मराठी बातम्या /बातम्या /explainer /बॅंक बुडली तरी तुम्हाला मिळू शकतील का तुमचे पैसे? कसे? नवीन नियमाविषयी सर्वकाही

बॅंक बुडली तरी तुम्हाला मिळू शकतील का तुमचे पैसे? कसे? नवीन नियमाविषयी सर्वकाही

आपले पैसे सुरक्षित आहेत ना अशी चिंता अनेकांना त्रास देते; मात्र केंद्र सरकारने डीआयसीजीसी (DICGC) कायद्यात बदल केला आहे. आता बँक बुडली तरी तुमच्या अकाउंटचे पैसे सुरक्षित राहू शकतात, पण कसे?

आपले पैसे सुरक्षित आहेत ना अशी चिंता अनेकांना त्रास देते; मात्र केंद्र सरकारने डीआयसीजीसी (DICGC) कायद्यात बदल केला आहे. आता बँक बुडली तरी तुमच्या अकाउंटचे पैसे सुरक्षित राहू शकतात, पण कसे?

आपले पैसे सुरक्षित आहेत ना अशी चिंता अनेकांना त्रास देते; मात्र केंद्र सरकारने डीआयसीजीसी (DICGC) कायद्यात बदल केला आहे. आता बँक बुडली तरी तुमच्या अकाउंटचे पैसे सुरक्षित राहू शकतात, पण कसे?

    नवी दिल्ली, 14 ऑगस्ट : मोठ्या कष्टाने कमवलेला पैसा (Bank deposit security) सुरक्षित राहावा, यासाठी आपण तो बॅंकांमध्ये ठेवतो; मात्र आता बॅंकाच (Bankruptcy) अडचणीत येण्याचं प्रमाण वाढलं आहे. देशातल्या सहकारी बॅंका (Co-operative Banks insolvency) सातत्याने संकटात सापडत आहेत. अशा परिस्थितीत आपण पैसे ठेवलेली बॅंक अडचणीत आली तर काय करायचं, आपल्या पैशांचं काय होणार अशी चिंता अनेकांना भेडसावते. कारण PMC bank आणि लक्ष्मी विलास या बॅंकांची ताजी उदाहरणं आपल्या समोर आहेत.

    या बॅंकेच्या ग्राहकांना आपले पैसे मिळवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्याचं आपण पाहिलं. या पार्श्वभूमीवर आपले पैसे सुरक्षित आहेत ना अशी चिंता अनेकांना त्रास देते; मात्र केंद्र सरकारने डीआयसीजीसी (DICGC) कायद्यात बदल केला आहे. त्यानुसार नवा नियम 4 फेब्रुवारी 2020 पासून लागू करण्यात आला आहे. त्यामुळे बॅंक बुडाली तरी आपल्याला 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते. कायद्यातला बदल नेमका काय आहे, हे जाणून घेऊ या. याबाबतचं वृत्त 'टीव्ही नाइन हिंदी'ने दिलं आहे.

    भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (RBI) रबोबँक यूए या सहकारी बॅंकेला नियामक अनुपालनातल्या त्रुटींसाठी 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. या पार्श्वभूमीवर खरंच बॅंकांमधील आपला पैसा सुरक्षित आहे का, असा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी बॅंकेत 5 लाखांपर्यंतची जमा रक्कम सुरक्षित राहण्याबाबत 2020च्या अर्थसंकल्पामध्ये एका नियमात बदल केला होता. या नियमाला नंतर कॅबिनेटची मान्यता मिळाली होती.

    RBI ने या बँकेवर ठोठावला 1 कोटींचा दंड, ग्राहकांवर काय होणार परिणाम?

    या नियमानुसार, संकटग्रस्त बॅंक ग्राहकांना डिपॉझिट (Deposit) विम्याचा क्लेम तीन महिन्यांच्या आत मिळणार आहे. कोणत्याही बॅंकेवर निर्बंध लादण्यात आले असतील, तर डीआयसीजीसी कायद्यानुसार ग्राहक 5 लाखांपर्यंतची रक्कम आता परत मिळवू शकतात.

    समजा एका बॅंकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये तुमची खाती आहेत. त्यापैकी एका शाखेत तुम्ही 5 लाखांचं फिक्स डिपॉझिट (Fix Deposit) केलं आहे, तर दुसऱ्या शाखेत तुमचं सेव्हिंग अकाउंट असून, त्यावर 3 लाख रुपये जमा आहेत. अशा वेळी संबंधित बॅंक बुडाली तर तुम्हाला फक्त 5 लाख रुपये परत मिळू शकतात. याचाच अर्थ केवळ तुमच्या 5 लाख रुपयांचाच विमा काढला जाईल.

    गेल्या 50 वर्षांत देशातल्या क्वचित एखाद्याच बॅंकेचं दिवाळं निघालं असेल. जेव्हा दिवाळखोरीची परिस्थिती निर्माण होते तेव्हा सरकार संकटातल्या बॅंकेचं मोठ्या बॅंकेत विलीनीकरण (Merge) करतं. सरकार कोणत्याही बॅंकेला दिवाळखोरीत जाऊ देत नाही, असं जाणकार सांगतात. ग्राहकांच्या पैशांना संरक्षण मिळावं यासाठी बॅंका जमा केलेल्या प्रत्येक 100 रुपयांसाठी आता 12 पैसे प्रिमियम भरतात. पूर्वी हा प्रिमियम 10 पैसे होता, असं तज्ज्ञांनी सांगितलं.

    1 ऑक्टोबरपासून या सरकारी बँकेत होतोय मोठा बदल, तुमचंही खातं असेल तर जाणून घ्या

    यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे, केंद्र सरकारने डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अॅक्टमध्ये (DICGC) आता बदल केला आहे. यामुळे 2020 मध्ये डिपॉझिटवर इन्शुरन्स कव्हरेज (Insurance Coverage) 5 लाख रुपयांपर्यंत झालं आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर यापूर्वी हमी किंवा गॅरंटी रक्कम ही फक्त 1 लाख रुपये होती; मात्र गेल्या वर्षी सरकारने या रकमेत वाढ केल्याने ती आता 5 लाख रुपये झाली आहे. याबाबतचा नियम 4 फेब्रुवारी 2020 पासून लागू करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या बॅंकेत तुम्ही पैसे ठेवले आहेत, ती बॅंक बुडाली तरी तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकणार आहे.

    First published:

    Tags: Bank, Money