मराठी बातम्या /बातम्या /explainer /

काश्मीर फाइल्स वादावर इस्रायलच्या भूमिकेमागे आहे मोठं कारण; म्हणून 24 तासांत माफीनामा

काश्मीर फाइल्स वादावर इस्रायलच्या भूमिकेमागे आहे मोठं कारण; म्हणून 24 तासांत माफीनामा

काश्मीर फाइल्स वादावर इस्रायलच्या भूमिकेमागे आहे मोठं कारण

काश्मीर फाइल्स वादावर इस्रायलच्या भूमिकेमागे आहे मोठं कारण

चित्रपट निर्माते नादव लॅपिड यांच्या 'द कश्मीर फाइल्स'वर केलेल्या वक्तव्यावरुन इस्त्रायल दूतावासाने माफी मागितली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 29 नोव्हेंबर : इस्त्रायली चित्रपट निर्माते नादव लॅपिड यांच्या 'द कश्मीर फाइल्स'वर केलेल्या वक्तव्यावरुन गदारोळ सुरु आहे. लॅपिडने या चित्रपटाचे वर्णन 'प्रोपोगंडा' आणि 'अश्लील' असे केले होते. यानंतर देशभरात सोशल मीडियावर दोन गट पाहायला मिळाले. एकीकडे लॅपिड यांच्यावर टीकेची झोड उठवली गेली तर दुसरीकडे काही लोक या ज्युरीची पाठराखणही करताना दिसले. मात्र, या प्रकरणी इस्त्रायलने नरमाईची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलन म्हणाले की, लॅपिडला लाज वाटली पाहिजे. त्याचवेळी इस्रायलच्या वाणिज्य दूतावासानेही अनुपम खेर यांना फोन करून माफी मागितली. मात्र, यामागे वेगळच कारण असल्याचं बोललं जातंय.

काय आहे प्रकरण?

गोव्यात 53 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) सुरू आहे. इस्त्रायली चित्रपट निर्माते नादव लॅपिड यांनी 'द काश्मीर फाइल्स' संदर्भात हे विधान केले आहे. तो म्हणाला, 'द कश्मीर फाइल्स पाहून आम्हा सर्वांना धक्का बसला आणि अस्वस्थ झालो. आम्हाला हा चित्रपट प्रोपोगंडा आणि कुरूप वाटला.

काय म्हणाले इस्रायलचे राजदूत?

लॅपिडचे हे वक्तव्य समोर येताच त्यावर टीकाही सुरू झाली. हे विधानही सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर इस्रायलचे राजदूत नाओर गिलन यांनी ट्विटरवर एक लांबलचक पोस्ट लिहिली, ज्यामध्ये त्यांनी या वक्तव्याबद्दल भारताची माफी मागितली.

वाचा - Kashmir Files वर केलेल्या टीकेवर इस्राइल राजदूतांनी मागितली माफी; म्हणाले माणूस म्हणून मला...

इस्रायलच्या वाणिज्य दूतावासानेही माफी मागितली

अनुपम खेर यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत इस्रायलचे कौन्सुल जनरल कोबी शोशानी हेही उपस्थित होते. शोशनी म्हणाली, 'सकाळी उठल्यानंतर मी माझा मित्र अनुपम खेरला फोन केला आणि माफी मागितली. हे एक वैयक्तिक मत होते, ज्यासाठी मी माफी मागितली आहे. औपचारिक किंवा अनौपचारिकरित्या इस्रायलचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.

भारत आणि इस्रायलची 'मैत्री' किती खास आहे?

भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या एक वर्षानंतर पॅलेस्टिनी भूमीची विभागणी झाली आणि 1948 मध्ये इस्रायलचा जन्म झाला. भारताचा त्याला विरोध होता. 1949 मध्ये संयुक्त राष्ट्रात इस्रायलच्या समावेशाबाबत मतदान झाले तेव्हा भारताने त्याला विरोध केला होता. मात्र, तरीही इस्रायलचा समावेश करण्यात आला.

पुढच्या वर्षी 17 सप्टेंबर 1950 रोजी भारताने इस्रायलला मान्यता दिली. इस्रायलने पुढच्याच वर्षी मुंबईत आपले वाणिज्य दूतावास उघडले. 42 वर्षांनंतर म्हणजेच 1992 मध्ये भारत आणि इस्रायलमध्ये औपचारिकपणे राजनैतिक संबंध निर्माण झाले आणि दोन्ही देशांचे दूतावासही उघडण्यात आले.

वाचा - Kashmir Filesला प्रपोगंडा आणि वल्गर म्हणणाऱ्या नादेव वर भडकले अनुपम खेर

भारत-इस्रायल व्यापार

भारत आणि इस्रायलमध्ये व्यापारी संबंधही आहेत. इस्रायलमधील भारतीय दूतावासाच्या वेबसाइटवरील माहितीमध्ये असे म्हटले आहे की इस्रायल हा आशियातील भारताचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे आणि जगातील नववा सर्वात मोठा आहे. 1992 पासून दोन्ही देशांदरम्यान व्यापार सुरू आहे. 1992 मध्ये भारत आणि इस्रायलमध्ये 200 मिलियन डॉलरचा व्यापार झाला होता, तर 2021 मध्ये 7.86 बिलियन डॉलरपेक्षा जास्त उलाढाल झाली होती. संरक्षण सौद्यांचा यात समावेश नाही.

सुरुवातीच्या काळात भारत आणि इस्रायलमध्ये हिरे आणि रसायनांचा व्यापार होत असे. वास्तविक, अलीकडच्या काळात इलेक्ट्रॉनिक मशिनरी, हाय-टेक उत्पादने, दळणवळण यंत्रणा आणि वैद्यकीय यंत्रणा यासारख्या गोष्टींचाही व्यापार होत आहे. जून 2022 पर्यंत भारताने इस्रायलमध्ये सुमारे 132 दशलक्ष गुंतवणूक केली आहे. तर, एप्रिल 200 ते मार्च 2022 पर्यंत इस्रायलने भारतात 271 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

First published:

Tags: Israel, Jammu kashmir