मराठी बातम्या /बातम्या /explainer /10 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचे प्रक्षेपण! Big Bang थेअरीचं रहस्य उलगडणार?

10 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचे प्रक्षेपण! Big Bang थेअरीचं रहस्य उलगडणार?

नासा (NASA), कॅनडा स्पेस एजन्सी आणि युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) यांची संयुक्त मोहीम जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप (JWST) लाँच करण्यात आली आहे. आजपर्यंतची ही विशेष आणि अत्याधुनिक अंतराळ दुर्बीण पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर बसवली जाणार आहे. काय आहेत वैशिष्ट्ये चला जाणून घेऊ.

नासा (NASA), कॅनडा स्पेस एजन्सी आणि युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) यांची संयुक्त मोहीम जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप (JWST) लाँच करण्यात आली आहे. आजपर्यंतची ही विशेष आणि अत्याधुनिक अंतराळ दुर्बीण पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर बसवली जाणार आहे. काय आहेत वैशिष्ट्ये चला जाणून घेऊ.

नासा (NASA), कॅनडा स्पेस एजन्सी आणि युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) यांची संयुक्त मोहीम जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप (JWST) लाँच करण्यात आली आहे. आजपर्यंतची ही विशेष आणि अत्याधुनिक अंतराळ दुर्बीण पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर बसवली जाणार आहे. काय आहेत वैशिष्ट्ये चला जाणून घेऊ.

पुढे वाचा ...

न्यू यॉर्क, 28 डिसेंबर : दशकभराच्या प्रतिक्षेनंतर जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप (James Webb Space Telescope) अखेर अवकाशात सोडण्यात आला आहे. नासा (NASA), कॅनडा स्पेस एजन्सी आणि युरोपियन स्पेस एजन्सीची ही मोहीम नासाने 25 डिसेंबर रोजी सुरू केली आहे, जी आता आपल्या लक्ष्याकडे झेपावली आहे. पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर त्याची स्थापना केली जाणार आहे. खगोलशास्त्रीय भाषेत सेकंड लॅग्रेंज पॉइंट (Lagrange Point) या विशेष ठिकाणी स्थापन केल्यामुळे त्याचा शोध कार्यात मोठा फायदा होणार असून अनेक संवेदनशील संकेत टिपता येणार आहेत. काय आहे ही योजना? याने काय फायदा होईल? चला तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या.

सिग्नल्सची देवाणघेवाण

या नवीन पिढीच्या अंतराळ दुर्बिणीची स्थापना 10 वर्षांपासून प्रतिक्षेत होती, जी कोणत्या ना कोणत्या कारणाने पुढे ढकलली जात होती. आता याचे यशस्वी प्रक्षेपण झाले असून या दुर्बिणीची अँटेना असेंब्ली उघडण्यात आली आहे. त्यात उच्च डेटारेट डिश अँटेनाचाही समावेश आहे. याच्या मदतीने दिवसातून दोनदा किमान 28.6 गिगाबिट डेटा पाठविला जाईल. या अँटेनाचीही चाचणी घेण्यात आली असून ते सुरळीतपणे काम करत आहे.

सहा महिन्यांत काम सुरू होईल

बेव्ह टेलिस्कोप ही जगातील सर्वात मोठी आणि सर्वात गुंतागुंतीची अंतराळ विज्ञान वेधशाळा असून तिचे कार्य सुरू होण्यासाठी सहा महिने लागतील. यानंतर वेब पूर्वीपेक्षा अधिक स्पष्टतेसह बाह्य अवकाशातून येणाऱ्या इन्फ्रारेड प्रकाश लहरींचा अभ्यास करण्यास सक्षम असेल. या दुर्बिणीला विकसित करण्यासाठी सुमारे 30 वर्षांचा कालावधी लागला आहे.

पृथ्वीभोवती फिरवणार नाही

आत्तापर्यंत जेवढ्या दुर्बिणी अवकाशात बसवल्या होत्या त्या सर्व पृथ्वीभोवती फिरत होत्या. त्यात नासा आणि USE च्या हबल दुर्बिणीचाही समावेश आहे. पण जेम्स वेब हे करणार नाही, तर त्याला दुसऱ्या लॅग्रेंज पॉइंटवर बसवले जाणार आहे जिथून ती विश्वाच्या इतिहासाचे निरीक्षण करू शकेल. ज्याच्या मदतीने ती बिग बँग पर्यंतची माहिती मिळवू शकते.

लॅग्रेंज पॉइंट काय आहे Lagrange points

नासाच्या (NASA) मते लॅग्रेंज पॉइंट (Lagrange points) हे अंतराळातील ते स्थान आहेत जेथे वस्तू स्थिर स्थितीत ठेवता येतात. या परिस्थितीत सूर्य आणि पृथ्वीसारख्या दोन प्रचंड वस्तुमानांचे गुरुत्वाकर्षण शक्ती अशी असते की ते टेलिस्कॉप (दुर्बिणी किंवा उपग्रह) छोटा ग्रहासोबत (म्हणजे पृथ्वी) चालते. या अंतराळ बिंदूंवर वाहन किंवा दुर्बिणीला तिची सापेक्ष स्थिती राखण्यासाठी इंधनाची आवश्यकता नसते.

काय फायदा होईल?

लॅग्रेंज 2 च्या या स्थानावरून दुर्बिणी पृथ्वीच्या एकाच रेषेत राहील आणि पृथ्वीच्या अनुषंगाने ती सूर्याभोवती फिरत राहील. यामुळे सूर्यापासून येणाऱ्या प्रकाश आणि उष्णतेपासूनही संरक्षण मिळेल. इटालियन-फ्रेंच गणितज्ञ जोसेफी-लुई लॅग्रेंज यांच्या सन्मानार्थ या ठिकाणाला हे नाव देण्यात आलं आहे.

असे किती बिंदू असतात?

कोणत्याही दोन मोठ्या वस्तूंसाठी (ग्रह) दोन्हीच्या तुलनेत असे पाच विशेष बिंदू असतात जिथे एक छोटा उपग्रह सतत कक्षेत एकाच स्थितीत राहू शकतो. पृथ्वीच्या सूर्य प्रणालीतील तीन L1, L2 आणि L3 एकाच रेषेवर आहेत तर L4 आणि L5 हे सर्वोच्च बिंदू तयार करतात. नासाचा सौर आणि हेलिओस्फियर वेधशाळा उपग्रह सध्या L1 वर काम करत आहे. तर L2 वर वेब दुर्बिण जात आहे. खगोलशास्त्रीय अभ्यासासाठी हे आदर्श स्थान आहे.

दोन लॅग्रेंज पॉइंट्स L1 आणि L2 हे अस्थिर बिंदू मानले जातात. कारण येथे कार्यरत उपग्रहाला त्याची स्थिती सतत सुधारावी लागते, तर L3 नेहमी सूर्याच्या मागे असतो त्यामुळे त्याचा वापर केला जात नाही. L2 स्थितीत जेव्हा सूर्याच्या विरुद्ध बाजूने येणारे सिग्नल वाचले जाईल, तेव्हा वेब दुर्बिण सर्वात लहान इन्फ्रारेड लहरी शोधण्यात सक्षम असेल कारण येथे तिच्यावर सूर्याकडून येणाऱ्या तीव्र प्रकाश पृथ्वीमुळे अडवला जाणार आहे.

First published:
top videos

    Tags: Nasa, Science