मराठी बातम्या /बातम्या /explainer /

देशातील सर्वात उष्ण शहराविषयी वाचून फुटेल घाम! मार्चमध्ये ही स्थिती तर पुढे काय होईल?

देशातील सर्वात उष्ण शहराविषयी वाचून फुटेल घाम! मार्चमध्ये ही स्थिती तर पुढे काय होईल?

देशाच्या पश्चिमेकडील भागातील तापमान नुकतेच 40 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचू लागले आहे. राजस्थानमधील फलोदीमध्येही (Phalodi in Rajasthan) सध्या तापमान 40 ते 41 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. हा भाग देशातील सर्वात उष्ण शहर मानला जातो. जेथे उन्हाळ्यात तापमान 51 अंश सेल्सिअसपर्यंत जाते. हे चुरूपेक्षा जास्त आहे, जेथे तापमान (temperature) 50.2 अंशांपर्यंत राहिले आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

फलोदी, 21 मार्च : राजस्थानच्या फलोदी शहरात सकाळपासून तापमान वाढण्यास सुरुवात होते आणि दुपारनंतर ते 40 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक होते. आजकाल राजस्थानातील अनेक शहरे उष्णतेने गरम व्हायला लागली आहेत. या शहरांपैकी फलोदी हे सर्वात उष्ण शहर आहे. असे म्हटले जाते की हे शहर मे-जूनमध्ये देशातील सर्वात उष्ण क्षेत्र बनते. फलोदीमध्ये (Phalodi)उन्हाळ्यात पारा 51 वर जातो.

जोधपूर जिल्ह्यातील हे छोटे शहर 2016 साली अचानक प्रसिद्धीच्या झोतात आले, जेव्हा येथील तापमान 51 अंश सेल्सिअसपर्यंत मोजले गेले. इतके उष्ण असण्यामागचे कारण म्हणजे हे शहर थारच्या वाळवंटाला लागून आहे.

हे तेच थारचे वाळवंट आहे, ज्याचा 80 टक्क्यांहून अधिक भाग भारतात तर उर्वरित पाकिस्तानात आहे. उन्हाळ्यात अत्यंत उष्ण आणि हिवाळ्यात अतिशय थंड असलेले फलोदी शहर बिकानेर, जैसलमेर आणि नागौर या प्रमुख शहरांनी वेढलेले आहे.

फलोदी हे प्राचीन शहर

असे मानले जाते की हे शहर खूप प्राचीन आहे. 1230 मध्ये येथे प्रसिद्ध कल्याण रावजी मंदिर बांधले गेले. तसे, शहराचे बांधकाम 14 व्या शतकाच्या अखेरीपासूनचे मानले जाते, जेव्हा राजा हमीर सिंह यांनी येथे इमारती, दुकाने आणि पायऱ्यांचे बांधकाम यासारखी बरीच विकास कामे केली. येथे 1847 साली बांधलेले जैन तीर्थक्षेत्र पारसनाथ मंदिर आहे, तेथे त्या काळात बेल्जियन काचही वापरण्यात आली होती.

औद्योगिक शहर

2011 च्या जनगणनेनुसार, येथील लोकसंख्या सुमारे 49,766 आहे, जे येथील उद्योगांमध्ये काम करतात. जुन्या काळात भरपूर समृद्धी पाहणारे हे शहर आजही औद्योगिक समृद्धीसाठी ओळखले जाते.

मीठाचा सर्वात मोठा पुरवठादार

फलोदी हा संपूर्ण देशात मीठाचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसचेही बरेच काम येथे केले जाते. याच्या वर आणखी एक गोष्ट आहे, जी या उष्ण क्षेत्राला नाव देते. दरवर्षी स्थलांतरित सारस पक्षी येथील खिचन गावात येतात.

पश्चिम भारतात का आलीय उष्णतेची लाट? महाराष्ट्रातही उन्हाच्या झळा!

स्थलांतरित पक्षीही येतात

1970 मध्ये येथे सारस पक्षाचें येणे सुरू झाले. असे मानले जाते की तेव्हा एक स्थानिक कुटुंब सारसच्या कळपाचे पालनपोषण करत असे. तेव्हापासून दरवर्षी सारस येऊ लागले. स्थानिक लोकही पक्षी आहारात सहभागी झाले आणि दरवर्षी स्थलांतरित पक्ष्यांची संख्या वाढत गेली.

दरवर्षी हजारो सारस येतात

आता दरवर्षी ऑगस्ट ते पुढच्या मार्चपर्यंत येथे सुमारे 20,000 सारस पक्षी येतात. Demoiselle cranes म्हणून ओळखले जाणारे हे पक्षी चीन आणि मंगोलियाचा भाग असलेल्या सायबेरियातूनही येतात, असे मानले जाते. स्थानिक बोलीभाषेत त्यांना कुरजां म्हणतात. पक्ष्यांना खायला देण्यासाठी इथल्या लोकांनी चुग्गा हाऊस बांधला आहे, जिथे सारस दररोज सुमारे दीड तास अन्न खातात. त्यांनाच पाहण्यासाठी दूरदूरवरून लोक येतात. परदेशी पर्यटकही येतात.

चुरू देखील उष्ण

तसे, राजस्थानचे चुरू देखील कमी गरम नाही. 2019 मधील जगातील 15 सर्वात उष्ण प्रदेशांच्या यादीत याला स्थान मिळाले आहे. तेव्हा येथील तापमान 50.3 अंश सेल्सिअस होते. दिवसाचे नऊ वाजले तरी येथील तापमान 45च्या वर जाते. या यादीत आपला शेजारी देश पाकिस्तानचेही नाव आहे. येथील जेकबाबाद शहर हे जगातील उष्ण क्षेत्रांमध्ये अव्वल स्थानावर आहे.

वाळवंटात वाढते तापमान

जर आपण सर्वात उष्ण क्षेत्रांबद्दल बोललो, तर जगभरातील वाळवंटांचे तापमान ऐकून घाम फुटू शकतो. उदाहरणार्थ, कॅलिफोर्नियाच्या डेथ व्हॅलीचे तापमानही 56.7 वर पोहोचले आहे. ही गोष्ट 1913 सालची आहे. अशा तापमानात मानव किंवा प्राणी जगणे अशक्य आहे. यानंतर लिबियाच्या अझीझियाचा क्रमांक लागतो. येथे 1922 मध्ये तापमान 58 अंशांवर पोहोचले होते. पण सामान्य दिवशी येथील तापमान डेथ व्हॅलीपेक्षा कमी असते.

आजार पसरवणारे डास जगातून नाहीसे झाले तर? शास्त्रज्ञ म्हणतात अशाने अनर्थ होईल

उन्हाळ्यात फलोदीत जीवन कसे चालते?

अहवालानुसार, फलोदीमध्ये जेव्हा तापमान वाढते तेव्हा रस्त्यांवरील वाहतूक कमी होते. परंतु शहराच्या वेगावर फारसा परिणाम होत नाही. या उन्हाळ्यात दुकाने उघडी राहतात. असे असले तरी वाळवंट जवळ असल्याने येथील लोकांना उष्णतेचीही सवय आहे.

First published:

Tags: Summer season