मराठी बातम्या /बातम्या /explainer /दोन डोसची नाही गरज, एकच आहे पुरेसा; तिसरी कोरोना लस आहे अधिक स्ट्राँग

दोन डोसची नाही गरज, एकच आहे पुरेसा; तिसरी कोरोना लस आहे अधिक स्ट्राँग

दोन दिवसांपूर्वीच या तिसऱ्या कोरोना लशीला (corona vaccine) मंजुरी देण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वीच या तिसऱ्या कोरोना लशीला (corona vaccine) मंजुरी देण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वीच या तिसऱ्या कोरोना लशीला (corona vaccine) मंजुरी देण्यात आली आहे.

वॉशिंग्टन, 02 मार्च :  आतापर्यंत ज्या कोरोना लशींना (corona vaccine) मंजुरी देण्यात आली आहे, ज्या कोरोना लशी (covid 19 vaccine) वापरल्या जात आहेत त्या लशींचे दोन डोस घ्यावेच लागतील. तरच त्या लशींचा प्रभाव अधिक दिसून येतो. पण आता अशा कोरोना लशीला मंजुरी मिळाली आहे, जिचा फक्त एक डोसच पुरेसा आहे. एका डोसमध्येच कोरोनाविरोधात प्रतिकारक शक्ती निर्माण करण्याची क्षमता या लशीत आहेत. या लशीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी मिळालेली आहे.

जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson & Johnson's) कंपनीने विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक लशीच्या (Vaccine) आपत्कालीन वापराला मंजुरी मिळाली आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या लशीचं नाव JNJ-78436735 किंवा Ad26.COV2.S. असं आहे. या कंपनीच्या बेल्जियममध्ये असलेल्या जानसेन फार्मास्युटिका या विभागाने ही लस विकसित केली आहे. बोस्टनमधल्या हार्वर्ड मेडिकल स्कूलचं टीचिंग हॉस्पिटल असलेल्या बेथ इस्रायल डीकोनेस मेडिकल सेंटरच्या सहकार्याने ही लस तयार करण्यात आली आहे.

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (US-FDA) शनिवारी (27 फेब्रुवारी 2021) मंजुरी दिली.  त्यामुळे अमेरिकी नागरिकांसाठी तिसऱ्या प्रभावी लशीचा पर्याय उपलब्ध झाला असून पुढच्या आठवड्यापासून ही लस अमेरिकेत उपलब्ध होईल. 'न्यूयॉर्क टाइम्स'च्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. जून अखेरपर्यंत लशीचे 10 कोटी डोस पुरवले जातील, असं जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने म्हटलं आहे.

हे वाचा - Covaxin की Covishield; तुम्हाला घेता येईल का तुमच्या पसंतीची कोरोना लस?

फायझर-बायोएनटेक, मॉडर्ना, ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका, भारतात विकसित झालेल्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या सगळ्या लशींचे दोन डोस घ्यावे लागणार आहेत. जॉन्सन अँड जॉन्सनच्या लशीचा मात्र एक डोस पुरेसा ठरणार आहे. त्यामुळे त्या कंपन्यांचे 60 कोटी डोस आणि या कंपनीचे 10 कोटी डोस यांचा विचार करता जुलैअखेरीपर्यंत लस हवी असलेल्या प्रत्येक प्रौढ अमेरिकी नागरिकाला पुरून उरतील एवढे डोस उपलब्ध होतील.

फायझर-बायोएनटेक आणि मॉडर्ना या कंपन्यांच्या लशी 95 टक्के प्रभावी असल्याचं क्लिनिकल ट्रायल्समध्ये आढळलं होतं. जॉन्सन अँड जॉन्सनची लस 72 टक्के प्रभावी असल्याचं या ट्रायल्समध्ये आढळलं आहे; मात्र या मुद्द्यावरून अमेरिकी नागरिकांनी उगाचच काळजी करू नये, असं अमेरिकेतील तज्ज्ञ डॉ. अँथनी फॉसी यांनी सांगितलं आहे. '95 आणि 72 या आकड्यांच्या खेळात नागरिकांनी घुसू नये. खरंच ही चांगली लस आहे. आपल्याला गरज असताना तिसरी प्रभावी लस उपलब्ध झाली आहे, ही सकारात्मक वस्तुस्थिती लक्षात घ्यावी,' असं आवाहन डॉ. फासी यांनी मुलाखतीतून नागरिकांना केलं.

हे वाचा - Corona vaccine ची जादू; फक्त कोरोनाच नाही तर 'या' आजारांनाही देतेय टक्कर

SARS-CoV-2 या विषाणूमध्ये काही जनुकीय सूचनांद्वारे स्पाइक प्रोटीनची निर्मिती केली जाते. मानवी पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी त्या प्रोटीनचा वापर होतो. त्या जनुकीय सूचनांचा वापर करून जॉन्सन अँड जॉन्सनची लस विकसित करण्यात आली आहे. फायझर-बायोएनटेक आणि मॉडर्ना या कंपन्यांच्या लशीमध्ये या जनुकीय सूचना सिंगल स्ट्रँडेड आरएनएमध्ये साठवली जातात. जॉन्सन अँड जॉन्सनच्या लशीमध्ये या जनुकीय सूचना डबल स्ट्रँडेड डीएनएमध्ये (Double Stranded DNA) साठवण्यात आल्या आहेत.

तसंच जॉन्सन अँड जॉन्सनची लस अॅडेनोव्हायरसवर (Adenovirus) आधारित आहे. त्यामुळे ती फायझर-मॉडर्ना या एमआरएएनएवर आधारित असलेल्या लशींपेक्षा अधिक कणखर आहे. डीएनएची रचना आरएनएप्रमाणे नाजूक नसते. तसंच अॅडेनोव्हायरसचं मजबूत संरक्षक कवच आतल्या जनुकीय घटकांचं संरक्षण करतं. या सगळ्यामुळे जॉन्सन अँड जॉन्सनची लस रेफ्रिजरेटरमध्ये दोन ते आठ अंश सेल्सिअस तापमानाला तीन महिन्यांपर्यंत साठवता येऊ शकते.

हे वाचा - मोदींनी घेतली स्वदेशी लस; शरद पवारांनी कुठली लस घेतली पाहा

जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीने जानेवारी 2020 मध्ये लस विकसित करण्याच्या कामाला सुरुवात केली. अमेरिकी सरकारकडून त्यांना मार्च 2020 मध्ये 456 अमेरिकी डॉलर्सचं अर्थसहाय्य मिळालं. जुलैमध्ये पहिली तर सप्टेंबरमध्ये दुसरी चाचणी सुरू झाली. आता कंपनीने तिसरी चाचणी सुरू केली आहे.

First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus, Covid19