मराठी बातम्या /बातम्या /explainer /

गुलाम नबी आझाद: इंदिरांमुळे राजकारणात, गांधी घराण्याचे निष्ठावंत ते विरोधक, कुठे शिंकली माशी?

गुलाम नबी आझाद: इंदिरांमुळे राजकारणात, गांधी घराण्याचे निष्ठावंत ते विरोधक, कुठे शिंकली माशी?

काँग्रेस नेतृत्वावर आणि विशेषत: गांधी कुटुंबावर जोरदार हल्ला चढवत ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाचा राजीनामा दिला. एकेकाळी इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांनी त्यांना राजकारणात आणले होते. त्यांची झपाट्याने बढती झाली होती. काँग्रेसमध्ये ते उच्च पदांवर राहिले. त्यांच्याकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही सोपवण्यात आल्या होत्या. आझाद हे एकेकाळी गांधी घराण्याचे निष्ठावंत मानले जायचे.

काँग्रेस नेतृत्वावर आणि विशेषत: गांधी कुटुंबावर जोरदार हल्ला चढवत ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाचा राजीनामा दिला. एकेकाळी इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांनी त्यांना राजकारणात आणले होते. त्यांची झपाट्याने बढती झाली होती. काँग्रेसमध्ये ते उच्च पदांवर राहिले. त्यांच्याकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही सोपवण्यात आल्या होत्या. आझाद हे एकेकाळी गांधी घराण्याचे निष्ठावंत मानले जायचे.

काँग्रेस नेतृत्वावर आणि विशेषत: गांधी कुटुंबावर जोरदार हल्ला चढवत ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाचा राजीनामा दिला. एकेकाळी इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांनी त्यांना राजकारणात आणले होते. त्यांची झपाट्याने बढती झाली होती. काँग्रेसमध्ये ते उच्च पदांवर राहिले. त्यांच्याकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही सोपवण्यात आल्या होत्या. आझाद हे एकेकाळी गांधी घराण्याचे निष्ठावंत मानले जायचे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : काँग्रेसच्या असंतुष्ट गट G-23 चे प्रमुख सदस्य गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस नेतृत्वावर, विशेषत: गांधी कुटुंबावर जोरदार हल्ला चढवत पक्ष सोडण्याची घोषणा केली. एक काळ असा होता की ते गांधी घराण्याचे निष्ठावंत मानले जायचे. इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांनी काश्मीरच्या विद्यार्थी राजकारणातून आझाद यांना मुख्य प्रवाह आणि नंतर काँग्रेस राजकारण आणले. ते काश्मीरचे लोकप्रिय नेते असण्यासोबच काँग्रेसच्या अनुभवी आणि बड्या नेत्यांपैकी एक मानले जात होते.

हे 70 चे दशक होते. जम्मू-काश्मीरचा एक तेजस्वी तरुण नेता गांधी कुटुंबीयांच्या नजरेत आला. प्रथम त्यांना जम्मू-काश्मीरमध्ये युवक काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात आले आणि नंतर ते युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले. ते म्हणजे गुलाम नबी आझाद. ज्यांच्या राजकारणाचा प्रवास तळापासून सुरू झाला आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय रंगमंचावर राजकारणाची प्रदीर्घ इनिंग खेळली. गेल्या वर्षी त्यांनी राज्यसभेला निरोप दिला होता. ते दीर्घकाळ काँग्रेसच्या असंतुष्ट गटाचे प्रमुख सदस्य होते. काँग्रेसमधील जुन्या-नव्या नेत्यांच्या युद्धात नव्या बदलांना त्यांचा विरोध होता, असेही बोलले जाते.

गेल्या वर्षी 9 फेब्रुवारीला त्यांनी राज्यसभेला निरोप दिला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले होते. त्यांनी आझाद यांना चांगला मित्र असे वर्णन केले. राजकारणापलीकडे ते त्यांचे मित्र कसे आहेत, याची आठवण सांगितली. गुजरातचे मुख्यमंत्री आणि आझाद जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री असताना त्यांनी तेथील गुजरातमधील जनतेचे कसे रक्षण केले होते, हेही त्यांनी सांगितले.

आपल्या भाषणादरम्यान मोदींनी त्यांना दीर्घ आणि संस्मरणीय राजकीय खेळीसाठी सलामही केला. ते म्हणाले की राजकारणात सत्ता येते आणि जाते, पण मुख्य गोष्टी ही आहे की ती तुम्ही कशी हाताळता. पंतप्रधान मोदींच्या या भाषणानंतर राज्यसभेतून बाहेर पडणारे आझाद अचानक प्रसिद्धीच्या झोतात आले होते.

त्यांची राजकीय कारकीर्द खरच संपली आहे का?

त्यानंतर राजकीय विश्लेषकांनी गुलाम नबी आझाद यांना मोदींनी दिलेल्या विशेष आदराचे वेगवेगळ्या प्रकारे विश्लेषण करण्यास सुरुवात केली. आता त्यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा ते काश्मीरच्या आगामी निवडणुकीत भाजपला मदत करू शकतात किंवा राज्यांच्या निवडणुकीत भाजपसोबत विशेष भूमिका बजावू शकतात, असे बोलले जात आहे. आझाद यांची राजकीय खेळी आता संपली असे म्हणणे चुकीचे ठरेल.

मात्र, काँग्रेसने त्यांची मनधरणी करून त्यांना रोखण्याचा बराच प्रयत्न केला. अलीकडेच काँग्रेसच्या सुप्रीमो सोनिया गांधी यांनीही त्यांच्यावर पक्षाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. त्याच्यांशी चर्चा करण्यात आली. पण, त्यांनी आधीच ठरवलं होतं. त्यांच्या राजीनाम्याकडेही त्याच दृष्टीकोनातून पाहिले जात आहे की त्यांनी आगामी काळासाठी आपले राजकीय प्लॅन्स तयार केले आहेत, त्यामुळेच त्यांनी आता अखेर काँग्रेसला अलविदा केला आहे.

पाच वेळा राज्यसभेवर निवडून आले

गुलाम नबी आझाद हे सध्या राज्यसभेतील काँग्रेसचे नेते तसेच विरोधी पक्षनेते होते. त्यांचा राज्यसभेचा पाचवा कार्यकाळ 15 फेब्रुवारीला संपत आहे. ते गेल्या वेळी जम्मू-काश्मीरमधून आले होते. आता मोदी सरकारने जम्मू-काश्मीरचे केंद्रशासित प्रदेशात रुपांतर केल्यानंतर आता तिथून राज्यसभेची एकही जागा राहिली नाही.

तळागाळातून वर पोहोचलेला नेता

आझाद यांनी आता राजकारणात दीर्घ खेळी खेळली आहे. ते मृदुभाषी आहेत. त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांची गणना काँग्रेसच्या समस्यानिवारकांमध्ये (संकटमोचक) केली जाते. तर त्यांनी आपल्या जम्मू-काश्मीर राज्यात तळागाळातही खूप काम केले. त्यामुळेच ते राजकारणात ते शिखरावर पोहोचले. युवा नेता म्हणून त्यांची 70 आणि 80 च्या दशकातील ज्वलंत नेत्यांमध्ये गणना होते.

मेहनत आणि उर्जेने गांधी कुटुंबीयांच्या नजरेत

आपल्या मेहनतीने आणि उर्जेने त्यांनी गांधी घराण्याला आकर्षित केले. 70 च्या दशकात, जेव्हा ते श्रीनगर विद्यापीठातून प्राणीशास्त्रात एमएस्सी करून बाहेर पडले, तेव्हा चांगली नोकरी करण्याऐवजी ते राजकारणात आले. डोडा जिल्ह्यात तळागाळातून काम करायला सुरुवात केली. 1973 मध्ये त्यांना भालेसा येथील ब्लॉक काँग्रेस कमिटीचे सचिव बनवण्यात आले.

एका झटक्यात ते ब्लॉक स्तरावरून प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले.

ब्लॉकमध्ये काँग्रेसचे सचिव होणे ही नक्कीच मोठी गोष्ट नाही, पण दोन वर्षांत राज्यात युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनणे ही विशेष बाब होती. त्यानंतर विशेष म्हणजे 1980 मध्ये ते युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले.

संजय गांधींचा आवडता व्यक्ती

त्यांच्या राजकीय झेप घेण्यामागचे मोठे कारण म्हणजे संजय गांधींच्या ते पसंतीस उतरले. इंदिरा गांधींना त्यांचं महत्त्व जाणवलं होतं. दोघांनाही आझादांमध्ये लढाऊ आणि उत्साही नेत्याचे गुण दिसले. संजय गांधींनी त्यांना राजकारणात आणले आणि पुढे नेले असे म्हणता येईल, पण नंतर ते इंदिराजींच्या जवळ आले. इंदिरा आणि संजय यांच्यानंतरही ते गांधी घराण्याच्या जवळ राहिले.

देशभर संपर्क

ते 81 वर्षांचे असूनही खूप फिट दिसत आहेत. सुमारे चार दशकांच्या कारकिर्दीत ते काँग्रेस संघटनेत आणि सरकारमध्येही राहिले. ते जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्रीही होते. त्यांनी अनेक मंत्रीपदे भूषवली. ते अनेक राज्यांत काँग्रेसचे प्रभारी होते. एकूणच, ते काँग्रेसचे नेतेही आहेत, ज्यांचा प्रभाव आणि संपर्क देशभरात आहेत.

अनेक गोष्टींवरून वाद

मात्र, त्यांच्या अनेक गोष्टींवर अनेकदा वादही झाले आहेत. 2008 मध्ये त्यांनी हिंदू मंदिरांना जमीन हस्तांतरित करण्याची योजना पास केली, ज्यामुळे मुस्लिम संतप्त झाले. त्यामुळे खोऱ्यात हिंदू-मुस्लिम दंगली उसळल्या. गुलाम नबी आझाद यांच्या बिघडलेल्या प्रतिमेमुळे काँग्रेसने सत्ताधारी पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला. यानंतर गुलाम नबी आझाद यांनी बहुमत सिद्ध करण्याऐवजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

2011 मध्ये एका पत्रकार परिषदेत गुलाम नबी आझाद यांनी समलैंगिकतेला परदेशी आजार म्हणून संबोधले होते. त्यांच्या या वक्तव्यावर चौफेर टीका झाली होती.

केंद्रात आरोग्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी अनेक सूचना केल्या. उदाहरणार्थ, मुलींची लग्ने 25-30 वर्षांच्या दरम्यान झाली तर लोकसंख्या वाढ थांबवता येईल, या विधानाचे कौतुक झालं, तर गावात वीज कमी असेल तर लोक कमी टीव्ही पाहतील आणि मग कमी मुले जन्माला येतील, या विधानाची लोकांनी खिल्ली उडवली होती.

वाचा  - "राहुल गांधींनी पंतप्रधानांचा अध्यादेश फाडणं म्हणजे 'बालिशपणा'"; गुलाम नबी आझाद यांनी सांगितली राजीनाम्याची कारणं

दोन वेळा लोकसभेवर निवडूनही गेले

त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते जम्मू-काश्मीरमधून तीनदा राज्यसभेवर पोहोचले, तर दोनदा महाराष्ट्रातून. दोनवेळा त्यांनी महाराष्ट्रातूनच लोकसभा निवडणूक जिंकली. आता ते पुन्हा राज्यसभेत पोहोचणार का, असा प्रश्न नक्कीच निर्माण झाला आहे. मात्र, असे होणार असून एप्रिलमध्ये ते पुन्हा संसदेत दिसू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

पत्नी प्रसिद्ध गायिका

आता त्याच्या कौटुंबिक जीवनाकडे येऊ. त्यांची पत्नी शमीम ह्या एक प्रसिद्ध काश्मिरी गायिका आहे. त्यांच्या गोड आवाजाचे सर्वजण कौतुक करतात. त्यांना पद्मश्री मिळाले आहे. त्यांनी 1980 मध्ये शमीमसोबत लग्न केले. आझाद यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांच्या फावल्या वेळात बागकाम करणे त्यांना खूप आरामदायी वाटते.

त्यामुळे G-23 विघटन होण्याच्या मार्गावर आहे का?

गेल्या दोन-तीन वर्षांत काँग्रेसच्या जी-23 गटातील नेत्यांनी सातत्याने पक्षाच्या धोरणांना बगल देत प्रमुख नेत्यांना लक्ष्य केले आहे, यात शंका नाही. या गटाचे नेते सतत पक्ष सोडून राजकारणात आपल्या नवनवीन शक्यता शोधत असतात. G-23 मधून अनेक मोठे नेते निघून गेले आहेत. त्यात अजूनही अनेक नेते असले तरी G-23 आता हळूहळू संपत चालले आहे असे दिसते. G-23 च्या नेत्यांना ते रोखू शकणार नाहीत याची काँग्रेसलाही आता जवळपास खात्री झाली आहे. गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यापूर्वीच हिमाचल प्रदेशातील आनंद शर्मा यांनीही काँग्रेस नेतृत्वाला दोष देत पक्ष सोडला होता.

First published:

Tags: Rahul gandhi, काँग्रेस