मराठी बातम्या /बातम्या /explainer /Explainer: स्पेशल कमांडो आणि डोक्यावर किप्पा घालणारे पहिले इस्रायली पंतप्रधान Naftali Bennett जागतिक राजकारण कुठल्या दिशेला नेणार?

Explainer: स्पेशल कमांडो आणि डोक्यावर किप्पा घालणारे पहिले इस्रायली पंतप्रधान Naftali Bennett जागतिक राजकारण कुठल्या दिशेला नेणार?

नफ्ताली बेनेट (Naftali Bennett) यांनी रविवारी इस्रायलच्या पंतप्रधानपदाची (Prime minister) शपथ घेतली. कट्टर धार्मिक आणि कंमांडो म्हणून काम केलेले बेनेट काय परिणाम करणार?

नफ्ताली बेनेट (Naftali Bennett) यांनी रविवारी इस्रायलच्या पंतप्रधानपदाची (Prime minister) शपथ घेतली. कट्टर धार्मिक आणि कंमांडो म्हणून काम केलेले बेनेट काय परिणाम करणार?

नफ्ताली बेनेट (Naftali Bennett) यांनी रविवारी इस्रायलच्या पंतप्रधानपदाची (Prime minister) शपथ घेतली. कट्टर धार्मिक आणि कंमांडो म्हणून काम केलेले बेनेट काय परिणाम करणार?

जेरुसलेम (इस्रायल), 14 जून :  इस्रायलमधील (Israel) बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) दशकाचा अखेर अंत झाला आहे. स्वतःला इस्रायलचा राजा म्हणवणाऱ्या  बेंजामिन नेतान्याहू (benjamin netanyahu) यांना पदावरून हटवत नफ्ताली बेनेट (Naftali Bennett) यांनी रविवारी इस्रायलच्या पंतप्रधानपदाची (Prime minister) शपथ घेतली. कधीकाळी स्पेशल फोर्सचे कमांडो असलेले बेनेट हे शक्तिशाली आणि राजकारणापासून ते उद्योग व्यवसायापर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये स्वतःला सिद्ध करत आलेलं व्यक्तिमत्व आहे.

युतीमुळे मिळाले बहुमत इस्रायलमधील 120 सदस्यीय संसद नेसेटमधील उजव्या विचारसरणीच्या यामिना पार्टीच्या 60 सदस्यांनी 49 वर्षीय बेनेट यांच्या बाजूनं तर 59 सदस्यांनी त्यांच्या विरोधात मतदान केलं. यामुळे बेनेट हे इस्रायलसारख्या लष्करीदृष्टया बळकट देशाचे प्रमुख बनले आहेत. हा नेता कोण आणि कसा आहे, इस्रायल-पॅलेस्टाईनबाबत (Palestine) आता नवीन कोणते मुद्दे पुढे येणार हे जाणून घेण्याची सर्व जगाला उत्सुकता लागून राहिली आहे.

ऊर्जावान अमेरिकन परप्रांतीयाचा मुलगा

बेनेट हे 71 वर्षीय नेतान्याहू यांच्या तुलनेत खूपच तरुण आणि ऊर्जावान आहे. बेनेट यांचा जन्म इस्रायलमधील हायफा या शहरात झाला. ते ज्यू (Jew) धर्माचे आहेत. तेलअवीवमध्ये वास्तव्य करणाऱ्या बेनेट यांनी नेतान्याहू सरकारमध्ये अर्थ आणि शिक्षण यासारख्या महत्वाच्या मंत्रालयांचे कामकाज सांभाळले. ते इस्रायल लष्करात कमांडो म्हणूनही कार्यरत होते. बेनेट यांच्या पालकांचा जन्म अमेरिकेत (America) झाला असला तरी बेनेट यांचा जन्म इस्रायलमधील धार्मिकदृष्टया कट्टर असलेल्या हायफा शहरात झाला आहे. यानंतरच्या काळात त्यांचे पालक कामाच्या निमित्ताने कधी इस्रायल तर कधी अमेरिकेत वास्तव्यास राहिले. त्यामुळे बेनेट यांच्यामध्ये गुणवैविध्य दिसते. यामुळे त्यांचे केवळ इंग्रजी भाषेवर प्रभुत्वच नाही तर ते आधुनिक तसेच धार्मिकदेखील आहेत.

किप्पा (Kippa) परिधान करणारे पहिले पीएम

याच कारणामुळे ते वैयक्तिक आयुष्यात पूर्णतः ज्यू चालीरिती मानतात. कट्टर ज्यू लोकांप्रमाणे ते आपल्या डोक्यावर एक विशिष्ट प्रकारची टोपी परिधान करतात. या टोपीला किप्पा असं म्हणतात. ही टोपी डोक्याच्या मागील भागास कव्हर करते. किप्पा परिधान करणारे बेनेट हे इस्रायलचे पहिले पंतप्रधान असतील. यामुळेच बेनेट राजकारणात येऊन आपला धार्मिक विचार लपवतील असा विचार नक्कीच करता येत नाही.

बेनेट यांची पार्श्वभूमी वादग्रस्त

1996 मध्ये त्यांनी हिजबुल्लाहच्या विरोधात करण्यात आलेल्या लष्करी कारवाईचे नेतृत्व केले होते. या कारवाईत 106 लेबनानी नागरिक मारले गेल्याचा आरोप इस्रायलमधील येडीओथ अहरोनोथ या माध्यमाने त्यांच्यावर केला होता. या नागरिकांमध्ये यूएनच्या चार जणांचाही समावेश होता.

तंत्रज्ञानामुळे आले राजकारणात

लष्करातून बाहेर पडल्यानंतर बेनेट अचानकपणे तंत्रज्ञान क्षेत्रात उतरले. त्यांनी तेल अवीवमध्ये एक टेक कंपनी सुरु केली. त्यानंतर काही दिवसांतच ही कंपनी त्यांनी 145 दशलक्ष डॉलर्सला विकून टाकली. या कंपनीच्या विक्रीनंतर ते राजकारणात सक्रिय झाले. त्यावेळी नेतान्याहू विरोधी पक्षात होते. बेनेट यांनी त्यांच्यासोबत कामकाज सुरु केले. त्यानंतर बेनेट यांनी नेतान्याहू यांच्यासोबत फारकत घेतली. त्यानंतर त्यांनी येशा कौन्सिलिंग सुरु केले. ही संस्था पश्चिमेकडील ज्यूंच्या हितासाठी काम करते.

हे ही वाचा:''राजकारणात पैसाच बोलतो आहे'', काळ्या पैशांवरुन शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

आपले अस्तित्व राखण्यासाठी अरबी देशांनी वेढलेल्या इस्रायलला नेहमीच आक्रमक पवित्रा घ्यावा लागला. वेळोवेळी या भागातून सातत्याने दहशतवादी कारवायांविषयी वृत्त येत असते. शेजारील देश इस्रायलमध्ये अशा पध्दतीच्या दहशतवादी कारवाया करीत असतात. या पार्श्वभूमीवर नव्या पंतप्रधानांचा दृष्टीकोन कसा असेल तेही पाहूया.

नफ्ताली बेनेट हे कट्टर राष्ट्रवादी नेते मानले जातात बेनेट कदाचित पॅलेस्टाईनचे अस्तित्व नाकारु शकतील किंवा त्या अनुषंगाने ते आक्रमक असले तरी त्यात आता एक नवा अगल आलेला आहे. ते आता अनेक विचारसरणीच्या पक्षांनी एकत्र येत केलेल्या युती सरकारचे प्रतिनिधी आहे. यातील काही पक्षांना अरब देशांकडून (Arab countries) मदत मिळत असल्याने ते नरम भूमिका घेत आले आहेत. त्यामुळे सत्ता राखण्यासाठी बेनेट यांना भविष्यात पॅलेस्टाईनबाबतचा दृष्टीकोन बदलावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

First published:
top videos

    Tags: Israel, Prime minister