मराठी बातम्या /बातम्या /explainer /

स्टीव्ह जॉब्सला खरच नंबर प्लेट शिवाय कार चालवण्याची परवानगी होती का? बौद्ध धर्माकडे कसा वळला?

स्टीव्ह जॉब्सला खरच नंबर प्लेट शिवाय कार चालवण्याची परवानगी होती का? बौद्ध धर्माकडे कसा वळला?

काही दिवसांपासून सोशल मीडियावर सतत चर्चा होत आहेत की अॅपलचे स्टीव्ह जॉब्स कधीच आपल्या कारला नंबर प्लेट लावत नसत. अशा बातम्यांमध्ये किती तथ्य आहे.

काही दिवसांपासून सोशल मीडियावर सतत चर्चा होत आहेत की अॅपलचे स्टीव्ह जॉब्स कधीच आपल्या कारला नंबर प्लेट लावत नसत. अशा बातम्यांमध्ये किती तथ्य आहे.

काही दिवसांपासून सोशल मीडियावर सतत चर्चा होत आहेत की अॅपलचे स्टीव्ह जॉब्स कधीच आपल्या कारला नंबर प्लेट लावत नसत. अशा बातम्यांमध्ये किती तथ्य आहे.

  • Published by:  Rahul Punde
नवी दिल्ली, 9 ऑगस्ट : स्टीव्ह जॉब्सबद्दल अनेक गोष्टी पसरल्या आहेत. त्यामुळे ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण आहे. पण, अमेरिकेतील एका नामांकित न्यूज साईट्समधील एबीसी न्यूजने स्टीव्हबद्दल अशी बातमी दिल्याने ती खरी असल्याचे दिसते. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर यावरुन चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत स्टीव्ह जॉब्स खरोखरच नंबर प्लेट नसलेली कार चालवत होते का? याची सत्यता जाणून घेणे आवश्यक आहे. ही चर्चा स्टीव्ह जॉब्स यांच्या निधनानंतर सुरू झाली. सिलिकॉन व्हॅलीमधील या दिग्गजाने आपल्या मर्सिडीजला कोणतीही नंबर प्लेट लावली नव्हती. तो खूप बलाढ्या माणूस होता किंवा कॅलिफोर्निया पोलीस त्याला असं करू देत होती, असं कोणतही कारण नव्हतं. याचं कारण वेगळे आहे एबीसी न्यूजनुसार, कॅलिफोर्नियातील एक कायदा याचे मुख्य कारण आहे. याचे कारण म्हणजे कॅलिफोर्नियामध्ये तुम्ही नंबर प्लेटशिवाय नवीन कार चालवू शकता. याचा फायदा जॉब्स घेत असत. त्यांच्याकडे सिल्व्हर कलरची मर्सिडीज कार होती. तो दर सहा महिन्यांनी नवीन कार घेत होते. नियमात पळवाट कायद्यात पळवाट सापडल्याने तो कधीही नंबर प्लेटच्या अडचणीत आला नाही. कारण तो या नियमाच्या आडून नवीन गाडी घेऊ लागला. त्यांच्यासारख्या श्रीमंत व्यक्तीला दर सहा महिन्यांनी नवीन कार खरेदी करणे शक्य होते. नवीन गाड्या भाड्याने घेणे चालू मात्र, यासाठी आणखी एक कारण देण्यात आले की, त्याने नवीन कार घेतली नाही, तर 6 महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर गाडी देणाऱ्या कंपनीकडून नवीन कार घेत होता. लीज कंपनी आनंदी होती, कारण तिला यासाठी स्टीव्ह जॉब्सकडून सतत पैसे मिळत होते. Apple लव्हर्ससाठी बॅडन्यूज! पुढे ढकललं जाऊ शकतं iPhone 14 स्मार्टफोनचं लाँचिंग हे होते कारण आता जर तुम्ही विचार करत असाल की स्टीव्ह जॉब्स असे का करत होते, तर यामागे एक खास कारण होते की स्टीव्हची इच्छा होती की कोणीही त्याचा माग काढू नये. यामुळे त्याने नंबर प्लेट नसलेले वाहन वापरण्याचा विचार केला, त्यामुळे त्याला कोणीही ट्रक करू शकत नव्हते. नेहमी वेगळेपणासाठी प्रसिद्ध स्टीव्ह जॉब्स नेहमीच काहीतरी वेगळे करण्यासाठी अधिक ओळखले जातात. त्यांच्या या सवयीने त्यांना वेगळे केले आणि नंतर ते खूप यशस्वी देखील झाले. त्‍यांच्‍याबद्दल काही खास गोष्‍टीही तुम्हाला माहित असल्‍या पाहिजेत. सुरुवातीच्या काळात स्टीव्ह जॉब्सकडे अभ्यासासाठी फारसे पैसे नव्हते, त्यामुळे ते उन्हाळ्याच्या सुटीत काम करायचे, त्यामुळे ते त्यांच्या आर्थिक परिस्थितीची नोंद ठेवू शकत होते. पोर्टलँडमध्ये ग्रॅज्युएशन करताना त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की त्यांच्याकडे खायलाही पैसे नव्हते. शिक्षणादरम्यान तो कॉलेजच्या कृष्ण मंदिरातील जेवण आणि प्रसादावरही उदरनिर्वाह करत असे. अभ्यासादरम्यान तो मित्राच्या खोलीत जमिनीवर झोपायचा. कदाचित इथूनच ते हिंदू अध्यात्म आणि गुरूंकडे आकर्षित झाले असावेत. स्टीव्ह जॉब्स 1974 मध्ये अध्यात्मिक ज्ञानासाठी भारतात आले होते. त्यांनी भारतात 07 महिने घालवले. त्यानंतर बौद्ध धर्माच्या प्रभावाने स्टीव्ह जॉब्सने बौद्ध धर्म स्वीकारला. त्याच्या हायस्कूलच्या अभ्यासादरम्यान, तो स्टीव्ह वोझ्नियाकीला भेटला. तो खूप हुशार होता. स्टीव्हप्रमाणेच त्याला इलेक्ट्रॉनिक्समध्येही खूप रस होता. स्टीव्ह शिकण्यासाठी कॉलेजमध्ये गेला पण 6 महिन्यांत कॉलेज सोडलं. जॉब्सला त्याच्या खऱ्या पालकांचा शोध घेण्याचे इतके वेड लागले होते की ते शोधण्यासाठी त्याने खाजगी गुप्तहेर देखील नेमले. नंतर त्याला त्याच्या खऱ्या आई-वडिलांची माहिती मिळाली. पुन्हा त्याचे आई आणि बहिणीचे नाते आयुष्यभर राहिले. पण त्यांनी वडिलांना कधीच माफ केले नाही.
First published:

पुढील बातम्या