मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Explainer: Kashmir खोऱ्यात पुन्हा शीख आणि काश्मिरी पंडितांना निर्वासित होण्यासारखं वातावरण का झालंय?

Explainer: Kashmir खोऱ्यात पुन्हा शीख आणि काश्मिरी पंडितांना निर्वासित होण्यासारखं वातावरण का झालंय?

1990 च्या दशकात काश्मीर खोऱ्याने भयंकर अशांतता, दहशत अनुभवली. हिंदू, शीख आणि काश्मिरी पंडितांना तिथून निर्वासित होऊन अन्यत्र घर करावं लागलं. आता 2021 उजाडलं तरी पंडित त्यांच्या मूळ घरी परत जाऊ शकलेले नाहीत. काय घडलं काय बिघडलं?

1990 च्या दशकात काश्मीर खोऱ्याने भयंकर अशांतता, दहशत अनुभवली. हिंदू, शीख आणि काश्मिरी पंडितांना तिथून निर्वासित होऊन अन्यत्र घर करावं लागलं. आता 2021 उजाडलं तरी पंडित त्यांच्या मूळ घरी परत जाऊ शकलेले नाहीत. काय घडलं काय बिघडलं?

1990 च्या दशकात काश्मीर खोऱ्याने भयंकर अशांतता, दहशत अनुभवली. हिंदू, शीख आणि काश्मिरी पंडितांना तिथून निर्वासित होऊन अन्यत्र घर करावं लागलं. आता 2021 उजाडलं तरी पंडित त्यांच्या मूळ घरी परत जाऊ शकलेले नाहीत. काय घडलं काय बिघडलं?

आदित्य राज कौल

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर: 19 जानेवारी 1990 चा दिवस. तेव्हा मी फक्त 9 महिन्यांचा होतो. तेव्हा 24 तास चालणारी एकही उपग्रह वाहिनी नव्हती, की ट्विटरही नव्हतं. बातम्या पोहोचायला कित्येकदा अनेक दिवस लागत. त्या रात्री काश्मिरातल्या (Kashmir) मशिदींनी त्यांच्या लाउडस्पीकर्सवरून घोषणा केली, काश्मिरी पंडितांपैकी पुरुषांनी काश्मीर खोऱ्यातून निघून जावं आणि त्यांच्या बायकांना मागे ठेवावं. पाकिस्तानचा पाठिंबा असलेल्या मुस्लिमांनी त्या दिवशी काश्मिरातल्या रस्त्यांवर आझादीच्या घोषणा दिल्या. यंत्रणा कोलमडून पडली.

या सगळ्या गोंधळाच्या स्थितीत काश्मिरी पंडितांमधल्या (Kashmiri Pundits) काही प्रमुख व्यक्तिमत्त्वांना लक्ष्य करून त्यांची हत्या करण्यात आली. टिका लाल टपलू यांच्यासारख्या राजकीय नेत्यापासून न्यायाधीश नीलकंठ गांजू यांच्यापर्यंत, दूरदर्शनचे लास्सा कौल यांच्यापासून लेखक सर्वानंद कौल प्रेमी यांच्यापर्यंत अनेकांचा त्यात समावेश होता. ज्या काश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली, त्यापैकी बहुतांश जणांच्या हत्येची जबाबदारी जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटने (JKLF) स्वीकारली. काश्मीर खोऱ्यातून काश्मिरी पंडितांना मोठ्या प्रमाणावर बाहेर पडून (Kashmir Exodus) जावं लागलं, या घटनेमागचे प्रमुख सूत्रधार म्हणून यासिन मलिक आणि बिट्टा कराटे या दोन दहशतवाद्यांकडे पाहिलं गेलं. एवढंच नव्हे, तर जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटने हवाई दलाच्या चार निःशस्त्र कर्मचाऱ्यांना ठार मारलं आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या कन्येचं अपहरणही त्यांनी केलं. या दहशतवादी स्वरूपाच्या गुन्ह्यांसाठी जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या एकाही दहशतवाद्याला आतापर्यंत दोषी ठरवण्यात आलेलं नाही. उलट, अटलबिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहनसिंग या दोन पंतप्रधानांनी यासिन मलिक (Yasin Malik) या दहशतवाद्याला वेगवेगळ्या प्रसंगी पाहुणा म्हणून आमंत्रित केलं होतं.

90 पासून पाच लाखांवर हिंदूंनी काश्मीर सोडलं

1990 पासून चार लाखांहून अधिक काश्मिरी हिंदूंना (Kashmiri Hindus) जबरदस्तीने काश्मीरबाहेर पडावं लागलं. 20 जानेवारी 1990 या दिवशी सकाळी माझी आई आणि आजी-आजोबांनी मला कॅबमध्ये घेऊन जम्मू गाठलं. श्रीनगरमध्ये रायनवरी इथे असलेलं आमचं वडिलोपार्जित घर कायमचं सोडून आम्ही कधीही न परतण्यासाठी तिथून निघून आलो.

हे वाचा - मोठी बातमी: शाळेत घुसून दहशतवाद्यांचा गोळीबार, दोन शिक्षकांचा मृत्यू

आज तीन दशकांनंतर पुन्हा एकदा संपूर्ण काश्मीर खोऱ्यात (Kashmir Valley) भयाण शांतता आहे. काश्मिरात शरद ऋतू (Autumn) आला आहे. चिनार वृक्षांची पानं सुनसान रस्त्यांवर पडली आहेत. खासकरून श्रीनगरमध्ये अगदी भयावह शांतता आहे, जणू काही कसला दुखवटा आहे. बाजारपेठा नियत वेळेच्या आधीच बंद होतात. अज्ञात भीती नागरिकांच्या मनात आहे. लाल चौक आणि त्याच्या आजूबाजूची पॉश मार्केट्स काळोखाआधीच बंद होतात. अल्पसंख्याक समुदायातले फळविक्रेते आणि मिठाई दुकानदारांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लवकर घरी जाण्यास सांगण्यात येतं.

तीन दिवसांपेक्षा कमी कालावधीत काश्मीर खोऱ्यात पाच नागरिकांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं आहे. त्यातले बहुतांश अल्पसंख्याक समुदायातले होते. श्रीनगरमध्ये आश्रय घेतलेले इस्लामी दहशतवादी आपला संदेश पोहोचवण्यासाठी सॉफ्ट टार्गेट्सना लक्ष्य करत आहेत. भारतीय लोकशाहीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि काश्मिरात तिरंगा अभिमानाने फडकवणाऱ्या व्यक्तींना लक्ष्य केलं जात आहे.

ताजे बळी

68 वर्षांच्या माखनलाल बिंद्रूंनी दहशतवाद (Terrorism) पराकोटीला पोहोचला होता तेव्हाही काश्मीर खोरं सोडलं नव्हतं. श्रीनगर एसएसपी ऑफिसपासून जेमतेम 500 मीटर्स अंतरावर असलेल्या इक्बाल पार्कमधल्या त्यांच्या औषधांच्या दुकानात त्यांना ठार करण्यात आलं. त्यांना स्थानिक नागरिक खूप मानायचे. गरजू व्यक्तींना औषधं पुरवण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असे. आजारी काश्मिरी मुस्लिम नागरिकांना औषधं पुरवणाऱ्या या व्यक्तीचा दोष काय होता?

हे वाचा - दहशत...दोन तासात 3 नागरिकांची हत्या, नागरिक घाबरले

श्रीनगरमधल्या (Srinagar) लाल बाजारात पाणीपुरी विकणाऱ्या वीरेंद्र पासवान या बिहारी नागरिकालाही दहशतावाद्यांनी पाठीमागून गोळ्या घातल्या. नवरात्र उत्सवाचा तो पहिला दिवस होता. भागलपूरमधल्या आपल्या पत्नीशी तो सकाळी बोलला होता आणि लवकरच घरी येणार असल्याचं त्याने सांगितलं होतं. आपल्या पाच वर्षांच्या मुलीला भेटण्यासाठी तो उत्सुक होता. त्याच संध्याकाळी त्याला दहशतवाद्यांनी ठार केलं. तो त्याची हातगाडी नेत असताना त्याला पाठीमागून गोळ्या घालण्यात आल्या. त्याच्या हत्येची 18 सेकंदांची क्लिप आयसिसने दुसऱ्या दिवशी प्रसारित केली.

सुपिंदर कौर आणि दीपक चंद हे श्रीनगरमधल्या ईदगाह परिसरातल्या सरकारी शाळेचे अनुक्रमे मुख्याध्यापक आणि शिक्षक होते. गुरुवारी सकाळी (7 सप्टेंबर) अन्य शिक्षकांप्रमाणेच ते शाळेत आले. तेवढ्यात शाळेच्या आवारात दहशतवाद्यांनी प्रवेश केला. त्यांनी शिक्षकांना घेरलं आणि ओळखपत्र व मोबाइल दाखवण्यास सांगण्यात आलं. चौकशीनंतर सर्व मुस्लिम शिक्षकांना सोडून देण्यात आलं आणि दीपक चंद यांना बाजूला काढण्यात आलं. त्यांना मारण्यासाठी दहशतवादी रायफल लोड करत होते, तेव्हा सुपिंदर कौर यांनी त्यांना तसं करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला; मात्र दहशतवाद्यांनी दोघांनाही ठार केलं आणि पळून जाण्यात ते यशस्वी झाले.

सुपिंदर कौर अत्यंत मानवतावादी दृष्टिकोनाच्या होत्या. एका अनाथ काश्मिरी मुस्लिम मुलीच्या शिक्षणासाठी त्या प्रयत्न करत होत्या, तिचा सर्व खर्च त्या उचलत होत्या. त्या ज्या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या, त्या शाळेच्या मुस्लिम सुरक्षारक्षकाच्या वैद्यकीय खर्चासाठीही त्या मदत करत होत्या. त्यांचा असा कोणता गुन्हा होता, की ज्यामुळे त्यांच्याच शाळेत त्यांची निर्दयपणे हत्या करण्यात आली.

2021मध्येही काश्मिरातून अनेक जण निर्वासित होत आहेत हे पाहून माझं काळीज तुटतं. अलीकडच्या या निर्दय हत्यांनंतर अनंतनाग आणि श्रीनगरमधल्या अनेक हिंदू कुटुंबांनी आपलं बस्तान हलवलं आहे. काही जण त्यांचं सामान आवरण्याच्या बेतात आहेत. माझे डोळे अश्रूंनी भरले आहेत.

काश्मिरी पंडित समुदायातल्या असलेल्या आणि जम्मूत नियुक्त करण्यात आलेल्या जम्मू-काश्मीर पोलिस दलातल्या एका तरुण कर्मचाऱ्याने मला सांगितलं, की त्याला गायक व्हायचं होतं; मात्र निर्वासित म्हणून कठीण आयुष्य जगताना परिस्थितीमुळे पोलिस व्हावं लागलं. उत्तर काश्मिरातल्या बारामुल्लामध्ये त्यांचं वडिलोपार्जित घर असून, तिथे राहणारे त्याचे कुटुंबीय शुक्रवारी जम्मूला यायला निघाले आहेत.

काश्मिरी पंडित समुदायातल्या एका प्रसिद्ध उद्योजक कुटुंबाने गुरुवारी श्रीनगर सोडलं. गेल्या 32 वर्षांत त्यांनी ते सोडलं नव्हतं. त्यांच्या नातवाचा मला फोन आला होता. अशा परिस्थितीतही केवळ त्याच्या आजोबांनाच तिथून निघायचं नव्हतं. म्हणून त्यांना विनंती करू शकता का, हे विचारण्यासाठी मला त्याचा फोन आला होता. आता त्यांनीही काश्मीर सोडलं असेल.

ऑ़डिओ मेसेज आला आणि...

काश्मीरमधल्या बडगाम (Badgam) इथल्या शेखपोरा इथून एका वयोवृद्ध महिलेचा दोन मिनिटांचा ऑडिओ मेसेज मला आला. तिने दुसऱ्या दिवशीच्या पहाटेपूर्वी काश्मीर सोडण्यासाठी आपलं सामान भरल्याचं सांगितलं. तिच्या भागातल्या 15 कुटुंबांनी आधीच आपला बाडबिस्तरा गुंडाळल्याचं तिने सांगितलं. वेस्सू आणि गंदेर्बालमधले अनेक जणही सोडण्याच्या तयारीत आहेत. जम्मूतल्या तिच्या नातेवाईकाशी झालेल्या छोट्या संवादात की सांगतेय, की तिची सून ही तिची जबाबदारी आहे. ती (सून) सरकारी नोकरीत असल्यामुळे आपल्याला खोरं सोडावं लागतंय, असं ती म्हणत होती.

काश्मिरातून मी मिळवलेल्या जम्मू-काश्मीर सरकारच्या नोटिसांवरून असे संकेत मिळतात, की मध्य आणि दक्षिण काश्मिरात असलेल्या काश्मिरी पंडित समुदायातल्या अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. सरकार सुरक्षा पुरवत आहे, तरीही ते सॉफ्ट टार्गेट्स असल्याचं सांगण्यात आलं. सरकारच्या या नोटिसा व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्यामुळे त्यांचं आयुष्य अधिकच धोक्यात आहे.

Explainer: काँग्रेसमध्ये खिंडार, गेल्या 7 वर्षांत 177 नेत्यांचा पक्षाला रामराम

21 सप्टेंबर रोजी मला असं सांगण्यात आलं, की जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा फौजांना श्रीनगरमधल्या काश्मिरी हिंदूंवरच्या संभाव्य हल्ल्याची गुप्त खबर मिळाली. जुलै महिन्यातही याचप्रमाणे लाल चौकातल्या मिठाईवाल्यावर हल्ला होणार असल्याची शक्यता असल्याची खबर मिळाली होती. दल गेट एरियातल्या एका हिंदू केमिस्टवर हल्ल्याची धमकीही मिळाली होती.

जुलै महिन्यात मी श्रीनगर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांत काश्मिरी हिंदू कुटुंबांसोबत 26 दिवस होतो. अनेकांनी धोक्यांबद्दल सांगितलं, मंदिरांच्या जमिनी हडप केल्या जात असल्याबद्दल सांगितलं, तसंच हिंदूंना लक्ष्य करून हल्ले केले जात असल्याचंही सांगितलं. केवळ हिंदू समुदायच नव्हे, तर श्रीनगरमधले हिंदू पुजारीही रोज येणाऱ्या धमक्यांमुळे भयभीत झालेले आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी काही हिंदू व्यापारी आणि अन्य व्यक्तींच्या भेटी घेऊन सुरक्षिततेची ग्वाही दिली. हिंदू नागरिकांसाठी संपूर्ण काश्मीर खोऱ्यात सुरक्षेची व्यवस्था करणं महत्त्वाचं आहे. फुटीरतावाद्यांच्या सुरक्षेसाठी चार वर्षं पैसे वायफळ खर्च केले जाऊ शकतात, तर देशभक्त हिंदू आणि शिखांच्या सुरक्षेसाठी काही खर्च केले जात नाहीत?

32 वर्षांनंतरही अल्पसंख्याकांचं संरक्षण नाहीच

गेल्या तीन दशकांपासून काश्मीर खोऱ्यातच राहिलेल्या काश्मिरी पंडितांची संघटना असलेल्या काश्मिरी पंडित संघर्ष समितीने नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना पत्र पाठवलं आहे. त्या पत्रात असं लिहिलं आहे, की 'गेल्या 10 पेक्षा अधिक दिवसांपासून अशी खबर मिळते आहे, की स्थलांतर न केलेल्या काश्मिरी पंडित आणि हिंदू कुटुंबांतले व्यापारी आणि महत्त्वाच्या व्यक्ती यांना काश्मीर खोऱ्यातून नाहीसं केलं जाईल. असं असूनही संबंधित यंत्रणा निद्रिस्त आहेत. त्यामुळे आणखी एका नावाजलेल्या उद्योजकाची हत्या करणं त्यांना (दहशतवाद्यांना) शक्य झालं. यामुळे काश्मिरी पंडिंत आणि हिंदू कुटुंबांच्या सुरक्षेबद्दलच्या विद्यमान सरकारच्या हेतूबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत.'

ISI च्या मोठ्या पाच षडयंत्राचा खुलासा, भारतावर हल्ला करण्याची जोरदार तयारी

'एका बाजूला चर्चेसाठीच्या आमच्या अर्जविनंत्यांना केराची टोपली दाखवली जाते. दुसरीकडे काश्मिरातल्या अल्पसंख्याकांचे जीव आणि मालमत्ता यांच संरक्षण करण्यात सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरत आहेत. त्यामुळे प्रशासनाची यंत्रणा आणि समन्वय कोसळलं असल्याचं दिसतं,' असंही त्या पत्रात लिहिलं आहे.

32 वर्षांनंतरही सरकार काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेची खात्री देण्यात अपयशी ठरलं आहे. खोऱ्यातले अन्य हिंदू आणि शीख यांना तिथे सुरक्षित वाटत नसताना नायब राज्यपाल मनोज सिन्हा काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाची (Rehabilitation) खात्री कशी देऊ शकतील?

दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या हत्यांच्या बाबतीत काश्मिरी समाजाचं मौन धक्कादायक आहे. 'अवर मून हॅड ब्लड क्लॉट्स' या पुस्तकाचे काश्मिरी पंडित लेखक राहुल पंडिता यांनी मला सांगितलं, 'हे सार्वत्रिक मौन धक्कादायक आहे; मात्र अनपेक्षित नाही. नवी दिल्लीतल्या पंडारा रोडसह देशभरात कुठेही कोणीही पाणीपुरी विकू शकतो; मात्र बिहारी काश्मिरात पाणीपुरी विकायला आला, तर तो बाहेरचा ठरतो.'

काश्मिरीयतचं ढोंग?

काश्मिरी समाजाचं ढोंग दिसून येतं. कारण ते मुस्लिम दहशतवादी असं म्हणत नाहीत. केवळ काश्मिरी हिंदू आणि शीखच नव्हेत, तर स्वतःला भारतीय म्हणवणारे काश्मिरी मुस्लिमही यात बळी पडत आहेत. अनेकदा हे ढोंग काश्मिरियतच्या नावाखाली दडलेलं असतं. काश्मिरियत हा एक प्रकारे खोटी बंधुता दाखवण्यासाठी आणि त्याखाली इस्लामी मूलतत्त्ववादी विचारसरणी व काश्मीर खोऱ्यातले हिंदू, शीख यांच्यावर केल्या जाणारा दहशतवाद दडवण्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे. हिंदू आणि शीखांच्या अंत्यसंस्कारांवेळीच मीडियातल्या पब्लिसिटी स्टंटसाठी काश्मिरियत दिसते. मुस्लिमेतरांना गेल्या तीन दशकांप्रमाणेच आजही लक्ष्य केलं जात आहे. नदीमार्ग ते वंदाहामा आणि गूल ते छत्तीसिंगापुरा अशा सर्वत्र निष्पाप काश्मिरी हिंदू आणि शीखांच्या रक्ताने गोठलेल्या खोऱ्याचे रस्ते धुऊन निघाले आहेत.

Exclusive: भारतानं अरुणाचल प्रदेशमध्ये चिनी घुसखोरी उधळली, चिनी सैनिक ताब्यात

काश्मिरी पंडित आज तुम्हाला सांगू इच्छित आहेत, की उद्या ते त्यांच्या कुटुंबीयांसहित मारले जाऊ शकतात. नया काश्मीरमध्ये 2021मधला शरद ऋतू 1990च्या हिवाळ्याचा कडाकाच हिंदू आणि शीखांसाठी घेऊन आला आहे. मा. पंतप्रधान, कृपया पुन्हा काश्मिरातून निर्वासितांचा (Another Exodus) लोंढा बाहेर पडण्याची घटना तुमच्या देखरेखीखाली होऊ देऊ नको.

- लेखक आदित्य राज कौल  हे काँट्रिब्युटिंग एडिटर असून अंतर्गत सुरक्षा, परराष्ट्रीय धोरण आणि वादग्रस्त प्रदेशांबाबत ते दशकाहून अधिक काळ वृत्तांकन करत आहेत.

First published:

Tags: Jammu and kashmir, Jammu kashmir