मराठी बातम्या /बातम्या /explainer /कारमध्ये एकटे असाल तरी मास्क अनिवार्य, तुमची गाडी सार्वजनिक जागा आहे का? जाणून घ्या न्यायालयाची भूमिका

कारमध्ये एकटे असाल तरी मास्क अनिवार्य, तुमची गाडी सार्वजनिक जागा आहे का? जाणून घ्या न्यायालयाची भूमिका

बुधवारी दिलेल्या एका निर्णयानुसार, तुम्ही तुमच्या कारमध्ये एकटे असलात तरीही मास्क घालणे अनिवार्य आहे.

बुधवारी दिलेल्या एका निर्णयानुसार, तुम्ही तुमच्या कारमध्ये एकटे असलात तरीही मास्क घालणे अनिवार्य आहे.

बुधवारी दिलेल्या एका निर्णयानुसार, तुम्ही तुमच्या कारमध्ये एकटे असलात तरीही मास्क घालणे अनिवार्य आहे.

    नवी दिल्ली, 9 एप्रिल : तुमच्या मालकीची कार (Own Car)ही सार्वजनिक जागा (Public Place)आहे का,हा वाद काही नवीन नाही. परंतु सध्या हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण दिल्ली उच्च न्यायालयानं (Delhi High Court) बुधवारी दिलेल्या एका निर्णयानुसार, तुम्ही तुमच्या कारमध्ये एकटे असलात तरीही मास्क घालणे अनिवार्य आहे. कारण तुमची कार सार्वजनिक ठिकाणी (Public Place) असते तेव्हा तुम्हाला आणि इतरांना कोविड-19चा(Covid-19)धोका निर्माण होऊ शकतो.

    या निर्णयाचे तीन पैलू आहेत, एक म्हणजे खासगी वाहनाला सार्वजनिक जागा समजण्यामागे काय तर्क आहे. दुसरा खासगी वाहनात मास्क घालण्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वं काय आहेत आणि या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाची (Supreme Court) काय भूमिका आहे.

    स्वतःच्या वाहनात एकटेच असूनही मास्क न घातल्याबद्दल दंड झालेल्या नागरिकांनी दाखल केलेल्या एका याचिके वरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंह यांच्या खंड पीठानं स्पष्ट केलं की,खासगी वाहनात तुम्ही एकटे असा किंवा बरोबर आणखी लोक असले तरी प्रत्येकानं मास्क लावणं किंवा फेस कव्हर अनिवार्य आहे.

    खासगी कार सार्वजनिक जागा का आहे?

    खासगी कार देखील सार्वजनिक ठिकाणी असताना सार्वजनिक जागा (Public Space)म्हणून मानली जाण्याच्या मुद्द्यावर भूमिका मांडताना न्यायालयानं असा युक्तिवाद केला की, तुमची खासगी कार सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागेत असेल तर ती सार्वजनिक जागा म्हणूनच मानली जाईल. दोन वर्षांपूर्वी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नसताना बिहारमधील एका खटल्यामुळे हा मुद्दा चर्चेत आला होता. सर्वोच्च न्यायालयानं त्या वेळी महत्त्वाची भूमिका मांडली होती.

    हे ही वाचा-Explainer: महाराष्ट्रातच का वाढतोय कोरोनाचा संसर्ग? ही असू शकतात कारणं

    सार्वजनिक स्थळाची व्याख्या करताना न्यायमूर्ती सिंह म्हणाल्या की,सार्वत्रिकदृष्ट्यायाची एकच व्याख्या केली जाऊ शकत नाही. मोटार वाहन कायदा, अवैध वाहतूक प्रतिबंध कायदा,सीसीपी,अंमली पदार्थ विरोधी कायदा आणि सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान निषेध यासारख्या अनेक कायद्यांमधील सार्वजनिक ठिकाणाच्या व्याख्येचासंदर्भ देत,परिस्थिती आणि घटना यांच्या अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणाची व्याख्यासमजून घेतली पाहिजे, असं त्यांनी स्पष्ट केलं. एवढेच नव्हे तर‘सार्वजनिक ठिकाण’याबाबत कोणतीही सार्वजनिक मालमत्ता या अंतर्गत येते तसेच जी खासगी मालमत्ता लोकांच्या संपर्कात येते ती सार्वजनिक ठिकाण ठरते, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं असल्याचं न्यायमूर्ती सिंग यांनी नमूद केलं.

    खासगी कारमधीलमास्कचा नियम :

    उच्च न्यायालयाचे अलिकडच्या काळातील आदेश लक्षात घेता,केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry)न्यायालयात असं स्पष्ट केलं की,वाहनात एकटे असताना मास्कघालण्याबाबत वेगळ्या सूचना दिलेल्या नाहीत. परंतु यापूर्वी, दिल्ली सरकारनं(Delhi Government)उच्च न्यायालयाला स्पष्टपणे सांगितलं होतं की,खासगी असो वा सार्वजनिक प्रत्येक वाहनात मास्क घालणे अनिवार्य असल्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं 8एप्रिल2020च्या एका आदेशात स्पष्ट केले होते की,कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी असताना प्रत्येक व्यक्तीला मास्क घालणं बंधनकारक आहे. एकंदरीत, मास्क घालण्याबाबतमार्गदर्शक तत्त्वे अगदी स्पष्ट आहेत, त्यामुळं त्याबाबत शाब्दिक खेळ करणं योग्य नाही.

    सर्वोच्च न्यायालयानं खासगी कारलासार्वजनिकजागा मानलं :

    सीमाशुल्क दुरुस्ती कायद्याच्या माध्यमातून 2016 मध्ये बिहारमध्ये (Bihar)दारूबंदी करण्यात आली.या कायद्यानुसार राज्यातील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा अनधिकृत ठिकाणी मद्यपान केल्यास दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली. 2019मध्ये सर्वोच्च न्यायालयात एका प्रकरणात या नियमावरून उहापोह झाला. 25 जून 2016 रोजी खासगी वाहनानं(Own Car)झारखंडमधील(Jharkhand)गिरीडीहहून पाटण्याला(Patana)जाणाऱ्या सतविंदर सिंग यांना मद्यपान केल्याबद्दल शिक्षा झाली. विशेष म्हणजे सतविंदर सिंगच्या गाडीत दारू सापडली नाही. कायद्यानुसार,एखादी व्यक्ती दारूच्या नशेत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आल्यास त्याला शिक्षा होऊ शकते. मात्र सिंग यांना शिक्षा झाली, तेव्हा या तरतूदीचा कायद्यात समावेश नव्हता. त्यामुळे सतविंदर सिंग यांनी आपल्याला शिक्षा केल्याच्या विरोधात आधी उच्च न्यायालयात आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सिंग यांच्या वतीनं न्यायालयात दोन युक्तिवाद करण्यात आले. एक म्हणजे त्यांनी दारूबंदी असलेल्या बिहार राज्यात मद्यपान केलेलं नव्हतं आणि त्यांनी सार्वजनिक ठिकाणी नव्हे तर आपल्या स्वतःच्या खासगी मालकीच्या कारमध्ये मद्यपान केलं होतं. यावर निर्णय देताना न्यायालयानं पहिला युक्तिवाद स्वीकारला;पण दुसरा युक्तिवाद मात्र नाकारला. परवानगीशिवाय कोणालाही दुसऱ्याच्या खासगी वाहनाकडे जाण्याचा अधिकार नाही हे बरोबर आहे,परंतु सार्वजनिक रस्त्यावर खासगी वाहन उभे असल्यास लोकांचा त्याच्याशी संपर्क येऊ शकतो, त्यामुळे रस्त्यावर उभे असलेले किंवा धावणारे खासगी वाहनदेखील सार्वजनिक जागा(Public Space)समजलं जाईल,असं सर्वोच्च न्यायालयानं त्या वेळी स्पष्ट केलं होतं.

    First published:

    Tags: Corona spread, Mask