Home /News /explainer /

तुम्ही कोरोनाच्या संसर्गापासून वाचला आहात? जाणून घ्या या मागचं कारण, पुढेही होईल फायदा

तुम्ही कोरोनाच्या संसर्गापासून वाचला आहात? जाणून घ्या या मागचं कारण, पुढेही होईल फायदा

तुम्हाला कोरोनाचा संसर्ग झालाच नसेल तर या मागचं नेमकं कारण काय आहे? एकतर तुमच्याकडे एखादी दिव्य शक्ती आहे का? किंवा या लाटेतही तुम्हाला संसर्ग झाला नाही यामागे काही शास्त्रीय कारण आहे का? की केवळ तुमचं नशीब बलवत्तर म्हणून तुम्ही वाचलात? चला जाऊन घेऊ.

पुढे वाचा ...
    मुंबई, 20 मे : कोरोनानं (Corona) अनेकांचे घरसंसार, आयुष्य उद्ध्वस्त केली. अनेकांनी आपले जीवलग गमावले. आपल्यापैकी बऱ्याचजणांना कोरोना होऊन गेला असेल. मात्र, काहीजण या कोरोनाच्या संसर्गातून वाचले. तुमच्यापैकी काहीजण त्यापैंकीच असू शकतील. सगळीकडे कोरोनाचा संसर्ग अगदी झपाट्याने होत असताना जर तुम्हाला कोरोनाचा संसर्ग झालाच नसेल तर या मागचं नेमकं कारण काय आहे? एकतर तुमच्याकडे एखादी दिव्य शक्ती आहे का? किंवा या लाटेतही तुम्हाला संसर्ग झाला नाही यामागे काही शास्त्रीय कारण आहे का? की केवळ तुमचं नशीब बलवत्तर म्हणून तुम्ही वाचलात? ‘वेब दुनिया’ हिंदी वेबसाईटवर याबाबतची अधिक माहिती देण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये एका वेळेस कमीतकमी 60 टक्क्यांपेक्षा जास्त लोक कोविड पॉझिटिव्ह होते. अर्थात ही संख्या सार्स-कोव्ह-2 व्हायरसनं संसर्ग झालेल्या रुग्णांपेक्षा जास्त आहे. लक्षणं नसलेल्या संसर्गग्रस्तांची संख्या प्रत्येक अभ्यासाच्या आधारावर वेगवेगळी असते. मात्र, हे सर्वासाधारण असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. मात्र, कोविड झाला आहे पण समजलंच नाही अशा लोकांचाही एक गट आहे. तर कोविड एकदाही झालाच नाही अशा लोकांचाही एक गट आहे. संपूर्ण कोविड काळात चांगली रोगप्रतिकारक शक्ती (Good Immunity) असलेलेही काहीजण आहेत. त्यांच्याकडे बघून एक प्रश्न पडतो की त्यांना कोविड कसा झाला नाही, हा प्रश्न संपूर्ण कोविड काळात अनुत्तरित आहे. असे अनेक प्रश्न या काळात अनुत्तरित राहिले आहेत. अशा लोकांकडे काही दिव्य किंवा दैवी शक्ती आहे का, हा प्रश्न आपण फेटाळून लावू. पण या लोकांना कोविड न होण्यामागे विज्ञान आणि नशीब या दोन्ही गोष्टींचा हात असण्याची शक्यता आहे. एक साधी सरळ गोष्ट म्हणजे हे लोक थेट व्हायरसच्या संपर्कात कधीही आलेले नाहीत. काही लोकांनी या महामारीच्या काळात संसर्ग होण्यापासून वाचण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले आहेत. गंभीर आजार किंवा हृदय, फुफ्फुसांच्या जुन्या आजारांसारखे जास्त धोका असणाऱ्या लोकांसाठी मात्र ही काही वर्षे अत्यंत कठीण होती. बसून उठल्यानंतर अचानक चक्कर का येते? तज्ज्ञांनी सांगितली 3 मोठी कारणं भविष्यात व्हायरसमुळे होणाऱ्या धोक्यापासून वाचण्यासाठी अनेकजण खबरदारी घेत आहेत. मात्र, खूप काळजी घेऊनही अनेकजणांना कोविडचा संसर्ग झाला. समूह संसर्गाचा अत्यंत वेगाने फैलाव होत असल्यामुळे विशेषत: अत्यंत जलद अशा ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे (Omicron Variant) कोविडचा संसर्ग होणार नाही अशी शक्यता कमीच आहे. एखादी व्यक्ती शाळा किंवा अन्य कामांसाठी जाणाऱ्या लोकांना, खरेदी करणाऱ्या लोकांना भेटत असेल आणि या दरम्यान कोरोना संसर्ग असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात ती आली नाही अशी शक्यता कमीच आहे. तसंच हॉस्पिटलमधील कर्मचारी किंवा कुटुंबातील अन्य व्यक्तींना कोरोना झाल्यानंतरही लागण झाली नाही असेही काहीजण आहेत. लसीमुळे केवळ या गंभीर आजाराचा धोका कमी होतो असं नाही तर त्यामुळे सार्स कोव्ह-2 (SARS- COVV-2) च्या घरगुती संसर्गाची शक्यताही जवळपास निम्मी होते. अगदी जवळच्या संपर्कात आलेल्यांना संसर्ग होण्यापासून या लसीमुळे नक्कीच मदत झाली असेल. अर्थात, ओमिक्रॉनच्या संसर्गाआधी हे सगळे अभ्यास करण्यात आले होते आणि निष्कर्ष काढण्यात आले होते ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ओमिक्रॉनच्या संसर्गावर लसीचा कितपत प्रभाव झाला याबद्दलचा डेटा अजूनही मर्यादित स्वरुपात उपलब्ध आहे. काही सिध्दांत काही लोकांना संसर्ग का झाला नाही याबद्दलचा एक सिद्धांत असा आहे - हे लोक व्हायरसच्या संपर्कात तर आले; पण तो व्हायरस श्वासमार्गात प्रवेश झाल्यानंतरही संसर्ग पसरवण्यात अपयशी ठरला. सार्स- कोव्ह-2 (SARS0 COV-2) ला पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक त्या रिसेप्टर्सच्या कमतरेतमुळे हे घडलं असावं असा एक अंदाज आहे. एखाद्या व्यक्तीला संसर्ग झाला तर SARS COV-2 ला रोगप्रतिकारकशक्तीमुळे मिळणाऱ्या प्रतिसादातील फरक लक्षणांची तीव्रता ठरते. सक्षम आणि जलद प्रतिसाद देणाऱ्या रोगप्रतिकारकशक्तीमुळे व्हायरसची संख्या दुप्पट होण्यापासून रोखलं जातं, अशीही शक्यता असते. अनशा पोटी हे खाल्लंत तर दररोज पोट होईल साफ; कधीच होणार नाही बद्धकोष्ठतेचा त्रास संसर्गाला प्रतिसाद देण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी असते हे बऱ्यापैकी आपलं वय आणि आपली अनुवंशिकता यावर अवलंबून असतं. यासाठी एक आरोग्यपूर्ण जीवनशैली मदत करते. उदाहरणार्थ - व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर काही संसर्गांचा धोका वाढतो हे आपल्याला माहिती आहे. तसंच पुरेशी झोप घेतली नाही तर शरीरातील रोगांशी लढण्याच्या क्षमतेवरही विपरित परिणाम होतो. कोविडचं स्वरुप गंभीर होण्याच्या कारणांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी जवळपास 20% गंभीर प्रकरणांमध्ये अनुवंशिकता हे कारण असल्याचा निष्कर्ष काढला आहे. अनुवंशिकता हे आजार गंभीर होण्याचं एक कारण असू शकतं. तसंच हीच अनुवंशिकता सार्स-कोव्ह-2 चा प्रतिकार करण्यासाठीची गुरुकिल्लीही ठरू शकते. हे सर्व पाहता जर तुम्ही कोरोनाच्या संसर्गात आला नसाल तर तुमच्याकडे सार्स कोव्ह-2 (SARS0 COV-2) संसर्गावर मात करणारी उत्तम नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती असेल किंवा तुम्ही अगदी भाग्यवान आहात. कारण काहीही असो पण ज्या व्हायरसबद्दल आपल्याला फारच कमी माहिती आहे त्याबद्दल आपण अत्यंत खबरदारी घेणं गरजेचं आहे.
    First published:

    Tags: Corona, Corona spread

    पुढील बातम्या