Home /News /explainer /

Explained: भारतात हवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल

Explained: भारतात हवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल

भारतात अशी अनेक शहरे आहेत जी जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये गणली जातात. अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांची श्वसनसंस्था प्रदूषणामुळे आधीच कमकुवत झाली आहे. आता अशा लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्यास त्यांच्या फुफ्फुसांची अवस्था अधिकच खराब होते.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 08 मे : भारतातील कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेने (Corona Second Wave) संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. भयानक बाब म्हणजे, तिसर्‍या लाटेचाही आताच इशारा देण्यात येत आहे. पण भारतात कोरोनाचे (Corona in India) संकट अचानक तीव्र झाले की हळूहळू, याचा शोध घेण्याचा प्रयत्न तज्ज्ञांनी केला आहे. काही लोक असे म्हणत आहेत की, आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी कमी पैसे खर्च केले गेले. तर, काही लोक कोरोनाच्या नवा प्रकार घातक असल्याचे म्हणत आहेत. हे सर्व खरे आहेच. पण याच्याही पुढे जाऊन महत्त्वाचे कारण म्हणजे हवामान बदल, हवा प्रदूषण आणि भारतातील जीवाश्म इंधन म्हणजे पेट्रोल-डिझेल-कोळसा आदींच्या वापराकडे कोणीही लक्ष देत नाही. टाईम्स (Time Magazine) या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मासिकाने याबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे. टाईम्सच्या वृत्तानुसार, विज्ञान आणि पर्यावरण केंद्राच्या कार्यकारी संचालक अनुमिता रॉय-चौधरी म्हणाल्या की, साथीच्या रोगाच्या प्रारंभाच्या वेळी वैज्ञानिकांनी वायू प्रदूषण आणि कोरोना यांच्यातील संबंध उघडकीस आणला. यावरून हे स्पष्ट होते की, वाढत्या वायू प्रदूषणामुळे कोरोना पसरण्याचा धोका जास्त आहे. भारतात अशी अनेक शहरे आहेत जी जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये गणली जातात. अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांची श्वसनसंस्था प्रदूषणामुळे आधीच कमकुवत झाली आहे. आता अशा लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्यास त्यांच्या फुफ्फुसांची अवस्था अधिकच खराब होते. भारतातही वायू प्रदूषण आणि कोरोना यांच्या परस्परसंबंधावर बरीच संशोधने केली गेली आहेत. परंतु, त्यांना फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी संशोधन जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, लोकांवर पेरीक्युलेट मॅटरचे (पीएम प्रदूषण) मोठे दुष्परिणाम झाल्याचे आढळले आहे. हे प्रदूषण पेंढा जाळणे, वाहनांचा धूर आणि उद्योगांच्या धुरामुळे होते. संपूर्ण जगात कोरोना विषाणूमुळे बरेच लोक मरण पावले. त्यातील 15 टक्के लोक वायू प्रदूषणामुळे आधीच तीव्र आजारांना बळी पडले होते. हे वाचा - दुर्दैवी! ऑक्सिजनवर संशोधन करणाऱ्या कोल्हापूरच्या संशोधकाचा प्राणवायूअभावीच मृत्यू कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांपैकी 50 टक्के लोकांना आधीपासूनच हवेच्या प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या समस्या आणि आजार होते. आपण पाहिलेच असेल की, दिल्ली-एनसीआरचे लोक कोरोना येण्यापूर्वीच प्रत्येक हिवाळ्यात चेहऱ्यावर मास्क लावत असत. भारतात बरेच अभ्यास झाले आहेत, ज्यामध्ये वायू प्रदूषण आणि कोरोना विषाणूचा परस्परसंबंध दर्शविला गेला आहे. सतत हवेच्या प्रदूषणासह एखाद्या ठिकाणी राहणे किंवा तेथून जाणे बर्‍याच प्रकारच्या रोगांना कारणीभूत ठरू शकते. उदाहरणार्थ, दमा, मधुमेह किंवा फुफ्फुसे किंवा हृदयाशी संबंधित कोणताही आजार. या सर्व रोगांमुळे कोरोना संक्रमणादरम्यान रुग्णाची परिस्थिती आणखी गंभीर होते. हे वाचा - तुमच्या भागात लस उपलब्ध आहे की नाही? केवळ 4 स्टेप्सद्वारे अशी मिळवा माहिती जयपूरच्या मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे केलेल्या अभ्यासानुसार कोविड-19 च्या वाढत्या रुग्णसंख्येचा वायू प्रदूषण आणि हवेतील आर्द्रता आदी हवामानातील बदल यांसारख्या घटनांचा थेट संबंध आहे. दिल्लीतील कोरोनाची परिस्थिती गंभीर करण्यामागे हीच कारणे आहेत. असाच एक अभ्यास जागतिक बँकेने केला आहे. ज्यामध्ये असे म्हटले गेले होते की, जर पर्टिक्युलेट मॅटरशी आपला संपर्क 1 टक्क्याने वाढल्यास कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या 5.7 टक्क्यांनी वाढेल. जागतिक बँकेच्या अभ्यासात भारत सरकारला स्पष्ट सल्ला देण्यात आला होता की, देशात स्वच्छ इंधन प्रणालीची त्वरित व्यवस्था करावी लागेल. वाहतूक व्यवस्थेमुळे होणारे वायू प्रदूषण कमी करावे लागेल. यानंतरच आपण लोकांना कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क वापरण्याची आणि लसीकरणाची शिफारस करू शकता. भारतातील हवेची गुणवत्ता सुधारण्याची गरज असल्याचे देशातील वैज्ञानिकांचे स्पष्ट मत आहे. यातून दोन फायदे होऊ शकतात – पहिला साथ वेगाने कमी होईल आणि दुसरा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होईल. हे वाचा - भारतीयांचं कौतुक करणं इम्रान खानला पडलं महागात; पाकिस्तानींना राग अनावर, पंतप्रधानांवर टीकेची झोड लॉकडाऊन संपल्यानंतरही वाहनांचा वापर कमी करण्याविषयी लोकांना पटवून द्यावे लागेल, असा सल्ला जागतिक बँकेने दिला होता. कोरोनाची आटोक्यात आणण्यासाठी व त्याचा परिणाम कमी करण्यासाठी सरकार व जनतेलाही त्यांच्या पातळीवर जल आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. शास्त्रज्ञ महामारीदरम्यानच प्रदूषण कमी करण्यास सांगत आहेत. जेणेकरून महामारी कमी होण्यासोबतच हवा, पाण्याचे प्रदूषण कमी होण्याचे इतरही फायदे सर्वांना मिळतील. हे सह-लाभ म्हणजे रहदारी कमी झाल्यास, उद्योगांवर नियंत्रण आल्यास किंवा पेंढा जाळणे बंद केल्यास प्रदूषण तर कमी होईलच; परंतु, जमिनीची सुपीकताही वाढेल. त्याशिवाय, लोकांना अक्षय्य ऊर्जेच्या दिशेने जाण्याची प्रेरणा मिळेल. हे वाचा - कोरोनापासून बचावासाठी भाजप आमदारानं सांगितला अजब उपाय, गोमूत्र पितानाचा VIDEO केला शेअर भारतातील वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या तीव्र आजारांमुळे दरवर्षी कोट्यवधी लोकांचा अकाली मृत्यू होतो. चीनमध्येही असेच घडते. अमेरिकेसारख्या कठोर पर्यावरणीय नियम असलेल्या देशातसुद्धा दरवर्षी 1 लाखाहून अधिक लोक वायू प्रदूषणामुळे मृत्यू पावतात. वायू प्रदूषणातील पेरीक्युलेट पदार्थ याला सर्वाधिक कारणीभूत ठरतात. नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसनेही यासंदर्भातील एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यासाठी भारतात सर्वप्रथम लोकांना जागरूक करण्याची गरज आहे. त्यानंतर स्वच्छ ऊर्जा आणण्याची गरज आहे. तरच कोरोना साथीपासून वेगाने मुक्त होण्याची शक्यता आहे. जरी तसे झाले नाही तरीही कोरोना प्रकरणे कमी होतील. मात्र, जर या सर्व बाबींची अंमलबजावणी केली नाही तर पुढील 30 वर्षांत भारतात राहणे कठीण होईल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Air pollution, Corona updates, Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या