Home /News /explainer /

घरबसल्या फक्त 50 रुपयांत PVC Aadhaar card ऑर्डर करा, तेही 1 मिनिटांत

घरबसल्या फक्त 50 रुपयांत PVC Aadhaar card ऑर्डर करा, तेही 1 मिनिटांत

Aadhaar News: खुल्या बाजारातून तयार केलेल्या आधार PVC कार्ड (PVC Aadhaar card) ला UIDAI ने अमान्य घोषित केलं आहे. आता तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नवीन आधारकार्ड ऑर्डर करावे लागणार आहे. ते कसे करायचे हे जाणून घ्या.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 20 जानेवारी : आधार कार्ड (Aadhar Card) सेवा पुरवणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) बाजारातून बनवले जाणारे पीव्हीसी कार्ड वैध नसल्याचे म्हटले आहे. परिणामी कोट्यवधी लोकांचे आधारकार्ड आता कचऱ्यात जमा होणार आहे. तुमचेही आधारकार्ड असेल तर तुम्हाला देखील UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नवीन आधारकार्ड ऑर्डर करावे लागणार आहे. आता तुम्ही म्हणाल ते आणि कसं करायचं? आम्ही कशाला आहोत. चला सोप्या पायऱ्यांमध्ये घरबसल्या ऑनलाईन पीव्हीसी आधारकार्ड (PVC Aadhar Card) कसं मागवायचं हे शिकून घ्या. 50 रुपयांतर घरपोच मागवा पॉलीविनाइल क्लोराईड कार्ड PVC कार्ड म्हणूनही ओळखली जातात. हे एक प्रकारचे प्लास्टिक कार्ड आहे, ज्यावर आधार कार्डचे तपशील छापलेले असतात. हे कार्ड बनवण्यासाठी 50 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. UIDAI नुसार, या कार्डमध्ये सुरक्षित QR कोड, होलोग्राम, मायक्रो टेक्स्ट, जारी करण्याची तारीख आणि कार्डची प्रिंट आणि इतर माहिती आहे. PVC आधार कार्ड कसे बनवायचे? यासाठी तुम्हाला UIDAI च्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. या वेबसाइटवर, 'माय आधार' विभागात जाऊन, 'ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड' वर क्लिक करा. यानंतर, तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकी आधार नोंदणी आयडी (EID) टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला सिक्युरिटी कोड किंवा कॅप्चा भरावा लागेल. OTP साठी Send OTP वर क्लिक करा. यानंतर, दिलेल्या जागेत नोंदणीकृत मोबाइलवर प्राप्त झालेला OTP भरा आणि सबमिट करा. सबमिशन केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या समोर आधार पीव्हीसी कार्डचा प्री-व्यू मिळेल. त्यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या पेमेंट पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला पेमेंट पेजवर पाठवले जाईल. येथे तुम्हाला 50 रुपये शुल्क भरावे लागेल. पेमेंट पूर्ण केल्यानंतर तुमच्या आधार पीव्हीसी कार्डची ऑर्डर प्रक्रिया पूर्ण केली जाईल. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर UIDAI आधार प्रिंट करेल आणि 5 दिवसांच्या आत ते भारतीय पोस्टकडे सुपूर्द करेल. यानंतर टपाल विभाग स्पीड पोस्टद्वारे ते तुमच्या घरी पोहोचवेल. तुमचंही PVC Aadhar कार्ड बाद होणार का? जाणून घ्या UIDAI चा नवा निर्णय आधार 3 फॉरमॅटमध्ये येतं आधार कार्ड सध्या 3 फॉरमॅटमध्ये उपलब्ध आहे - आधार पत्र, ई-आधार आणि पीव्हीसी कार्ड. पीव्हीसी कार्डे गेल्या वर्षी लाँच करण्यात आले. UIDAI नुसार, आधार कार्ड तिन्ही फॉरमॅटमध्ये वैध आहे. नागरिक त्यांच्या सोयीनुसार आधारचे स्वरूप निवडू शकतात.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Aadhar card, Aadhar card link

    पुढील बातम्या