Home /News /explainer /

Hijab controversy | कर्नाटकातील शाळांमध्ये हिजाब घालण्यावरुन वाद का सुरू झाला? कायदा काय सांगतो?

Hijab controversy | कर्नाटकातील शाळांमध्ये हिजाब घालण्यावरुन वाद का सुरू झाला? कायदा काय सांगतो?

Hijab controversy: सध्या कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाबवरुन मोठा वाद सुरू आहे. पण, अशी कोणती कारणे होती, ज्यामुळे या वादाला उधाण आले आहे. हे प्रकरण आता एवढ्या टोकाला पोहोचले आहे की, कर्नाटकातील बहुतांश शाळा-महाविद्यालयांमध्ये याची धग पोहचत आहे.

पुढे वाचा ...
    बंगळुरू, 9 फेब्रुवारी: कर्नाटकातील (Karnataka) शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाबवरुन सुरू असलेल्या वादाचे (Hijab controversy) कारण समोर आलं आहे. डिसेंबरच्या उत्तरार्धात कर्नाटकातील उडुपी या किनारपट्टी जिल्ह्यातून याची सुरुवात झाली. जिथे 6 मुलींनी हिजाब न उतरवता वर्गात शिकण्यास नकार दिला. ह्या मुली प्री युनिव्हर्सिटी सरकारी महाविद्यालयातील द्वितीय वर्षांच्या विद्यार्थिनी आहेत. याआधी, शाळा व्यवस्थापन आणि नंतर जिल्हास्तरीय शिक्षण विभागाने त्यांना हिजाब काढून वर्गात बसण्यास सांगितले, तेव्हा त्यांनी ही धार्मिक बाब असल्याचे सांगून नकार दिला. यानंतर त्या विद्यार्थिनींवर शाळेचा गणवेश, हिजाब न घालण्याबाबत दबाव आणला असता त्यांनी विरोध केला. तुम्ही 5 विद्यार्थिनी या पोस्टर्ससोबत ठिकठिकाणी उभ्या असलेल्या पाहिल्या असतील, ज्यामध्ये हिजाब घालणे हा त्यांचा अधिकार आहे असे लिहिले होते. वास्तविक, ज्या शाळेतील मुली हिजाब न उतरवण्यावर ठाम होत्या, ती शाळा को-एड नसून फक्त महिलांसाठी आहे. त्यामुळे केवळ शिक्षण घेत असताना हिजाब काढण्यात काही नुकसान नाही. कारण, तसंही ही शाळा केवळ विद्यार्थिनींसाठी आहे, असा समर्थकांचा तर्क आहे. शाळा प्रशासनाचे म्हणणे आहे कि हिजाबला विरोध करणाऱ्या मुली सहसा शाळेत उशिरा येतात. अभ्यासात फारसा रस घेत नाही. मीडिया रिपोर्ट्समध्ये विद्यार्थींनींनी हे आरोप फेटाळले असून आम्ही शिस्तीचे पालन करत असल्याचे म्हटले आहे. या शाळेत किती मुली आहेत? जिथे वाद सुरू झाला त्या उडुपीमधील कॉलेजमध्ये सुमारे 1000 विद्यार्थिनी आहेत, त्यापैकी 75 मुस्लिम आहेत. या 6 विद्यार्थिनी वगळता इतर मुस्लिम विद्यार्थिनींना शाळेच्या नियमांची कोणतीही अडचण नाही. विद्यार्थिनींनी शाळेच्या आवारात हिजाब घालायला हवा, पण वर्गात लेक्चरच्या वेळी तसे करू नये, याला त्यांचा आक्षेप नाही, असे शाळेचे म्हणणे आहे. मात्र, त्याला उत्तर देताना या विद्यार्थ्यांनी सांगितले कि, “आम्हाला शिकवण्यासाठी पाच-सहा पुरुष लेक्चरर आहेत. आम्हाला पुरुषांसमोर डोके झाकावे लागते, म्हणूनच आम्ही हिजाब घालतो." Hijab Controversy | हिजाब आणि बुरख्याशिवाय मुस्लिम महिला आणखी काय घालू शकतात? त्यानंतर हे प्रकरण तापलं यानंतर हे प्रकरण तापू लागले. त्याची बातमी कॉलेजबाहेर पसरल्यावर ती राजकीय आणि धार्मिक बाब बनू लागली. याच्या बाजूने आणि विरोधात निदर्शने झाली. यानंतर कर्नाटकात हा प्रकार इतका तीव्र झाला की कर्नाटक सरकारला सर्व शाळा आणि महाविद्यालयांना 3 दिवस बंद ठेवण्याचे आदेश द्यावे लागले. भविष्यात हे प्रकरण कसे सोडवले जाईल, हे अद्याप ठरलेले नाही. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. केरळ हायकोर्टाने काय निर्णय दिला? यापूर्वी केरळ उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा निर्णय घेण्याचा शाळा व्यवस्थापनाचा अधिकार कायम ठेवला होता. या प्रकरणी शाळा व्यवस्थापनाने एका विद्यार्थिनीला 'नकाब' घालण्यास बंदी घातली होती. कर्नाटक उच्च न्यायालयात उडुपी येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी हिजाबवरील बंदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विद्यार्थ्यांनी असा युक्तिवाद केला आहे की बंदीमुळे भारतीय राज्यघटनेच्या कलम 25 मध्ये समाविष्ट असलेल्या धर्म स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन होते. आता हायकोर्ट काय आदेश देते हे पाहावं लागेल. कायदेशीर बोलायचे झाले, शाळेला ज्याप्रमाणे कोणता गणवेश विद्यार्थ्यांनी परिधान करावा हा निर्णय घेण्याचे स्वातंत्र आहे, तसेच ते विद्यार्थिनींना त्यांच्या इच्छेनुसार कपडे घालण्याचा समान मूलभूत अधिकार आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Karnataka

    पुढील बातम्या