नवी दिल्ली, 27 मे : गुगल फोटोज (Google Photos) कडून देण्यात येणारी अनलिमिटेड स्टोरेजची सेवा आता संपणार आहे हे अनेकांना माहीत असेलच. मात्र, हे केवळ गुगल फोटोजबाबतीत नसून प्रत्येक जीमेल यूजरला लागू होणार आहे. गुगल (Google) 1 जूनपासून आपल्या सेवेत मोठा बदल करत आहे. 1 जूननंतर गुगल फोटोजमध्ये अनलिमिटेड फोटो अपलोड करता येणार नाहीत. यासह अनेक बाबींमध्ये बदल होत आहेत.
गुगलनं दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक जीमेल वापरकर्त्याला 15 जीबीचा स्पेस दिला जाईल, या स्पेसमध्ये फोटोंसह जीमेलचे सर्व इमेल्स आणि गुगल ड्राइव्हसाठी वापरण्यात येणारी स्पेसदेखील समाविष्ट असेल. जर तुम्हाला 15 जीबीहून जास्त स्पेस वापरायचा असेल तर यासाठी पैसे द्यावे लागतील.
गुगल-1 अंतर्गत कंपनीचा 2 टीबी पर्यंतची स्पेस वापरकर्त्यांना देण्याचा प्लॅन आहे, जी आपण खरेदी करू शकता यासाठी महिन्याचे किंवा वर्षाचे पैसे मोजावे लागणार आहेत. यापैकी कोणता प्लॅन घ्यायचा हे आपण निवडू शकता.
गुगल फोटोजसाठी तीन प्रकारचे स्टोरेज मिळेल
हाय कॉलिटी ओरीजनल कॉलिटी आणि एक्सप्रेस कॉलिटी असे गुगल फोटोसाठी तीन प्रकारचे स्टोरेज मिळेल. हाय क्वालिटी अंतर्गत 16 मेगापिक्सेल पर्यंतच्या फोटोजचे आणि फुल एचडी व्हिडिओचे बॅकअप घेता येते. ओरिजनल क्वालिटीमध्ये तुमचा फोटो असेल त्या कॉलिटीत काहीही बदल न करता सेव होईल एक्सप्रेस कॉलिटीमध्ये फोटो आणि व्हिडिओ कॉम्प्रेस करून अपलोड केले जातील. येथे क्वालिटी कमी होऊ शकते. यापैकी ओरिजनल क्वालिटी सिलेक्ट केल्यास आताही पैसे द्यावे लागतात, मात्र हाय क्वालिटी आणि एक्सप्रेस कॉलिटीमध्ये घेतलेले फोटोज फ्री असतात. 1 जून पासून हे बदलणार आहे. आता हाय क्वालिटी आणि एक्सप्रेस क्वालिटी फोटोज बॅकअप घेण्यासाठीही पैसे द्यावे लागतील. 15 जीबी स्पेस संपल्यानंतर तुम्हाला गुगल वनचा वापर करून क्लाउड स्पेस खरेदी करावी लागेल.
हे वाचा - VIDEO : ऑक्सिजन सिलेंडरसह पंजाब नॅशनल बँकेत पोहोचला कर्मचारी, अधिकाऱ्यांना बसला धक्का!
1 जूनपूर्वी अपलोड झालेल्या फोटो आणि व्हिडिओंना लागू नसेल हा नियम
गुगलचे हे नवीन नियम 1 जून पूर्वी जेवढे फोटो आणि व्हिडिओ अपलोड झाले असतील त्यांना लागू होणार नाही. यामुळे 1 जूनपर्यंत आपण हवा तितका बॅकअप घेऊ शकता. जर तुम्हाला गुगल फोटोजसाठी पैसे द्यायचे नसतील तर तुम्ही पेन ड्राईव्ह, ओटीजी किंवा हार्ड ड्राईव्ह वापरण्याचा पारंपरिक मार्ग अवलंबू शकता. ओटीजी तुम्ही थेट फोनला लावून बॅकअप घेऊ शकता आणि गरज पडल्यास लॅपटॉपमध्येही ठेवू शकता.
हे वाचा - अरे बापरे! बाळासोबत व्हिडीओ शूट करताना अचानक घोडी बनली महिला…; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIDEO
याहून स्वस्त आणखी काही पर्याय आहेत का?
गुगल फोटोजला असलेल्या दुसऱ्या पर्यायांचा विचार केला तर आपल्याला अनेक क्लाऊड स्टोरेज मिळू शकतात. मात्र, यासाठीही गुगल इतकेच किंवा काही वेळेस त्याहून जास्त पैसे मोजावे लागू शकतात. दुसऱ्या क्लाउड सर्विसेसवरतीही काही फ्री स्पेस मिळते. जसे की 5 जीबी पर्यंत मिळणारी स्पेस, मात्र अशा वेगवेगळ्या क्लाऊड स्टोरेजवर आपला 5-5 जीबी डेटा ठेवणे योग्य ठरणार नाही. प्रायव्हसीच्या दृष्टीने विचार केल्यास पेन ड्राईव्ह किंवा एखाद्या फिजिकल ड्राईव्हमध्ये स्टोर केलेला डेटा क्लाउड पेक्षा जास्त सुरक्षित असतो. कारण क्लाऊड स्टोरेज हॅकर्स हॅक करू शकतात. मात्र तुमच्या खिशातील पेन ड्राईव्हला हॅकर्स हॅक करू शकणार नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.