मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Air Pollution | वायू प्रदूषण समजून घ्यायचे असेल तर AQI आणि PM लेवल काय आहे ते जाणून घ्या

Air Pollution | वायू प्रदूषण समजून घ्यायचे असेल तर AQI आणि PM लेवल काय आहे ते जाणून घ्या

सध्या दिल्ली आणि एनसीआरच्या हवेत विषारी (Air Pollution) घटक विरघळू लागले आहेत. हवेची गुणवत्ता ढासळू लागली आहे. आजकाल हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी AQI लेबल वापरले जाते. काय आहे हे AQI?

सध्या दिल्ली आणि एनसीआरच्या हवेत विषारी (Air Pollution) घटक विरघळू लागले आहेत. हवेची गुणवत्ता ढासळू लागली आहे. आजकाल हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी AQI लेबल वापरले जाते. काय आहे हे AQI?

सध्या दिल्ली आणि एनसीआरच्या हवेत विषारी (Air Pollution) घटक विरघळू लागले आहेत. हवेची गुणवत्ता ढासळू लागली आहे. आजकाल हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी AQI लेबल वापरले जाते. काय आहे हे AQI?

  • Published by:  Rahul Punde

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : सध्या राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात हवा प्रदूषणाने (Air Pollution) गंभीर रुप धारण केलं आहे. म्हणजेच हवेतील शुद्धतेची पातळी खालावत चालली आहे. एनसीआर आणि दिल्लीतील हवा अधिक विषारी होऊ शकते, असे मानले जात आहे. यामुळे सर्व प्रकारचे आजार होऊ शकतात. हवेच्या गुणवत्तेची पातळी मोजण्यासाठी एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) वापरला जातो. तसेच, PM10 आणि PM2.5 साठी हवेतील विषारी घटक विरघळण्याचा काय अर्थ होतो? हे जाणून घ्या. यामुळे वायू प्रदूषणाची स्थिती समजण्यास मदत होईल

AQI म्हणजेच हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेची पातळी 300 च्या पुढे गेली आहे. मात्र, ती आणखी वर जाण्याची भीती आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या आसपास ही पातळी 900 वर पोहोचली होती, जी अत्यंत धोकादायक मानली जाते. दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात AQI मोजणारी यंत्रे बसवली आहेत.

AQI म्हणजे काय, ते कसे कार्य करते?

AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स किंवा मराठीमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक. हा एक नंबर आहे, ज्यावरून हवेची गुणवत्ता तपासली जाते. यावरून भविष्यातील वायू प्रदूषणाचीही कल्पना येते.

Air Pollution In India : हवा प्रदूषणाचा भारतीयांच्या आयुर्मानावर गंभीर परिणाम

AQI ची सुरुवात कशी झाली?

AQI आता जगातील प्रत्येक देशात मोजले जात आहे. मात्र, प्रत्येक ठिकाणी पद्धत सर्वत्र भिन्न आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने भारतात AQI लाँच केले.

AQI ची किती श्रेणींमध्ये विभागणी केली जाते?

देशातील AQI पातळी आणि वाचनानुसार 06 श्रेणींमध्ये विभागले गेले आहे.

AQI 0-50 च्या दरम्यान म्हणजे हवा स्वच्छ आहे

51-100 च्या दरम्यान म्हणजे हवेची शुद्धता समाधानकारक आहे

101-200 'मध्यम' दरम्यान

201-300 दरम्यान वाईट

301-400 दरम्यान जास्त वाईट

401 ते 500 दरम्यान गंभीर श्रेणी

Air pollution वर जपानी उपाय आजमावणार भारत? प्रदूषणापासून मिळू शकते मुक्ती

देशात प्रदूषणाचे किती घटक ठरवले गेले?

AQI ला 8 प्रदूषण घटकांच्या आधारे निश्चित केलं आहे. यात PM10, PM 2.5, NO2, SO2, CO2, O3 आणि NH3 Pb आहेत. 24 तासांत या घटकांचे प्रमाण हवेची गुणवत्ता ठरवते

NO2, SO2, CO2, O3 आणि NH3 काय आहेत?

SO2 म्हणजे सल्फर ऑक्साईड, तो कोळसा आणि तेल जाळल्याने उत्सर्जित होतो, जे आपल्या शहरांमध्ये मुबलक प्रमाणात आहे.

CO2 म्हणजेच कार्बन ऑक्साईड रंगीत असतो, त्याला गंध असून तो विषारी असतो. कोळसा किंवा लाकूड यांसारख्या इंधनाच्या अपूर्ण जळण्याने हा वायू तयार होतो. वाहनांचे उत्सर्जन हे कार्बन ऑक्साईडचे प्रमुख स्त्रोत आहे

NO2 म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड, जो उच्च तापमानातील ज्वलनातून तयार होतो. हे खालच्या हवेत धुकं किंवा वर एक तपकिरी रंगाच्या रुपात असते.

NH3 हा कृषी प्रक्रियेतून उत्सर्जित होणारा अमोनिया आहे. तसेच त्याचा वायू कचरा, सांडपाणी आणि औद्योगिक प्रक्रियेतील दुर्गंधीतून उत्सर्जित होतो.

O3 म्हणजे ओझोन उत्सर्जन

पीएम 2.5 म्हणजे काय?

PM 2.5 हा हवेत विरघळलेला एक छोटासा पदार्थ आहे. या कणांचा व्यास 2.5 मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी आहे. जेव्हा पीएम 2.5 ची पातळी जास्त असते तेव्हाच धुकं वाढते. दृश्यमानतेची पातळीही घसरते

PM 10 म्हणजे काय?

PM 10 ला पार्टिक्युलेट मॅटर (Particulate Matter) म्हणतात. या कणांचा आकार 10 मायक्रोमीटर किंवा त्यापेक्षा कमी व्यासाचा आहे. त्यात धूळ, घाण आणि धातूचे सूक्ष्म कण समाविष्ट आहेत. धूळ, बांधकाम आणि कचरा जाळण्यामुळे PM 10 आणि 2.5 अधिक वाढते.

Air Pollution : हवा प्रदूषणामुळे घशात जळजळ, डोकेदुखीच्या समस्या वाढल्या; हे उपाय ठरतील गुणकारी

PM-10 आणि 2.5 किती असावे?

PM 10 ची सामान्य पातळी 100 मायक्रोग्राम घनमीटर (MGCM) असावी.

PM 2.5 ची सामान्य पातळी 60 mgcm आहे. यापेक्षा जास्त असल्यास ते हानिकारक ठरते.

वायू प्रदूषणाचा थेट शरीरावर काय परिणाम होतो?

डोळे, घसा आणि फुफ्फुसाचा त्रास वाढू लागतो. श्वास घेताना हे कण थांबवण्याची कोणतीही यंत्रणा आपल्या शरीरात नाही. अशा परिस्थितीत पीएम 2.5 आपल्या फुफ्फुसात खोलवर पोहोचते. PM 2.5 मुळे मुले आणि वृद्धांना सर्वात जास्त त्रास होतो. त्यामुळे डोळे, घसा आणि फुफ्फुसाचा त्रास वाढतो. तसेच खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होतो. सततच्या संपर्कात राहिल्याने फुफ्फुसाचा कर्करोगही होऊ शकतो.

सर्वसाधारणपणे रोजच्या कोणत्या गोष्टींमुळे प्रदूषण होते?

पॉवर प्लांटची चिमणी, बांधकाम आणि म्युनिसिपल कचरा भट्टी यासारखे स्रोत

मोटार, कार, विमान असे स्त्रोत

समुद्रातील जहाजे, समुद्रपर्यटन जहाजे आणि बंदरांमधून

जळत्या लाकडापासून, आगीची ठिकाणे, चूल, भट्टी.

सामान्य तेल शुद्धीकरण आणि औद्योगिक कारखाने

मोटे तौर पर रोजाना की किन चीजों से प्रदूषण होता है?

शेती आणि वनीकरणात रसायनांच्या वापरामुळे धूळ उडते

पेंट्स, हेअर स्प्रे, वार्निश, एरोसोल स्प्रे इ.

लँडफिलमध्ये साठवलेल्या कचऱ्यापासून मिथेन तयार होते

अण्वस्त्रे, विषारी वायू, रॉकेट सोडल्याने

नैसर्गिक स्रोतातूनही प्रदूषण होते का?

यामध्ये ओसाड जमिनीतून उडणारी धूळ, मिथेन वायू प्राण्यांच्या अन्नपचनात उत्सर्जित होतो. त्यामुळेच अनेकदा असे म्हटले जाते की दुभत्या जनावरांमधून हरितगृह वायू उत्सर्जित होतात.

पृथ्वीच्या कवचाच्या नाशामुळे होणाऱ्या किरणोत्सर्गी क्षयमुळे तयार होणाऱ्या रेडॉन वायूंपासून

जंगलातील आगीमुळे निर्माण होणारा वायू आणि त्यातून निघणारे कार्बन वायू

ज्वालामुखी पासून

First published:

Tags: Air pollution, Delhi, Pollution