Home /News /explainer /

Mahadev Govind Ranade Birth anniversary: विधवेशी विवाह करण्याचा मित्रांचा सल्ला न्यायमूर्ती रानडे यांनी का नाकारला?

Mahadev Govind Ranade Birth anniversary: विधवेशी विवाह करण्याचा मित्रांचा सल्ला न्यायमूर्ती रानडे यांनी का नाकारला?

न्यायमूर्ती रानडे (Justice Ranade) म्हणून प्रसिद्ध असलेले महादेव गोविंद रानडे (Mahadev Govind Ranade) हे एक समाजसुधारक, भारतीय शिक्षणतज्ञ, न्यायशास्त्रज्ञ, लेखक, अर्थशास्त्रज्ञ आणि इतिहासकार तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक सदस्य होते. इतक्या पात्रतेनंतरही ते धार्मिक आणि समाजसुधारक म्हणून अधिक प्रसिद्ध झाले. त्यांनी समाजातील अनेक दुष्कृत्ये दूर करण्यासाठी अर्थपूर्ण प्रयत्न केले आणि हिंदू धार्मिक श्रद्धा सुधारण्यास हातभार लावला.

पुढे वाचा ...
    मुंबई, 18 जानेवारी : भारताच्या (India) स्वातंत्र्याच्या लढ्यात अनेकांनी योगदान देताना सामाजिक सुधारणांसारखे कार्य देखील केलं आहे. अशी लोकं भारत देश आणि समाज घडवण्यासाठी अधिक ओळखली जातात. न्यायमूर्ती रानडे या नावाने प्रसिद्ध असलेले महादेव गोविंद रानडे (Mahadev Govind Ranade) हे त्यापैकी एक होते. न्यायमूर्ती रानडे हे देशातील शिक्षण आणि त्यांच्या इतिहासाबाबत समाज आणि धार्मिक सुधारणांविषयी जागरुकता पसरवल्याबद्दल सदैव स्मरणात राहतील. एक शांत आणि धैर्यशील व्यक्तिमत्व असलेलd/e न्यायमूर्ती रानडे यांची आज 18 जानेवारी रोजी जयंती आहे. पत्नीलाही दिलं शिक्षण न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म 18 जानेवारी 1842 रोजी महाराष्ट्रातील नाशिकच्या निफाड शहरातील कट्टर चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. वडील मंत्री असताना त्यांचे बालपण कोल्हापुरात गेले. त्यांच्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर, त्यांच्या सामाजिक सुधारणावादी मित्रांची इच्छा होती की त्यांनी एका विधवेशी लग्न करावे. मात्र, कुटुंबाच्या इच्छेनुसार रानडे यांनी रमाबाई या मुलीशी लग्न केले आणि तिला शिक्षण दिले. पतीच्या निधनानंतर रमाबाईंनी देखील आपलं काम चालूच ठेवलं. उच्चशिक्षित.. रानडे यांचे सुरुवातीचे शिक्षण कोल्हापुरातील मराठी शाळेत झाले आणि नंतर ते इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेले. त्यानंतर वयाच्या 14 व्या वर्षी ते मुंबईतील एल्फिस्टन कॉलेजमध्ये शिकण्यासाठी गेले. ते बॉम्बे युनिव्हर्सिटीच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी होते. 1962 मध्ये त्यांनी बीए आणि त्यानंतर चार वर्षांनी एलएलबीची पदवी प्रथम श्रेणीत मिळवली. न्यायाधीश पदापर्यंत पोहोचले रानडे यांनी आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर देश, समाज आणि धर्म यांच्या उन्नतीसाठी केला. त्यांनीच मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात भारतीय भाषांचा समावेश करून घेतला. त्यांच्या गुणवत्तेमुळे त्यांची बॉम्बे स्मॉल कॉज कोर्टात प्रेसीडेंसी मॅजिस्ट्रेट म्हणून नियुक्ती झाली. 1893 पर्यंत ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले होते. रशियन शास्त्रज्ञांचं 'ग्रहांवरील मानवाच्या एकाकीपणावर' संशोधन इतिहास विषयात रस एवढेच नव्हे तर एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये इतिहासाचे शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. यामुळे त्यांना भारतीय इतिहासात विशेषत: मराठा इतिहासात विशेष रुची निर्माण झाली, त्यामुळेच त्यांनी 1900 च्या सुमारास 'राईज ऑफ मराठा पॉवर' हे पुस्तकही लिहिले. भारतीयांमध्ये इतिहासाप्रती आवश्यक संवेदनशीलता नसल्याने त्यांना नेहमीच काळजी वाटत असे. समाजाच्या भल्यासाठी रानडे यांच्या समाजसुधारणेच्या प्रयत्नांचा नेहमीच शिक्षणावर प्रभाव पडलेला दिसतो. धार्मिक सुधारणांपासून ते सार्वजनिक शिक्षणापर्यंत, त्यांना भारतीय कुटुंबांच्या प्रत्येक पैलूमध्ये प्रगतीशील सुधारणा पहायची होती. निरुपयोगी रूढीवादी परंपरा आणि श्रद्धा यांना त्यांचा पूर्ण विरोध होता. लग्नाच्या थाटामाटात होणारा अनावश्यक खर्च, बालविवाह, विधवा मुंडण, महासागर ओलांडून प्रवास करण्यावर जातीय बंधने अशा अनेक वाईट गोष्टींना त्यांनी विरोध केला. हिंदू धर्मासाठी रानडे यांचा हिंदू धर्माच्या आध्यात्मिक बाजूकडे अधिक कल होता. त्यांचा असा विश्वास होता की त्यांच्या काळात हिंदू धर्म अधिक कर्मकांडात अडकला होता. त्यांनी ब्राह्मो समाजाच्या प्रेरणेने उभ्या राहिलेल्या प्रार्थना समाजाच्या स्थापनेत योगदान दिले. याशिवाय विधवा पुनर्विवाह आणि स्त्री शिक्षणावर विशेष काम करत त्यांनी महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. रानडे यांनी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना केली आणि ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. याशिवाय अर्थशास्त्रावरील त्यांची मते फार मोलाची मानली जातात. भारतातील आर्थिक समस्या सखोलपणे समजून घेणारे ते पहिले होते. त्यांनी सर्व आर्थिक क्षेत्र, कृषी, उद्योग इत्यादी समस्यांचा अभ्यास केला आणि समस्यांवर उपाय देखील मांडले. त्यांना कधीकधी भारतीय अर्थशास्त्राचे जनक देखील म्हटले जाते.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: History

    पुढील बातम्या