मराठी बातम्या /बातम्या /explainer /

जगातील सर्वात उंच विष्णूची मूर्ती आहे मुस्लीम देशात! तब्बल 28 वर्षे सुरू होतं काम

जगातील सर्वात उंच विष्णूची मूर्ती आहे मुस्लीम देशात! तब्बल 28 वर्षे सुरू होतं काम

KBC मध्ये स्पर्धकाला एक प्रश्न विचारण्यात आला होता की, जगातील कोणत्या देशात गरुडावर बसलेली भगवान विष्णूची 75 मीटर उंच मूर्ती आहे. गमतीची गोष्ट म्हणजे हा देश मुस्लिम देश आहे पण त्याने आपली हिंदू मुळे कधीच सोडली नाहीत.

KBC मध्ये स्पर्धकाला एक प्रश्न विचारण्यात आला होता की, जगातील कोणत्या देशात गरुडावर बसलेली भगवान विष्णूची 75 मीटर उंच मूर्ती आहे. गमतीची गोष्ट म्हणजे हा देश मुस्लिम देश आहे पण त्याने आपली हिंदू मुळे कधीच सोडली नाहीत.

KBC मध्ये स्पर्धकाला एक प्रश्न विचारण्यात आला होता की, जगातील कोणत्या देशात गरुडावर बसलेली भगवान विष्णूची 75 मीटर उंच मूर्ती आहे. गमतीची गोष्ट म्हणजे हा देश मुस्लिम देश आहे पण त्याने आपली हिंदू मुळे कधीच सोडली नाहीत.

  • Published by:  Rahul Punde
मुंबई. 15 ऑगस्ट : कौन बनेगा करोडपतीमध्ये अमिताभ बच्चन यांनी हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकाला 25 लाख रुपयांचा प्रश्न विचारला होता. प्रश्न असा होता की गरुडावर स्वार झालेली विष्णूची 75 मीटर उंचीची मूर्ती कोणत्या देशात आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या देशात ही मूर्ती बसवली आहे तो मुस्लीम देश आहे. या देशात एक नाही तर अनेक हिंदू प्रतिकं ठिकठिकाणी पाहायला मिळतील. उलट हा देश आपल्या हिंदू परंपरांच्या मुळाशी घट्ट जोडलेला आहे. हिंदू धर्मात भगवान विष्णू हे समृद्धीचे आणि वैभवाचे प्रतीक आहे. शंकर आणि ब्रह्मदेवाच्या त्रयीमध्ये भगवान विष्णू हे पृथ्वीचे पालनकर्ता मानले जातात. संपूर्ण भारतामध्ये क्वचितच असा कोणताही कोपरा असेल जिथे भगवान विष्णूची वेगवेगळ्या नावांनी पूजा केली जात नाही. या देशात विष्णूची सर्वात उंच मूर्ती आहे भगवान विष्णूची जगातील सर्वात उंच मूर्ती भारतात नाही तर मुस्लिम लोकसंख्येच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर असलेल्या देशात आहे. इंडोनेशिया देशात असलेली ही मूर्ती 122 फूट उंच आणि 64 फूट रुंद आहे. इंडोनेशियाच्या बाली शहरात हे स्मारक आहे. ही मूर्ती तांबे आणि पितळाची असून मूर्ती तयार करण्यासाठी सुमारे 28 वर्षे लागली. ही मूर्ती 2018 मध्ये पूर्ण झाली आणि जगभरातून लोक ती पाहण्यासाठी आणि भेट देण्यासाठी येतात. कशी झाली सुरुवात? 1979 मध्ये, इंडोनेशियास्थित शिल्पकार बाप्पा नुमान नुआरता यांनी हिंदू प्रतिकाची एक विशाल मूर्ती बनवण्याचे स्वप्न पाहिले. स्वप्न पाहणं सोपं होतं पण जगप्रसिद्ध असा पुतळा बनवणं खरंच अवघड काम होतं. ही मूर्ती बनवण्यासाठी 1980 च्या दशकात कंपनी स्थापन करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यांच्या देखरेखीखाली सर्व कामे होतील असे ठरले. या मूर्तीच्या रचनेवर प्रचंड मेहनत घेण्यात आली.

वाचा - 1788 खोल्यांच्या महालात राहणारा शासक, अमेरिकेचं व्हाईट हाऊसही पडेल फिकं, डोळे दिपवणारे PHOTO

अशी मूर्ती बनवायची होती जी अजून बनलेली नाही न्युमन नुआर्ताला आजवर जगात न घडलेली कलाकृती निर्माण करायची होती. जो पाहणार फक्त पाहत राहील. त्यामुळेच प्रदीर्घ नियोजन आणि पैशाची व्यवस्था केल्यानंतर 15 वर्षांनंतर 1994 साली ही मूर्ती बनवण्याची सुरुवात झाली. या पुतळ्याच्या उभारणीसाठी इंडोनेशियातील अनेक सरकारांनी मदत केली. अनेक वेळा मोठे बजेट असल्याने काम थांबले. त्याचे बांधकाम 2007 ते 2013 अशी सुमारे 6 वर्षे रखडले होते. पण त्यानंतर ते काम सुरू होऊन आणखी पाच वर्षे लोटली. मध्यंतरी एकदा या मूर्तीजवळ राहणाऱ्या स्थानिक लोकांनीही आवाज उठवला. पण नंतर जेव्हा त्यांना समजावून सांगण्यात आले की हा पुतळा देखील इंडोनेशियातील सर्वात मोठे पर्यटन स्थळ ठरू शकतो, तेव्हा लोकांनी ते मान्य केले. हिंदू धर्माशी संबंधित सर्वात उंच पुतळा गरुडावर स्वार असलेली ही विष्णूची मूर्ती जगातील हिंदू देवतांच्या मूर्तींमध्ये सर्वात उंच असल्याचे म्हटले जाते. यानंतर मलेशियामध्ये बनवलेल्या भगवान मुरुगनची उंची मानली जाते. मुरुगन हे देखील भगवान विष्णूचेच एक रूप आहे. दक्षिण भारतात विशेषतः तामिळनाडूमध्ये मुरुगनच्या नावाने भगवान विष्णूची पूजा केली जाते. इंडोनेशियामध्ये ही भव्य मूर्ती तयार करणारे शिल्पकार बाप्पा नुमान नुआर्ताचा भारतात सन्मान करण्यात आला. या मंदिराची ख्याती जगभर पसरलेली आहे. जगभरातून हिंदू भाविक येथे येत असतात.
First published:

Tags: Hindu

पुढील बातम्या