद्योग जसे की वीट कारखाना, बांधकाम उद्योग आणि रस्त्यांवरील धूळ इ. नैसर्गिक स्रोत जसे की वादळ, जंगलातील आग आणि कापणी दरम्यान मोकळ्या शेतात लागलेली आग. या सर्वांचा हंगामी प्रदूषणात मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.

Explainer : Omicron डेल्टापेक्षा खरंच घातक आहे का; लशींचा प्रभाव कितपत?

असे काम करणे आवश्यक आहे

प्रदूषणाची समस्या सोडवण्यासाठी व्यापक आणि मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, बांधकाम उद्योगात, अशा पद्धती काढून टाकल्या पाहिजेत ज्यामध्ये वातावरणात धूळ कमीत कमी जाईल. जीवाश्म इंधनाचे पर्याय शोधणे आणि ते लोकांना उपलब्ध करून देणे तसेच ते वापरण्यास सोपे करणे. उदाहरणार्थ, इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंग सोपे आणि सुलभ करावे लागेल.

प्रदूषणाच्या गांभीर्याबद्दल लोकांना जागरूक करणे अत्यंत आवश्यक आहे. राष्ट्रीय पर्यावरण दिन आपल्याला आठवण करून देतो की पर्यावरणाला हलक्यात घेणे ही एक मोठी शिक्षा असू शकते. कोविड-19 महामारीने आपल्याला अनेक धडे दिले आहेत आणि आपल्या स्वतःच्या समस्यांबद्दल गंभीर राहण्यास शिकवले आहे. हा दिवस आपल्याला अशी संधी देतो.

First published:

Tags: Air pollution, Bhopal News, Gas