Home /News /explainer /

National anthem | ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताचा अपमान केला असं का म्हटलं जातंय? काय आहेत नियम?

National anthem | ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताचा अपमान केला असं का म्हटलं जातंय? काय आहेत नियम?

National Song, Jan Man Gan : बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamta banerjee) यांनी मुंबईत एका कार्यक्रमात बसून राष्ट्रगीताच्या 4 ओळी वाचल्या. यानंतर त्यांनी असे करून राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा वाद सुरू झाला आहे. राष्ट्रगीताबद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती असल्याच पाहिजे?

पुढे वाचा ...
  मुंबई, 2 डिसेंबर: मुंबईतील एका कार्यक्रमात बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamta banerjee) यांनी बसून राष्ट्रगीताच्या चार ओळींचं पठण करत जय हिंदचा नारा दिला. यामुळे राष्ट्रगीताचा अपमान झाल्याचा युक्तीवाद केला जात आहे. वास्तविक राष्ट्रगीत म्हणण्याचे काही नियम आहेत, ज्याद्वारे राष्ट्र आणि राष्ट्रगीताबद्दल आदर व्यक्त केला जातो. सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रगीत बसून किंवा अर्धवट म्हणणे चुकीचे आहे. राष्ट्रगीत गाण्याच्या दोन आवृत्त्या आहेत. पूर्ण आवृत्ती आणि संक्षिप्त आवृत्ती. राष्ट्रगीत काय आहे? त्याचे नियम काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. राष्ट्रगीत काय आहे? रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेले 'जन गण मन' हे आपलं राष्ट्रगीत आहे. हे मूळ बंगाली भाषेत लिहिलेले होते. 'जन गण मन' मध्ये पाच श्लोक आहेत. या श्लोकांमध्ये भारतीय संस्कृती, स्वातंत्र्यलढ्यासह सभ्यतेचे वर्णन करण्यात आलं आहे. राष्ट्रगीताच अनुवाद इंग्रजी आणि हिंदीत कोणी केला? 28 फेब्रुवारी 1919 रोजी रवींद्रनाथ टागोर यांनी 'जन गण मन' या राष्ट्रगीताचे इंग्रजीत भाषांतर केलं. त्याचे शीर्षक मॉर्निंग सॉन्ग ऑफ इंडिया असं ठेवण्यात आलं होतं. तर याचं हिंदी-उर्दू रूपांतरण तत्कालीन इंडियन नॅशनल आर्मीचे कॅप्टन आबिद अली यांनी केलं होतं. पहिल्यांदा कधी गायलं? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आयोजित केलेल्या कोलकाता अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी 27 डिसेंबर 1911 रोजी रवींद्रनाथ टागोर यांनी हिंदी आणि बंगाली या दोन्ही भाषांमध्ये प्रथम गायले होते. 'जन गण मन' या राष्ट्रगीताच्या पहिल्या श्लोकाला 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने अधिकृतपणे मान्यता दिली. राष्ट्रगीताचे नियम काय आहेत? जेव्हा राष्ट्रगीत गायले जाते किंवा वाजवले जाते तेव्हा जे गाताना आणि ऐकताना उभे राहायला हवे. श्रोत्यांनी त्यावेळी सावधान मुद्रेत असावे. Mamata Banerjee: मुंबई दौऱ्यावर असलेल्या ममता बॅनर्जींचा थेट राहुल गांधींवर हल्ला, म्हणाल्या... किती वेळात गायला हवे? भारतीय संविधानानुसार राष्ट्रगीत हे 52 सेकंदाच्या आतमध्ये गायला हवे. संक्षिप्त आवृत्ती 20 सेकंदांच्या आत गायली पाहिजे. संक्षिप्त आवृत्तीमध्ये राष्ट्रगीताच्या पहिल्या आणि शेवटच्या ओळी गायल्या जातात. राष्ट्रगीत जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता! पंजाब सिन्ध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंग विन्ध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे, गाहे तव जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता! जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे।। राष्ट्रगीताची ही छोटी आवृत्ती आहे राष्ट्रगीताच्या पहिल्या आणि शेवटच्या ओळींसह एक लहान आवृत्ती देखील काही प्रसंगी वाजवली जाते. जन-गण-मन अधिनायक जय हे भारत-भाग्‍य-विधाता। जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे। Aaditya Thackeray आणि Mamata Banerjee यांची भेट गुप्त का ठेवली? काही कटकारस्थान आहे का? भाजपचे सवाल राष्ट्रगीत वाजवण्याचे काय नियम आहेत
  • राष्ट्रगीताची संपूर्ण आवृत्ती खालील प्रसंगी वाजवली जाईल:
  • नागरी आणि लष्करी स्थापना;
  • जेव्हा राष्ट्र अभिवादन करते (राष्ट्रीय सलामी विशेष प्रसंगी संबंधित राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये राष्ट्रपती किंवा राज्यपाल/लेफ्टनंट गव्हर्नर यांना सादर केली जाते).
  • परेड दरम्यान - वर उल्लेख केलेले प्रतिष्ठित पाहुणे उपस्थित असतील किंवा नाही.
  • औपचारिक राज्य समारंभ व शासनातर्फे आयोजित इतर समारंभात राष्ट्रपतींच्या आगमनात, सामूहिक कार्यक्रमांत किंवा या कार्यक्रमांतून परत जाण्याच्या निमित्ताने राष्ट्रगीत वाजवले जाते.
  • ऑल इंडिया रेडिओवर राष्ट्रपतींचे राष्ट्राला उद्देशून भाषण करण्यापूर्वी लगेच आणि नंतर.
  • राज्यपाल/लेफ्टनंट गव्हर्नर यांचे त्यांच्या राज्य/केंद्रशासित प्रदेशातील औपचारिक राज्यकार्यांसाठी आगमन झाल्यावर आणि या कार्यक्रमांतून परतताना. परेडमध्ये जेव्हा राष्ट्रध्वज आणला जातो.
  • जेव्हा रेजिमेंटचे रंग सादर केले जातात.
  • जेव्हा बँडद्वारे राष्ट्रगीत वाजवले जाते, तेव्हा राष्ट्रगीत सुरू होणार आहे हे ऐकणाऱ्यांना कळण्यासाठी राष्ट्रगीतापूर्वी ढोल वाजवले जातात.
  सार्वजनिक ठिकाणी कसे गायले जाते? सामूहिक गीतासोबत राष्ट्रगीत म्हणायला हरकत नाही, पण मातृभूमीला वंदन करताना ते आदराने गायले पाहिजे. त्याची योग्य प्रतिष्ठा राखली पाहिजे. शाळांमध्ये दिवसाचे कार्यक्रम एकत्रितपणे राष्ट्रगीत गाऊन सुरू करता येतील.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: India, Mamata banerjee, Mumbai

  पुढील बातम्या