Home /News /explainer /

Home Loan : घरासाठी कर्ज घेण्याआधी समजून घ्या व्याजाचं गणित; नाहीतर 25 लाख रुपयांसाठी द्यावे लागतील 50 लाख!

Home Loan : घरासाठी कर्ज घेण्याआधी समजून घ्या व्याजाचं गणित; नाहीतर 25 लाख रुपयांसाठी द्यावे लागतील 50 लाख!

सध्याच्या महागाईच्या काळात पैसे साठवून घर घेणं तर सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. त्यामुळे बहुतांश लोक होम लोनचा (Home loan) पर्याय स्वीकारताना दिसून येतात.

मुंबई, 22 मे :  आपलं स्वतःचं असं घर असावं हे जवळपास सर्वांचंच स्वप्न असतं. कित्येक लोक आपल्या आयुष्यभराची कमाई त्यासाठी खर्च करतात. तर कित्येक लोक कर्ज काढून घर घेतात आणि नंतर बरीच वर्षे ते कर्ज फेडत राहतात. सध्याच्या महागाईच्या काळात पैसे साठवून घर घेणं तर सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. त्यामुळे बहुतांश लोक होम लोनचा (Home loan) पर्याय स्वीकारताना दिसून येतात. तुम्हीदेखील हाच विचार करत असाल, तर थोडं थांबा! ही बातमी वाचणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. साधारणपणे एखाद्या नोकरदार व्यक्तीला बँकेकडून घरासाठी 25 ते 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं. होम लोन घेताना त्याची परतफेड कऱण्याचा कालावधी, आणि व्याजदर यांची योग्य माहिती घेतली नाही; तर तुम्हाला मोठा फटका (Home loan demerits) बसू शकतो. योग्य प्रकारे करा बँकेची निवड कित्येक बँका या गृहकर्ज परत करण्यासाठी साधारणपणे 20 वर्षांचा कालावधी मंजूर करतात. या कालावधीमध्ये त्या बँकेचे व्याजदर, आणि रक्कम परत घेण्याची पद्धत या गोष्टींमुळे त्या तुमच्याकडून दुप्पट रक्कम (Home loan risks) वसूल करतात. म्हणजेच 25 लाख रुपयांच्या कर्जासाठी तुम्हाला तब्बल 50 लाख रुपये परत द्यावे लागू शकतात. त्यामुळेच होम लोन घेण्यापूर्वी विविध बँकांचे व्याजदर (Home loan interest rate) आणि बाकी गोष्टींची माहिती घेणं गरजेचे आहे. समजून घ्या कर्जाचं गणित यासाठी आपण एक उदाहरण (Home loan calculation) पाहूयात. समजा तुम्ही 25 लाख रुपयांचं होम लोन घेतलं आहे. यावर तुम्हाला पुढील 20 वर्षांपर्यंत हप्ते भरायचे आहेत. इथे सर्वांत महत्त्वाचा मुद्दा ठरतो व्याजदर. सध्या मोठमोठ्या बँकांचे व्याजदर हे 7 ते 8.5 टक्क्यांदरम्यान आहेत. आपण उदाहरण म्हणून तुमच्या कर्जावरील व्याजदर 7.5 टक्के आहे असं समजू. या सर्व माहितीनुसार, तुमचा मासिक हप्ता हा एकूण 20,140 रुपये होतो. ही रक्कम 20 वर्षांपर्यंत दरमहा भरत राहिलात, तर एकूण रक्कम ही 48,33,559 रुपये एवढी होते. पण तुमचं कर्ज तर केवळ 25 लाख रुपयांचं होतं! म्हणजेच तुम्ही तब्बल 23,33,559 रुपये व्याजाचे (Home loan interest) भरले. तुम्ही हेदेखील लक्षात घेणं गरजेचं आहे, की बँकांचे व्याजदर बदलत राहतात. जर 25 लाख रुपयांच्या कर्जासाठी तुम्हाला मिळालेला व्याजदर आठ टक्के झाला, तर तुमचा मासिक हप्ता 20,911 रुपये होऊ शकतो. यामुळे 20 वर्षांच्या कालावधीत तुम्ही बँकेला एकूण 50,18,640 रुपये द्याल. म्हणजेच, तुमच्या व्याजाची रक्कम ही तुमच्या कर्जाच्या रकमेपेक्षा अधिक होऊन जाईल. योग्य व्याजदर निवडा संभाव्य नुकसान टाळण्यासाठी होम लोनवर योग्य व्याजदर आकारणाऱ्या बँकेची निवड करणं गरजेचं आहे. सध्या 30 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI Home loan interest rate) 6.65% ते 7.65% वार्षिक व्याज आकारते. पाहूयात इतर काही बँकांचे वार्षिक व्याजदर. आयसीआयसीआय बँक 7.10% – 7.95% बँक ऑफ बडोदा 6.90% – 8.40% एचडीएफसी बँक 6.70% – 7.50% अ‍ॅक्सिस बँक 7.00% – 11.90% कोटक महिंद्रा बँक 6.50% – 7.30% कॅनरा बँक 7.05% – 11.85% अशा प्रकारे सर्व बँकांचे व्याजदर पाहून तुम्ही तुमच्या फायद्यानुसार योग्य ती बँक निवडू शकता. अर्थात, बँकांचे व्याजदर (Home loan interest rates of all banks) हे बदलत राहतात. त्यामुळे भविष्यातील बदल गृहित धरून, योग्य त्या बँकेची निवड करणे गरजेचे आहे.
First published:

Tags: Home Loan

पुढील बातम्या