Home /News /explainer /

नखे आणि केस कापल्यावर वेदना का होत नाही? हे आहे शास्त्रीय कारण

नखे आणि केस कापल्यावर वेदना का होत नाही? हे आहे शास्त्रीय कारण

आपल्या शरीराचा कोणताही भाग कापला की खूप वेदना होतात. कधीकधी वेदना एवढ्या होतात की ते सहन करणे कठीण होते. अशा परिस्थितीत जेव्हा नखे ​​आणि केस कापले जातात तेव्हा वेदना का जाणवत नाहीत.

  मुंबई, 28 एप्रिल : जेव्हा आपली नखे आणि केस वाढतात तेव्हा आपल्याला ते कापावे लागतात. पण, आपण हे करतो तेव्हा आपल्याला अजिबात वेदना होत नाहीत. नखे आणि केस हे दोन्ही शरीराचे अवयव आहेत, तरीही असं का होतं? शरीराचे इतर भाग असे आहेत की त्यात किरकोळ लागलं तरी वेदना जाणवू लागतात. मग, नख आणि केसांच्या बाबतीत वेगळा न्याय का? चला यामागचं शास्त्र जाणून घेऊ. आपल्या हात आणि पायांसह सरासरी 20 नखे असतात. हाताच्या आणि पायाच्या बोटांना चिकटलेली नखे स्वतःच वाढत राहतात. जेव्हा ते मोठे होतात तेव्हा आपल्याला अडचण वाटू लागले. परिणामी आपण ते कापतो. का दुखत नाही? नख आणि केस मृत पेशींनी बनलेले असल्यामुळे त्यांना कापताना काहीच त्रास होत नाही. त्यांना डेड सेल्स देखील म्हणतात. नखे ही आपल्या शरीरातील एक विशेष रचना आहे जी त्वचेपासून जन्माला येते. ते केराटिन नावाच्या पदार्थापासून बनवले जातात. केराटिन हा निर्जीव प्रथिनांचा एक प्रकार आहे. नखाचा पाया बोटाच्या त्वचेच्या आत असतो. नखाखालची त्वचा शरीराच्या इतर भागासारखी असते. पण त्यात लवचिक तंतू असतात. नखे कशाशी संलग्न आहेत हे तंतू नखाला चिकटलेले असतात आणि ते एका जागी घट्ट धरून ठेवतात. नखे सहसा जाड असतात. पण त्यांची मुळे त्वचेखाली अतिशय पातळ असतात. मुळाजवळील भागाचा रंग पांढरा असून त्याचा आकार अर्धचंद्र किंवा अर्धवर्तुळासारखा असतो. या भागाला लॅनून म्हणतात. बोटांची नखे दरवर्षी सुमारे दोन इंच वाढतात. नखे सजवण्याकडे महिलांचा कल नखे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत. ते आपल्याला गोष्टी निवडण्यात आणि कलात्मक काम करण्यात मदत करतात. ते आपल्या बोटांच्या टोकांचे रक्षण करतात. महिलांच्या नखांचाही त्यांच्या सौंदर्याशी संबंध असतो. त्यावर विविध रंगांचे पॉलिश लावून ते सजवतात. सौंदर्याच्या दृष्टिकोनातून नखं लांबवण्याचा ट्रेंडही वाढला आहे. नखांची रचना नाजूक आहे. काही पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे नखांमध्ये दोष निर्माण होतात. या दोषांमुळे नखे फुटतात किंवा तुटतात.

  Cooking Oils: निरोगी आरोग्यासाठी ही आहेत बेस्ट कुकींग ऑईल; हृदय दीर्घकाळ राहील हेल्दी

  भविष्यात नखे जाणार का? उक्रांतीमध्ये मानवाला कमी उपयोग असणाऱ्या गोष्टी कमी होत गेल्या. जसं की माणूस उभा राहायला लागल्यानंतर शेपटीचा उपयोग संपला. परिणामी शेपूट गळून गेले. त्याप्रमाणे पूर्वी मानवाच्या शरीरावर भरपूर आणि दाट केस होते. आता केसांचं प्रमाण विरळ होत चाललं आहे. त्याच नियमाने पूर्वी नखांचा वापर शिकार फाडण्यासाठी किंवा इतर गोष्टीं केला जात होता. आता त्यांचा वापर पूर्वीप्रमाणे होत नाही. त्यामुळे नखही भविष्यात कमी होतील, असा अंदाज जीवशास्त्रज्ञांनी मांडला आहे.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Woman hair

  पुढील बातम्या