मराठी बातम्या /बातम्या /explainer /Explainer : Hajj यात्रेला जाण्याची योजना आखताय? जाणून घ्या अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

Explainer : Hajj यात्रेला जाण्याची योजना आखताय? जाणून घ्या अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

हज 2022 यात्रेच्या अर्ज (How to file an Application for Hajj 2022) प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या वर्षी ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन आहे. या यात्रेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 ही आहे. जाणून घ्या कसा कराल अर्ज

हज 2022 यात्रेच्या अर्ज (How to file an Application for Hajj 2022) प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या वर्षी ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन आहे. या यात्रेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 ही आहे. जाणून घ्या कसा कराल अर्ज

हज 2022 यात्रेच्या अर्ज (How to file an Application for Hajj 2022) प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या वर्षी ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन आहे. या यात्रेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 ही आहे. जाणून घ्या कसा कराल अर्ज

पुढे वाचा ...

    मुंबई, 03 नोव्हेंबर: हज 2022 यात्रेच्या अर्ज (How to file an Application for Hajj 2022) प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या वर्षी ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन आहे. या यात्रेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 ही आहे. हज 2022 यात्रेला जाण्यास इच्छुक असलेल्यांनी केवळ www.hajcommittee.gov.in या वेबसाइटवरून किंवा गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध असलेल्या "HAJ COMMITTEE OF INDIA" या अत्याधुनिक हज अॅपद्वारे ऑनलाइन अर्ज करायचा आहे. हाती लिहिलेले किंवा टाइप केलेले अर्ज राज्यस्तरीय हज समित्या स्वीकारणार नाहीत. ऑनलाइन अर्जप्रक्रिया कशी आहे, याची टप्प्याटप्प्यानुसार माहिती येथे देत आहोत. अर्जप्रक्रिया सुरू करण्यापूर्वी इच्छुकांनी खाली दिलेली कागदपत्रं तयार ठेवावीत. म्हणजे अर्ज करताना अडचण येणार नाही.

    कोणती कागदपत्र आवश्यक?

    पासपोर्ट: हज यात्रेसाठी अर्ज करताना मुदत न संपलेला पासपोर्ट हे सर्वांत महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. शेवटच्या क्षणी तारांबळ होऊ नये म्हणून सर्व इच्छुक यात्रेकरूंनी अर्ज करण्याच्या तारखेपूर्वी जारी करण्यात आलेला मशीन रीडेबल वैध भारतीय आंतरराष्ट्रीय पासपोर्ट (Machine Readable Valid Indian Passport) सोबत बाळगावा.

    हे वाचा-Explainer: दिवाळीचा फटाक्यांशी संबंध कधी आणि कसा आला? फटाक्यांचा रंजक इतिहास

    बँक अकाउंट: हज यात्रेसाठी अर्ज करताना कव्हर हेडचं बँक अकाउंट असणं बंधनकारक आहे. सर्व यात्रेकरूंनी बँक खातं उघडावं किंवा (आवश्यकता असल्यास) खात्याची माहिती अपडेट करावी. गरज भासल्यास रिफंड थेट बँक खात्यात करता यावा, यासाठी ही माहिती आवश्यक आहे.

    आधार कार्ड: 'हज कमिटी ऑफ इंडिया'ने असं सांगितलं आहे, की प्रत्येक यात्रेकरूने आधार कार्ड काढावं आणि त्याचा तपशील हज यात्रा अर्जात योग्य त्या ठिकाणी नोंदवावा; मात्र हज यात्रेला अर्ज करण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक नाही.

    मोबाइल नंबर: सर्व यात्रेकरूंनी त्यांचा मोबाइल नंबर हज यात्रेच्या अर्जात नोंदवावा आणि तो नंबर सुरू ठेवावा. म्हणजे संबंधित यंत्रणेला आवश्यकता भासल्यास संपर्क साधणं सोपं जाईल.

    अर्ज करण्याच्या प्रक्रियेतले टप्पे

    1. हज यात्रा अर्जासाठी नवी नोंदणी

    2. हज यात्रेचा अर्ज भरणं

    3. फोटो आणि डॉक्युमेंट्स अपलोड करणं.

    4. शुल्क भरणं

    5. हज यात्रा अर्जाची प्रिंट काढणं.

    हे वाचा-एकच राजकीय चाल... पण सेनेला मिळाली ढाल; तर भाजपसाठी ठरली फोल

    या टप्प्यांनुसार जाणून घ्या सविस्तर माहिती:

    1. हज यात्रा अर्जासाठी नवी नोंदणी अर्थात न्यू रजिस्ट्रेशन

    - यासाठी hajcommittee.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावं. "HAJ FORM" वर क्लिक करावं आणि "Apply" हा पर्याय निवडावा. त्यानंतर एक स्क्रीन येईल.

    - त्यात "NEW USER REGISTRATION" वर क्लिक करावं.

    - त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म काळजीपूर्वक भरावा. अर्जदारांनी त्यांचा मोबाइल नंबर, ई-मेल आयडी, स्वतःचं नाव, आडनाव या बाबी भराव्यात. त्यानंतर स्ट्राँग पासवर्ड निवडावा आणि रि-कन्फर्म करावा. सिक्युरिटी कोड टाकावा.

    - माहिती पडताळून पाहावी आणि योग्य असल्याची खात्री पटल्यावर चेक बॉक्सवर क्लिक करून, "Submit Details" वर क्लिक करावं.

    - वन टाइम पासवर्ड (OTP) सबमिट केल्यानंतर स्क्रीनवर पुढील कन्फर्मेशन मेसेज येईल. Your account has been activated; You Can Now Login.

    2. रजिस्टर्ड युझर साइन इन आणि अॅप्लिकेशन फॉर्म भरणं :

    - रजिस्टर्ड युझरने हज यात्रेसाठी अर्ज भरण्याकरिता रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि पासवर्ड भरावा. साइन इन झाल्यानंतर अर्जाच्या योग्य त्या कॅटेगरीवर क्लिक करावं.

    - ड्रॉपडाउन लिस्टमधून प्रौढ यात्रेकरूंची संख्या निवडावी. त्यानंतर "NEXT" बटणावर क्लिक करावं.

    - त्यानंतर भारतीय आंतरराष्ट्रीय पासपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार अर्जदाराने आपली माहिती भरावी. कोविड-19 लसीकरणाची माहिती, वैयक्तिक माहिती, सध्याचा निवासाचा पत्ता, नॉमिनी डिटेल्स, बँक खात्याचे तपशील आदी माहितीचा त्यात समावेश असतो. सर्व माहिती भरून झाल्यानंतर 'डिक्लरेशन'वर क्लिक करावं आणि 'SAVE & NEXT' बटणावर क्लिक करावं.

    हे वाचा-कोमातून बाहेर आल्यावर ती बोलू लागली दुसऱ्याच देशाची भाषा,डॉक्टरांनाही बसला धक्का

    3. फोटो आणि डॉक्युमेंट्स अपलोड करणं

    - ड्रॉपडाउन लिस्टमधून यात्रेकरूचं नाव निवडावं.

    - फोटो आणि डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी "Browse" वर क्लिक करावं.

    - सर्व डॉक्युमेंट्स JPG/JPEG फॉरमॅटमध्येच असावीत.

    - पासपोर्ट साइज फोटोग्राफ 10kb ते 100kb पर्यंतचाच असावा आणि त्याची रुंदी 100pixel ते 148pixel एवढी असावी.

    - डॉक्युमेंट्सची साइज 100kb ते 500kb पर्यंत असावी आणि रुंदी 570pixel ते 795pixel पर्यंत असावी.

    सर्व यात्रेकरूंचे फोटो आणि डॉक्युमेंट्स अपलोड करून झाल्यानंतर 'Upload' बटणावर क्लिक करावं. प्रत्येक यात्रेकरूच्या बाबतीत वरील प्रक्रिया करावी लागेल.

    4. शुल्क भरणं

    - फोटो अपलोड करून झाल्यानंतर अर्जदार आपोआप फी पेमेंटच्या लिंकवर जातील.

    - डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग आदी पर्यायांद्वारे शुल्क भरता येईल. "Online Payment" हा पर्याय निवडावा आणि "Click here to Pay Online" यावर क्लिक करावं.

    - पे ऑनलाइन यावर क्लिक केल्यानंतर पेमेंट गेटवेकडे रिडायरेक्ट केलं जाईल आणि पेमेंट करता येईल.

    - ट्रान्झॅक्शन यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर रिसीट तयार होईल. यशस्वीरीत्या पेमेंट केल्यानंतर अंतिम सबमिशनसाठी पुन्हा एकदा लॉगिन करावं. "FINAL SUBMISSION" वर क्लिक करावं. त्यानंतर तुम्हाला अॅलर्ट मेसेज दिसेल. Ok वर क्लिक करावं.

    5. अर्ज प्रिंट करणं.

    - युनिक सिस्टीम जनरेटेड ग्रुप आयडी दर्शवला जाईल. ऑनलाइन सबमिशन यशस्वीरिता झाल्याचं त्यातून दिसून येतं. ऑनलाइन हज अॅप्लिकेशन फॉर्म पाहण्यासाठी किंवा प्रिंट करण्यासाठी "Download PDF" वर क्लिक करावं.

    हज कमिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे, की डॉक्युमेंट्स अपलोड केलेली असतील, तर संबंधित राज्याच्या हज कमिटीकडे प्रिंटेड हज अॅप्लिकेशन फॉर्म आणि डॉक्युमेंट्स सबमिट करण्याची सध्या गरज नाही. डॉक्युमेंट्स अपलोड केलेली नसतील, तर प्रिंटेड हज अॅप्लिकेशन कॉपी आणि संबंधित डॉक्युमेंट्स 31 जानेवारी 2022पूर्वी संबंधित राज्याच्या हज समितीकडे सादर करणं आवश्यक आहे. त्याशिवाय हज अर्ज प्रक्रिया पूर्ण होणार नाही.

    हज अॅप्लिकेशनसोबत अपलोड करावयाची कागदपत्रे-

    1. प्रत्येकी 300 रुपये नॉन-रिफंडेबल प्रोसेसिंग फीचं पेमेंट (फक्त ऑनलाइन)

    2. हज अॅप्लिकेशन फॉर्म ऑनलाइन भरून सबमिट करणं.

    3. मशीन रीडेबल वैध भारतीय आंतरराष्ट्रीय पासपोर्टचं पहिलं आणि शेवटचं पान अपलोड करावं.

    4. लेटेस्ट पासपोर्ट साइज फोटोग्राफ.

    5. कव्हर हेडच्या कॅन्सल्ड चेकची कॉपी

    6. अॅड्रेस प्रूफ अर्थात पत्त्याचा पुरावा. पासपोर्टवरचा पत्ता आणि सध्याचा निवासाचा पत्ता सारखाच असेल, तर वेगळा पुरावा जोडण्याची गरज नाही. पासपोर्ट पुरेसा आहे. पत्ता पासपोर्टपेक्षा वेगळा असेल, तर पुढीलपैकी कोणत्याही एका पुराव्याची सेल्फ अटेस्टेड कॉपी फॉर्मसोबत जोडावी. आधार कार्ड, बँक पासबुक, निवडणूक फोटो ओळखपत्र, मागील तीन महिन्यांतलं लँडलाइन फोन बिल किंवा वीजबिल.

    कव्हर नंबर म्हणजे काय?

    कव्हर नंबर हा युनिक कम्प्युटर जनरेटेड नंबर असतो. हज कमिटी ऑफ इंडियाने यात्रेकरूंची माहिती आणि डॉक्युमेंट्स संबंधित राज्यांच्या/केंद्रशासित प्रदेशांच्या हज समित्यांकडून पडताळल्यानंतर IHPMS सॉफ्टवेअरद्वारे हा नंबर तयार होतो. राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या हज समित्या कव्हर नंबर कव्हर हेडला कळवतात. अर्जदारांनी हा कव्हर नंबर पुढच्या पत्रव्यवहारावेळी वापरणं बंधनकारक आहे. यात्रेकरूंनी आपापल्या राज्यांच्या किंवा केंद्रशासित प्रदेशांच्या हज समित्यांकडून कव्हर नंबर (Cover Number) मिळवला पाहिजे. कारण कव्हर नंबरशिवाय हज अर्जाचा कुर्राह अर्थात लॉटरीसाठी विचार केला जाणार नाही.

    कव्हर याचा अर्थ एक गट म्हणून एकत्र अर्ज करणारे अर्जदार. एका कव्हरमध्ये केवळ कुटुंबीय किंवा जवळचे नातेवाईक यांचाच समावेश असू शकतो. कव्हर हेड हा प्रौढ पुरुषच असू शकतो. कव्हरमधल्या सर्व व्यक्तींच्या पेमेंटसाठी कव्हर हेड जबाबदार असतो. एका कव्हरमध्ये असलेल्या सर्व अर्जदारांची अॅकॉमोडेशन कॅटेगरी (Accommodation Category) एकसारखीच असली पाहिजे. एका कव्हरमधल्या सर्व यात्रेकरूंनी एकत्रच प्रवास केला पाहिजे. KSA मध्ये अॅकोमोडेशन उपलब्ध नसल्याच्या कारणाचा अपवाद वगळता कव्हरमधले सदस्य वेगवेगळे होऊ शकत नाहीत.

    कुर्राह (लॉटरी) म्हणजे काय?

    कुर्राह (Qurrah) म्हणजे कम्प्युटराइज्ड ड्रॉ. जी राज्यं किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये ठरलेल्या कोटापेक्षा अधिक अर्ज हज यात्रेसाठी आले असतील, अशा ठिकाणी यात्रेकरूंची निवड कव्हर्सच्या कुर्राहद्वारे केली जाते. हज कमिटी ऑफ इंडियाच्या सर्व्हरवर मेन्टेन केलेल्या IHPMS सॉफ्टवेअरवर संबंधित राज्यांच्या हज समित्या कुर्राह करतात. कुर्राहनंतर संबंधित राज्य हज समिती प्रोव्हिजनल निवड झालेल्या यात्रेकरूंना त्याबद्दल कळवते. निवड झालेल्या सर्व यात्रेकरूंना त्यांच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एसएमएसद्वारेही कळवलं जातं. हज कमिटीच्या वेबसाइटवरही यात्रेकरू आपलं सिलेक्शन स्टेटस पाहू शकतात.

    First published:
    top videos