Home /News /explainer /

Magawa | असा उंदीर ज्याच्या मृत्यूची जगभर होतेय चर्चा! कारण वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

Magawa | असा उंदीर ज्याच्या मृत्यूची जगभर होतेय चर्चा! कारण वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

एक आफ्रिकन उंदीर ((African Rat) हा लँडमाइन्स ओळखण्याच्या विशेष कौशल्यामुळे नेहमीच चर्चेत होता. मगावा (Magawa) नावाच्या या पाळीव उंदारने कंबोडिया (Cambodia) मध्ये शेकडो भूसुरुंगाचा Landmines) तपास लावला आहे. अलीकडेच त्याच्या मृत्यूमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 13 जानेवारी : भूसुरुंग (Landmines) ही जगातील एक मोठी समस्या होत चालली आहे. जगातील अनेक भागात लष्करी संघर्षांदरम्यान लँड माइन्स बसवण्यात येतात. मात्र, या बसवलेल्या लँड माइन्स पुन्हा काढले जात नाही, कारण हे त्यांना काढणं जोखमीचं काम आहे. पण कंबोडियामध्ये त्यांना काढण्यासाठी आफ्रिकन उंदीर (African Rat) वापरण्यात आले होते. मगावा (Magawa) नावाच्या या उंदराने भूसुरुंग हटवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. या 8 वर्षीय सेवानिवृत्त उंदराचा नुकताच मृत्यू झाला, त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विशेष प्रशिक्षण देण्यात आले टांझानियामध्ये जन्मलेल्या मगावाला त्याच्याच देशात स्फोटके ओळखण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. वयाच्या तीसऱ्या वर्षी, त्याला कंबोडियाच्या वायव्येकडील सीएम रीप येथे हलवण्यात आले, जिथे त्याने 24 लाख चौरस फूट क्षेत्रामध्ये भूसुरुंग ओळखण्यासाठी पाच वर्षे घालवली. धोकादायक भूसुरुंग आग्नेय आशियामध्ये स्थित, कंबोडिया जगातील सर्वात धोकादायक भूसुरुंग क्षेत्र म्हणून ओळखले जाते. व्हिएतनाम युद्ध आणि विसाव्या शतकातील रक्तरंजित यादवी युद्धादरम्यान ही स्फोटके पेरण्यात आली होती. पण तेव्हापासून ती काढली गेली नाही. युद्ध संपल्यानंतरही अनेक लोकांचे यामुळे जीव गेले आहेत. शौर्याचे काम मगावाला प्रशिक्षण देणारी संस्था अपोपो म्हणते की, तो निवृत्त होईपर्यंत त्याने एकूण 71 भूसुरुंग आणि 38 स्फोटकांचा तपास लावला होता. यानंतर सप्टेंबर 2020 मध्ये त्याला ब्रिटीश धर्मादाय संस्थेने शौर्यासाठी सुवर्णपदक देखील दिलं होतं. यापूर्वी असा मान फक्त श्वानांनाच दिला जात होता. डॉल्फिनची Sex life आणि प्रजनन यांच्यात काय फरक आहे? संशोधनातून धक्कादायक माहिती कसा झाला मृत्यू अपोपोने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मगावाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याचा 8 वा वाढदिवस साजरा केला होता. तो त्याच्या आयुष्याचा शेवटचा आठवडा सामान्यपणे पार करत होता. मात्र, शांतपणे मरण्यापूर्वी तो थोडासा मंदावला होता. त्याचं अन्नपाण्यावरुन मन उडाल्याचे दिसून येत होतं. या काळात तो जास्त झोपून असायचा. दशकांनंतरही लोक मरत आहेत कंबोडियामध्ये बराच काळ लष्करी संघर्ष झालेला नाही, पण त्यानंतरही अनेक दशकांनंतरही भूसुरुंगांमुळे लोकांचा बळी जात आहे. लँडमाइन आणि क्लस्टर म्युनिशन मॉनिटरच्या मते, या देशात 2020 मध्ये 65 लोक स्फोटकांमुळे ठार झाले, ज्यामध्ये 30 टक्के मुले होती. जमिनीत संसर्ग या आकडेवारीनुसार, कंबोडियामध्ये 1979 ते ऑक्टोबर 2019 या काळात या भूसुरुंग आणि स्फोटकांच्या अवशेषांमुळे 19 हजार लोकांचा मृत्यू झाला असून 25 हजार लोक जखमी झाले आहेत. 2020 मध्ये कंबोडियामध्ये बहुतेक भूसुरुंग हटवण्यात आले आहेत. त्यानंतरही 300 चौरस मैल जमीन त्या स्फोटक उपकरणांमुळे संक्रमित झाली होती. मगावा सारख्या उंदरांना लँडमाइन्स शोधण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. कारण, त्यांच्या हलक्या वजनामुळे लँडमाइन्सचा स्फोट होत नाही, तर ते लँडमाइन स्फोटकांना त्यांच्या वासाने ओळखतात, जे मानवांसाठी आणि अगदी कुत्र्यांसाठी देखील एक मोठा धोका आहे. उंदीर हा एक दुष्ट आणि रोग निर्माण करणारा प्राणी मानला जात असताना, मगावाकडे नेहमीच सुपरहिरो म्हणून पाहिले जाते.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: War

    पुढील बातम्या