मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Jagdish Chandra Bose B’day: असा शास्त्रज्ञ ज्यांनी वेद आणि उपनिषदांना आधुनिक विज्ञानाशी जोडलं!

Jagdish Chandra Bose B’day: असा शास्त्रज्ञ ज्यांनी वेद आणि उपनिषदांना आधुनिक विज्ञानाशी जोडलं!

जगदीशचंद्र बोस (Jagdish Chandra Bose) हे भारतातील पहिले वैज्ञानिक संशोधक होते. त्यांनी विज्ञान, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, वनस्पतिशास्त्र या विषयांतील शोध आणि प्रयोगांनी संपूर्ण जगाला प्रभावित केलं. रेडिओ कम्युनिकेशनसारखे (Radio Communication) शोधही लावले, तरीही त्यांना नोबेल पारितोषिक (Nobel Prize) मिळू शकले नाही. विशेषतः उपनिषदांना आधुनिक विज्ञानाशी जोडण्याचे काम त्यांनी केलं.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 30 नोव्हेंबर : जगदीशचंद्र बोस (Jagdish Chandra Bose) यांचे नाव आधुनिक भारतीय विज्ञानातील (Modern Indian Science) पहिले वैज्ञानिक संशोधक म्हणून घेतले जाते. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातीस, बोस यांनी त्यांच्या योगदानाने देशाला विज्ञानाच्या जगात जागतिक स्तरावर आणले. भौतिकशास्त्र, वनस्पतीशास्त्र, जीवशास्त्र या विषयांना भारतीय संस्कृतीशी जोडण्याचे काम त्यांनी केलं आहे. विज्ञान साहित्यात योगदान देताना सर्वसामान्यांनाही विज्ञानाची ओळख करून घेण्याची संधी मिळाली. त्यांना रेडिओ कम्युनिकेशनचे जनक म्हणून ओळखले जाते. 30 नोव्हेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त देश त्यांचे स्मरण करत आहे.

सुरुवातीचे शिक्षण गावात

जगदीश चंद्र बोस यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1858 रोजी ब्रिटीश राजवटीत असलेल्या पूर्व बंगालमधील मेमनसिंग येथील ररौली गावात झाला, जो आता बांगलादेशात आहे. त्यांचे वडील भगवानचंद्र बसू हे ब्रह्म समाजाचे नेते होते आणि ब्रिटिश राजवटीत अनेक ठिकाणी डेप्युटी मॅजिस्ट्रेट किंवा सहाय्यक आयुक्त होते. बोस यांचे प्रारंभिक शिक्षण त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या त्याच गावातील शाळेत झाले.

लहानपणापासून जीवशास्त्रात रस

लहानपणापासूनच बोस यांना निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची खूप आवड होती. यानिमित्ताने त्यांची जीवशास्त्रातील आवड जागृत झाली. वयाच्या 11 व्या वर्षी ते कलकत्त्याला आले आणि त्यांनी सेंट झेवियर्स शाळेत प्रवेश घेतला. यानंतर ते लंडनला वैद्यकीय शास्त्राचे शिक्षण घेण्यासाठी गेले. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी डॉक्टर होण्याचा आपला इरादा सोडला आणि केंब्रिज कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, जिथे त्यांनी भौतिकशास्त्राचा अभ्यास केला.

शिकवण्याचे समर्पण

बोस 1885 मध्ये भारतात आल्यानंतर प्रेसिडेन्सी कॉलेज, कलकत्ता येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून शिकवू लागले. इंग्रजी प्राध्यापकांच्या तुलनेत भारतीय प्राध्यापकांच्या कमी पगाराला विरोध केल्याने त्यांनी तीन वर्षे विना वेतन अध्यापन केले, पण त्यांनी शिकवणे सोडले नाही. बोस यांचे काही विद्यार्थी जसे सतेंद्र नाथ बोस नंतर प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ बनले.

वनस्पतीत जीवन आहे

जगदीशचंद्र बोस यांनी कॅस्कोग्राफ नावाच्या उपकरणाचा शोध लावला. ते परिसरातील विविध लहरी मोजू शकत होते. पुढे त्यांनी प्रयोगातून सिद्ध केले की झाडांमध्ये आणि वनस्पतींमध्ये जीवन असते. ते सिद्ध करण्याचा हा प्रयोग रॉयल सोसायटीत झाला आणि त्याच्या या शोधाचे जगभरात कौतुक झाले.

रेडिओ कम्युनिकेशनचे जनक

वैज्ञानिक विभागात असे मानले जाते की बोस यांच्या वायरलेस रेडिओसारख्या उपकरणातूनच रेडिओ विकसित केला गेला. पण स्वतःच्या नावावर पेटंट झाल्यामुळे रेडिओच्या शोधाचे श्रेय इटालियन शास्त्रज्ञ जी. मार्कोनी यांना जाते. मार्कोनी यांना या शोधाबद्दल 1909 चा भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.

बोस आणि उपनिषद

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद आणि सिस्टर निवेदिता यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांवर प्रभाव टाकणाऱ्या वेद आणि उपनिषदांना बोस यांनी वैज्ञानिक बाजू दिली. भगिनी निवेदिता यांनी त्यांचे 'रिस्पॉन्स इन द लिव्हिंग अँड नॉन-लिव्हिंग' हे उपनिषद आधारित विज्ञानावरील प्रसिद्ध पुस्तक संपादित केलं. निवेदिता आणि टागोर यांच्यातील पत्रव्यवहारावरून असे दिसून येते की, निवेदितांनी वेद आणि उपनिषदांचा बराच अभ्यास केल्यानंतर बोस यांच्या ग्रंथांचे संपादन केलं.

बोस यांना बंगाली विज्ञान साहित्याचे जनक देखील म्हटले जाते. 1896 मध्ये, बोस यांनी निरुद्देशर कथा लिहिली जी एक छोटी कथा होती. परंतु, 1921 मध्ये त्यांच्या अभ्यक्त संकलनाचा भाग बनली. 1917 मध्ये त्यांना नाइटहूड ही पदवी देण्यात आली, त्यानंतर बोस सर जगदीश चंद्र बोस म्हणून ओळखले जाऊ लागले. 23 नोव्हेंबर 1937 रोजी वयाच्या 78 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

First published: