मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Indian Army Day 2022: 15 जानेवारीला आर्मी डे का साजरा होतो? लेफ्टनंट जनरल करिअप्पा यांचा याच्याशी काय संबंध?

Indian Army Day 2022: 15 जानेवारीला आर्मी डे का साजरा होतो? लेफ्टनंट जनरल करिअप्पा यांचा याच्याशी काय संबंध?

15 जानेवारी हा दिवस सीमेचे रक्षण करणाऱ्या आणि देशाचा अभिमान वाढवणाऱ्या सैनिकांचा सन्मान करण्याचा दिवस (Indian Army Day 2022) आहे. मात्र, हा दिवस 15 जानेवारीलाच का साजता केला जातो?

15 जानेवारी हा दिवस सीमेचे रक्षण करणाऱ्या आणि देशाचा अभिमान वाढवणाऱ्या सैनिकांचा सन्मान करण्याचा दिवस (Indian Army Day 2022) आहे. मात्र, हा दिवस 15 जानेवारीलाच का साजता केला जातो?

15 जानेवारी हा दिवस सीमेचे रक्षण करणाऱ्या आणि देशाचा अभिमान वाढवणाऱ्या सैनिकांचा सन्मान करण्याचा दिवस (Indian Army Day 2022) आहे. मात्र, हा दिवस 15 जानेवारीलाच का साजता केला जातो?

  • Published by:  Rahul Punde

नवी दिल्ली, 15 जानेवारी : 15 जानेवारी हा भारतासाठी महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस दरवर्षी भारतीय सेना दिन (Indian Army Day 2022) म्हणून साजरा केला जातो. 15 जानेवारी हा दिवस सीमेचे रक्षण करणाऱ्या आणि भारताचा अभिमान वाढवणाऱ्या सैनिकांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. भारताचा 74 वा लष्कर दिन यंदा साजरा होत आहे. नवी दिल्ली आणि सर्व लष्करी मुख्यालयात 15 जानेवारी रोजी लष्करी परेड, लष्करी प्रदर्शन आणि इतर कार्यक्रम आयोजित केले जातात. पण प्रश्न असा आहे की भारतीय लष्कर दिन हा 15 जानेवारीलाच का साजरा केला जातो? हा दिवस भारतीय सैन्यासाठी आणि भारताच्या इतिहासासाठी कसा खास आहे? वास्तविक भारतीय सेना दिन फील्ड मार्शल केएम करिअप्पा यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. फील्ड मार्शल केएम करिअप्पा कोण आहेत आणि त्यांच्या सैन्यातील योगदानाबद्दल तसेच 15 जानेवारीला आर्मी डे का साजरा केला जातो हे जाणून घेऊया?

कोण आहेत लेफ्टनंट जनरल केएम करिअप्पा? Lieutenant General KM Kariappa

देश स्वतंत्र होण्यापूर्वी लष्करावर ब्रिटिश सेनापतीचा ताबा होता. सन 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारतीय लष्कराचे नेतृत्व ब्रिटिश वंशाच्या व्यक्तीकडे होते. 1949 मध्ये स्वतंत्र भारताचे शेवटचे ब्रिटिश कमांडर-इन-चीफ जनरल फ्रान्सिस बुचर होते. त्यांची जागा भारतीय लेफ्टनंट जनरल केएम करिअप्पा यांनी घेतली. ते स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्करी अधिकारी होते. विशेष म्हणजे त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धात भारतीय सैन्याचे नेतृत्व केले होते. पुढे करिअप्पाही फील्ड मार्शल बनले.

भारतीय लष्कराच्या नवा युनिफॉर्मविषयी सोशल मीडियावर वेगळीच चर्चा!

आर्मी डे 15 जानेवारीलाच का? Army Day

वास्तविक फील्ड मार्शल केएम करिअप्पा हे 15 जानेवारी 1949 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्करप्रमुख झाले. भारताच्या इतिहासातील ही सर्वात महत्त्वाची घटना आहे. म्हणूनच दरवर्षी 15 जानेवारी हा भारतीय सेना दिन म्हणून साजरा केला जातो. करिअप्पा लष्करप्रमुख झाले तेव्हा भारतीय सैन्यात सुमारे 2 लाख सैनिक होते. करिअप्पा 1953 मध्ये निवृत्त झाले आणि 1993 मध्ये वयाच्या 94 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

करिअप्पा यांचे कर्तृत्व

करीअप्पा यांनी 1947 च्या भारत-पाकिस्तान युद्धाचे नेतृत्व केले. निवृत्तीनंतर त्यांना 1986 मध्ये फील्ड मार्शल पद देण्यात आले. याशिवाय दुसऱ्या महायुद्धात बर्मामध्ये जपान्यांना पराभूत केल्याबद्दल त्यांना ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायरचा सन्मानही मिळाला होता.

भारतीय सैन्याची स्थापना केव्हा झाली?

राजे महाराजांच्या कारकिर्दीत, प्रत्येक राज्यकर्त्याचे स्वतःचे सैनिक होते. परंतु, ईस्ट इंडिया कंपनीने 1776 साली कोलकाता येथे भारतीय सैन्याची स्थापना केली. त्यावेळी भारतीय लष्कर ही ईस्ट इंडिया कंपनीची एक तुकडी होती, ज्याला नंतर ब्रिटिश इंडियन आर्मी असे नाव मिळाले. स्वातंत्र्यानंतर अखेर देशातील सैनिकांना भारतीय सैन्य म्हणून मान्यता मिळाली.

First published:

Tags: Army, Indian army